Bird Flue Death : बर्ड प्लू एक गंभीर आजार असून यामुळे मॅक्सिकोमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याची माहिती डब्लूएचओने दिली आहे. 59 वर्षीय पीडित व्यक्ती मॅक्सिको येथे राहणारा होता. त्याला एवियन इन्फ्लएंजा ए (H5N2) लक्षणांनी संक्रमित होता. याच आजारामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खरंतर व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव झाला कसा याबद्दल अद्याप कळू शकलेले नाही. याआधी कधीच कोणत्याही व्यक्तीचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लू आजार पक्षांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये फैलावला जातो.
H5N2 नक्की काय आहे?
डब्लूएचओच्या मते, H5N2 इन्फ्लुएंजा व्हायरस ए सर्वसमान्यपणे जनावरांना होतो. पण कधीकधी व्यक्ती देखील यामुळे संक्रमित होऊ शकतो. व्यक्तीला संक्रमित जनावराच्या संपर्कात आल्यानंतर इन्फ्लुएंजा व्हायरस ए चे संक्रमण होऊ शकते.
H5N2 ची लक्षणे
इन्फ्लुएंजा ए झालेल्या व्यक्तीमध्ये ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, डोळ्यांना सूज येणे, स्नायू दुखणे, मळमळ, नाक वाहणे किंवा बंद होणे अशी काही लक्षणे दिसून येतात. (Bird Flue Death)
कसा बचाव कराल?
-अशा ठिकाणापासून दूर रहावे जेथे पक्षी राहतात अथवा आजारी पक्षी आहेत.
-पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असल्यास मास्क जरुर लावावा.
-पोल्ट्री फार्ममधून बाहेर पडल्यास हात स्वच्छ धुवावेत.
-एखाद्या पक्षाच्या पंखांना स्पर्श करणे टाळावे.
-नॉनव्हेज खात असल्यास चिकन व्यवस्थितीत शिजवून खा.