Home » व्हिएतनाममध्ये बर्ड फ्लूचा वाघांना फटका

व्हिएतनाममध्ये बर्ड फ्लूचा वाघांना फटका

by Team Gajawaja
0 comment
Bird Flu In Vietnam
Share

व्हिएतनाममधील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयामध्ये बर्ड फ्लू या रोगाचा फैलाव झाला आहे. यामुळे 47 वाघ, 3 सिंह आणि 1 बिबट्याचा मृत्यू, झाला असून या धोकादायक विषाणू आता मानवामध्ये पसरल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण व्हिएतनाममध्ये खळबळ उडाली असून या देशातील सर्वच प्राणीसंग्रहालयांना बंद करण्यात आले आहे. तसेच त्यातील प्राण्यांची आता विशेष तपासणी करण्यात येत आहे. यामुळे या देशात हाय अलर्ट देण्यात आला असून व्हिएतनाममधील अनेक प्राणीसंग्रहालयांना बर्ड फ्लूचा फैलावर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Bird Flu In Vietnam)

बर्ड फ्लू या विषाणूला एव्हीयन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा संसर्गजन्य रोग जंगली आणि पाळीव पक्ष्यांमध्ये पसरतो. बर्ड फ्लूचा विषाणू सहसा मानवांना संक्रमित करत नाही. परंतु काही प्रकरणांमध्ये तो मानवांमध्ये आढळल्याचे उदाहरण आहे. त्यामुळेच व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत आहे. बर्ड फ्लूचे काही प्रकार अत्यंत धोकादायक असून त्यामुळे बाधित पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. काही बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने मानवांमध्ये या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. आता याच H5N1 बर्ड फ्लू विषाणूची व्हिएतनाममध्ये भीती आहे. दक्षिण व्हिएतनामच्या प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे 47 वाघ, तीन सिंह आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही संख्या मोठी आहे. अन्य काही प्राण्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. यामुळे व्हिएतनाम सरकारने संपूर्ण देशात हाय अलर्ट जाहीर केला आहे. (International News)

देशातील ज्या प्राणीसंग्रहालयात अशा घटना घडल्या आहेत तिथे नागरिकांना या प्राणीसंग्रहालयांना भेट देण्यास बंदी घालण्यात आली आहे. व्हिएतनामची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. त्यात तेथील प्राणीसंग्रहालयांचीही लोकप्रियता आहे. आता याच प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याची बातमी आल्यामुळे या देशात येणा-य़ा पर्यटकांची संख्याही घटण्याची शक्यता आहे.
बर्ड फ्लूचा फैलाव आणि प्राण्यांचे मृत्यू हे अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लाँग एन प्रांतातील माई क्विन्ह सफारी पार्क आणि डोंग नाय येथील वुओन झोई प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे अचानक मृत्यू होऊ लागले. दोन्हीही प्राणीसंग्रहालयातील ज्या प्राण्याचे मृत्यू होत होते, त्यांच्यात एकाच पद्धतीची लक्षणे आढळून आली. त्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे या प्राण्यांच्या मृतदेहाची तपासणी करण्यात आली. (Bird Flu In Vietnam)

व्हिएतनामच्या नॅशनल सेंटर फॉर ॲनिमल हेल्थ डायग्नोसिसने ही तपासणी केली. या चाचणी अहवालात या सर्व प्राण्यांचा मृत्यू H5N1 टाइप ए विषाणूमुळे झाल्याची पुष्टी झाली, आणि देशभर हायअलर्ट जाहीर करण्यात आला. कारण या टाइपटा विषाणू अधिक वेगानं फैलावतो. यात आता प्राण्यांचा मृत्यू झाल्यानं अन्य प्राण्यांचीही तपासणी सुरु करण्यात आली आहे. ज्या प्राण्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असल्याचा संशय आहे, त्यांना वेगळे ठेवून त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. आता या दोन्ही प्राणीसंग्रहालयातील कर्मचा-यांचीही तपासणी करण्यात येत असून त्यांनाही काही काळ पहाणीखाली ठेवण्यात आले आहे. सध्यातरी प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसत नाहीत, परंतु खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. (International News)

======

हे देखील वाचा :  ट्राऊट मासे आणि हिमाचलची अर्थव्यवस्था

======

व्हिएतनाममध्य़े एज्युकेशन फॉर नेचर व्हिएतनाम या वन्यजीवांवर काम करणाऱ्या एनजीओने सांगितले की, 2023 च्या अखेरीस व्हिएतनाममधील प्राणीसंग्रहालयात एकूण 385 वाघांचे वास्तव्य होते. त्यापैकी 310 वाघांना 16 खाजगी सफारी आणि प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. यातीलच वाघांचे मत्यृ झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याने सरकारही सतर्क झाले असून या सर्व प्राण्यांची योग्य काळजी घेतली गेली नसावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बर्ड फ्लूचा विषाणू प्राण्यांमध्ये खूप वेगाने पसरत आहे. या आजाराने बाधित प्राण्यांच्या संपर्कात माणूस आल्यास त्यालाही संसर्ग होण्याची शक्यता असते. मार्चमध्ये व्हिएतनाममध्येच बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच आता संपूर्ण व्हिएतनाममध्ये हायअलर्ट आहे. (Bird Flu In Vietnam)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.