किंग ऑफ पॉप म्हणूनही ओळखल्या जाणा-या मायकेल जॅक्सनला त्याचे चाहते कधीही विसरु शकणार नाहीत. मायकेल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक पुरस्कार विजेता कलाकार आहे. त्याच्या नावावर 23 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. मायकेलचे गाणे आणि त्याचे नृत्यही चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. याच मायकेल जॅक्सनवर (Michael Jackson) लवकरच बायोपिक येणार आहे. या बायोपिकमध्ये मायकेल जॅक्सनची (Michael Jackson) भूमिका कोण करणार याची उत्सुकता होती. ही भूमिका आता जाफर नावाचा अभिनेता साकारणार आहे. हा जाफर म्हणजे जाफर जॅक्सन. हा जाफर मायकेल जॅक्सनचा पुतण्या असून तोही मायकेलसारखाच दिसतो. फक्त त्याचा वर्ण सावळा आहे. त्यामुळेच त्याची निवड या भूमिकेसाठी झाली असून जेव्हा त्याचे नाव घोषित झाले, तेव्हापासून जाफर नेमका कोण आहे, याची उत्सुकता मायकलच्या चाहत्यांना लागली आहे.
पॉपस्टार मायकेल जॅक्सनच्या (Michael Jackson) जीवनावर एक चित्रपट येत आहे. मायकेलच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारणाऱ्या मुख्य अभिनेत्याच्या नावाबाबत मोठी उत्सुकता होती आणि हे नाव समोर आल्यावर सर्वांना पुन्हा एकदा मायकल जॅक्सनची आठवण झाली आहे. संपूर्ण जगाला आपल्या गाण्यांवर नाचायला लावणा-या प्रसिद्ध पॉप गायक मायकेल जॅक्सनला कुठल्याही परिचयाची गरज नाही. नृत्य-गायनाचा बादशहा म्हणून ज्याचा गौरव होतो त्या मायकेल जॅक्सनची (Michael Jackson) गाणी आजही प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. अशा परिस्थितीत या महान गायकाचे जीवन मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरू आहे. मायकेल जॅक्सनच्या जीवनावर एक चित्रपट बनणार असून त्यामध्ये काम करणा-या मुख्य अभिनेत्याबाबत उत्सुकता होती. ही भूमिका आता मायकेल जॅक्सनचा 26 वर्षीय पुतण्या जाफर जॅक्सन साकारणार आहे. अँटोइन फुक्वा दिग्दर्शित मायकेल या बायोपिकमध्ये जाफर जॅक्सन किंग ऑफ पॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मायकेल’ बायोपिकची निर्मिती ग्रॅहम किंग करीत आहेत. जाफरबद्दल बोलतांना ग्रॅहम किंग म्हणाले की, ‘दोन वर्षांपूर्वी मी जाफरला भेटलो होतो आणि त्याने तेव्हा ज्या प्रकारे मायकेलचे व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर सादर केले, ते पाहून मी प्रभावित झालो. तेव्हाच मी नक्की केले होते की, पॉपस्टारच्या भूमिकेत जगभारातील कुठलाही अभिनेता फिट बसू शकणार नाही. ही भूमिका फक्त जाफरच करु शकणार हे तेव्हाच नक्की केले होते. या घोषणेनंतर जाफरही कमालीचा आनंदीत झाला आहे. मायकेल जॅक्सनची (Michael Jackson) भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी सूवर्णसंधी असल्याचे सांगितले आहे.
जाफर जॅक्सन हा मायकेल जॅक्सनचा (Michael Jackson) मोठा भाऊ जर्मेन जॅक्सनचा मुलगा आहे. तो एक गायक आणि निर्माता आहे. मायकेल जॅक्सनचा भाऊ जर्मेन हा सुद्धा एक गायक आणि निर्माता आहे. जर्मेन हा मायकेल जॅक्सनसोबत जॅक्सन 5 चा भाग होता. आता मायकेल जॅक्सनवर येणा-या बायोपिकमध्ये मायकेलच्या आयुष्यातील कोणती गुपिते बाहेर येणार, याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. मायकेल जॅक्सन (Michael Jackson) जेव्हा डान्स करायचा तेव्हा शरीराला 45 डिग्रीपर्यंत झुकवायचा. किंग ऑफ पॉपच्या या डान्स स्टेपचे रहस्य त्याच्या बुटांमध्ये दडले असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. आता मायकेलवर होणा-या बायोपिकमध्ये मायकेलच्या या मूनवॉकचे रहस्यही उघड होणार का हे लवकरच समजणार आहे. मायकेल जॅक्सनला 150 वर्षे जगायचे होते. यामुळे त्यांनी डॉक्टरांची टीम स्वत:साठी ठेवली होती. तो एखाद्याला भेटला तरी तो हातमोजे घालायचा आणि माक्सचा वापर करायचा. मायकेल जॅक्सन (Michael Jackson) ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा. मायकेलवरील बायोपिकमध्ये या गोष्टींचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मायकेल जॅक्सनचा मृत्यू झाला तेव्हा तो 50 वर्षांचा होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. मायकेल जॅक्सनने अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या. अनेकवेळा शस्त्रक्रिया करुन त्यानं स्वतःचा रंगही गोरा करुन घेतला होता. याशिवाय मायकेल काहीवेळा वादातही अडकला होता. आता मायकेलच्या बायोपिकमध्ये या सर्वांचा समावेश होतोय का याची उत्सुकता आहे.
=========
हे देखील वाचा : ९० च्या दशकातील ‘ह्या’ होत्या बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप
========
मायकेलचे (Michael Jackson) ऑफ द वॉल, बॅड, डेंजरस आणि हिस्ट्री हे त्याचे सर्वाधिक विकले जाणारे अल्बम आहेत. 1982 मध्ये रिलीज झालेला मायकेलचा थ्रिलर हा आजपर्यंतचा सर्वाधिक विक्री झालेला अल्बम मानला जातो. 25 जून 2009 रोजी लॉस एंजेलिस येथे मायकेलने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मायकेल जॅक्सनचा (Michael Jackson) जन्म 29 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील गॅरी शहरात झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेला मायकेल 1964 मध्ये आपल्या भावाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. 1982 मध्ये त्याचा ‘थ्रिलर’ अल्बम रिलीज झाल्यावर त्याला जगभरात ओळख मिळाली. मायकेलनं नंतर यशाचे सर्व शिखर सर केले. मृत्यूनंतरही हा मायकल त्याच्या चाहत्यांच्या मनात कायमची जागा करुन आहे. त्यामुळेच त्याच्यावर येणा-या बायोपिकची आता त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
सई बने