Home » OTP शेअर न करताही बॅंक खाते होईल रिकामे, असे रहा दूर

OTP शेअर न करताही बॅंक खाते होईल रिकामे, असे रहा दूर

ओटीपी स्कॅमचे नाव काढले की, प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो आपल्याला आलेला ओटीपी कोणाला शेअर करू नये. खरंतर ही उत्तम बाब आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती असते की, एखाद्यासोबत ओटीपी शेअर करू नये.

by Team Gajawaja
0 comment
biometric scam
Share

ओटीपी स्कॅमचे नाव काढले की, प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो आपल्याला आलेला ओटीपी कोणाला शेअर करू नये. खरंतर ही उत्तम बाब आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती असते की, एखाद्यासोबत ओटीपी शेअर करू नये. पण ओटीपी शेअर न करता सुद्धा तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो हे तुम्हाला माहितेय का? खरंतर हे शक्यच नाही असे तुम्ही म्हणाल पण स्कॅमर्स आपल्या एक पाऊल पुढचा विचार करुनच काही गोष्टी करतात. आता त्यांनी ओटीपी शिवाय पैसे काढण्याची ट्रिक शोधून काढली आहे. म्हणजेच ओटीपीशिवाय तुमचे बँक खाते कसे रिकामे करायचे याचा मार्ग त्यांनी शोधला आहे. (Biometric Scam)

ओटीपी नव्हे तर बायोमॅट्रिकला सुद्धा धोका
खरंतर सध्या एक नवा स्कॅम समोर आला आहे, ज्यामध्ये स्कॅमर्स तुमचे खाते रिकामे करण्यासाठी ओटीपीचा वापर करत नाही. पण यामध्ये ते तुमच्या बायोमेट्रिकच्या माहितीच्या आधारे बँक खाते रिकामे करू शकतात.

Indian PM warned of rising Aadhaar payment fraud | Biometric Update

सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास तर आधाराचे बायोमेट्रिक डिफॉल्ट पद्धतीने अनलॉक होते. जेथे जेथे तुम्ही बायोमेट्रिक दिले आहे आणि ते चुकून लीक झाल्यास तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. यासाठी एखाद्या स्कॅमर्सला तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी ओटीपीची गरज भासणार नाही. (Biometric Scam)

दूर राहण्यासाठी करा हे काम
-स्कॅम पासून दूर राहण्यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या
-येथे तुम्हाला lock/ Unlock चे ऑप्शन दिसेल
-आता येथे तुम्ही बायोमेट्रिक लॉक करू शकता
-जर तुम्हाला ते पुन्हा अनलॉक करायचे असेल तर हिच प्रोसेस वापरा
-जर तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डिटेल्स नेहमीच अनलॉक असेल तर ओटीपी शेअर करण्याचा धोका ही कमी असतो.


हेही वाचा- गुगल पे सोबत बँक खाते लिंक असेल तर आधी हे वाचा


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.