तेलाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेल्या सौदी अरेबियानं (Saudi Arabia) आता भविष्यातील हाका ऐकल्या आहेत. तेलावर चालणा-या गाड्या लवकरच गायब होणार असून त्याचा फटका या देशालाही बसणार आहे. मात्र सौदी अरेबियानं (Saudi Arabia) आधीच या प्रश्नावर उत्तर शोधलं असून हे उत्तर म्हणजे एक अनोखी स्वप्नातील दुनियाच आहे. सौदी अरेबिया आता वाळवंटात पृथ्वीवरील स्वर्गच उभारत आहे. सौदी अरेबियातील (Saudi Arabia) या अद्भुत प्रकल्पामुळे अवघ्या जगाची उत्सुकता ताणली गेली आहे. हे शहर म्हणजे, निओम नावाचे हायटेक शहर आहे. हा निओम प्रोजेक्ट दि फ्युचरिस्टिक लाइन सिटी म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाचे तेलावरची आधारीत अर्थव्यवस्था कमी होणार आहे. या अनोख्या शहराची अनेक वैशिष्ट आहेत. या शहरात कोणतेही वाहन आपल्याला दिसणार नाही. वाहनाचा, म्हणजे गाडीचा वापर कधी होतो, आपल्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी किंवा कार्यालय गाठण्यासाठी पण या निओम शहरात सर्व गरजेच्या वस्तू अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असणार आहेत. त्यामुळे त्या मिळवण्यासाठी कुठलीही गाडी न वापरता, अगदी पायी ते ठिकाण गाठणं शक्य होणार आहे. सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाची अर्थव्यवस्था तेलापासून दुसरीकडे वळवण्यासाठी ही निओम सिटी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबिया (Saudi Arabia) हे आधुनिक शहर होत आहे. जगभरात वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यांच्या विविध गरजा याला अनुसरून आता नवीन उभारणी करण्याची गरज आहे. कमी जागेत जास्तीत जास्त इमारती उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. या भागात आवश्यक त्या सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. या सर्व गरजा बघून सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) निओम नावाचे शहर आकारास येत आहे. सौदी अरेबियातील वाळवंटात उभारण्यात येण-या या हायटेक शहरात प्रत्येकाला आपण इथेच रहावे असे नक्कीच वाटणार आहे. सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या निओम सिटी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे 37 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निओम शहर सरळ रेषेत 170 किमी लांब असेल. या शहराचे एक टोक देशाच्या वायव्य पर्वतावर आणि दुसरे टोक लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असेल. या शहराच्या ग्राउंड लेव्हलवर एकही कार वा वाहन दिसणार नाही. या शहरात राहणाऱ्या सर्वांच्या गरजेच्या वस्तू अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर मिळणार आहेत. निओम सिटी तीन भागांमध्ये बांधण्यात येत आहे. जमिनीच्या पातळीवर कोणतेही वाहन नसेल तर हा भाग अनेक सुंदर झाडांनी परिपूर्ण असेल. निओम सिटीचा दुसरा स्तर सेवा स्तर असेल. येथे सर्व प्रकारचे ऑफीसेस असतील. सेवा स्तरावर दुकाने, कार्यालये, मोठे मॉल्स, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था असेल. पण हे सर्व करतांना पर्यावरणाचा पहिला विचार केलेला आहे.
निओम सिटीचा तिसरा स्तर हा मुख्य आहे. या ठिकाणी शहराची अल्ट्रा स्पीड वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे. ही वाहतूक व्यवस्था अत्यंत वेगवान असून शहराच्या एका कोपऱ्यातून नागरिक अवघ्या 20 दूस-या टोकापर्यंत जाणार आहेत. निओमचे संपूर्ण शहर अक्षय ऊर्जेद्वारे चालविले जाईल. शहराचा बहुतांश भाग 4,500 फूट उंच पर्वतांमधून जाणार आहे. या भागाला ट्रोजेना असे नाव दिले आहे. प्रकल्प करताना कोणत्याही डोंगराला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. निओम सिटीमध्ये पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. येथे चक्क खा-या समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य गोड पाणी तयार करण्यात येत आहे. या निओम शहरात काचेचा मोठा ग्लोब तयार केला आहे. हा ग्लोब समुद्राच्या पाण्याने भरलेला असेल. सोलर मिररच्या मदतीने हा काचेचा ग्लोब गरम केला जाईल. यामुळे आतील पाणी गरम होऊन पाण्याचे वाफेत रूपांतरित होईल. हे पाणी बाहेर काढण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या सर्व शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे.
========
हे देखील वाचा : नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च करणार
========
या सर्व शहराचे व्यवस्थापन स्वतः सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स बघत आहेत. सौदीच्या राजघराण्याची गणना जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये केली जाते. सौदीचे राजघराणे 1.4 ट्रिलियन डॉलर्सचे मालक आहे. या कुटुंबाचा कमाईचा मोठा हिस्सा तेलाच्या कमाईतून मिळालेला आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) दररोज 10 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेलाचे उत्पादन करत असून जागतिक बाजारात त्याची विक्री चालू आहे. मात्र भविष्यात हे तेलाचे उत्पादन कमी होणार आहे, याची कल्पना या राजघराण्याला आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार 2052 पर्यंत जगातील कच्चे तेल संपेल. अशा परिस्थितीत, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाची अर्थव्यवस्था तेलापासून दुसरीकडे वळवण्याच्या नियोजनाचा एक भाग म्हणून निओम सिटी बांधण्याचा निर्णय घेतला आणि सौदी अरेबियाचे चित्रच पलटले आहे. निओम शहराची योजना 10 जानेवारी 2021 रोजी सौदी क्राउन प्रिन्स यांनी जाहीर केली होती. 2024 पर्यंत हे शहर पूर्ण होण्याची शक्यता असून तेथे रहिवासी रहायला येतील असा अंदाज आहे. हे निओम शहर दिल्लीपेक्षा 17 पट मोठे आहे. हे शहर तयार झाल्यावर त्यात सुमारे 460000 नोक-या उपलब्ध होणार आहेत. त्यातून सौदी अरेबियात (Saudi Arabia) अब्जाची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे या शहराच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष असून शहराच्या उभारणीवर त्यांचे लक्ष आहे. हे शहर पूर्ण झाल्यावर ते एका स्वप्न नगरीसारखेच भासणार आहे. मुख्य म्हणजे, यात जगभरातील नागरिक वास्तव्य करु शकणार आहेत. त्यामुळे हे एक भविष्यातील ग्लोबल शहरच असेल.
सई बने