बिल गेट्स (Bill Gates) जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. एक बडे परिवर्तनकारी तंत्रज्ञान व्यावसायिक आणि गेल्या वर्षातांपासून समाजसेवा व दानकर्त्यांच्या रुपात कार्य करत आहेत. तर २८ ऑक्टोंबरला त्यांचा वाढदिवस असतो. बिल गेट्स आजही जगभरात उत्तम बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र इतिहासात त्यांना तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाईल. त्यांनी आपल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला कंप्युटरच्या सहाय्याने आपली कामे अगदी सहज करण्यास शिकवले आहे.
बिल गेट्स यांच्याशिवाय काही क्षेत्र अशक्यच
बिल गेट्स यांनी केवळ कंप्युटरच नव्हे तर जगाला ही बदलले आहे. व्यवसायाच्या पद्धतीच खुप क्रांतिकारी बदल केले आहेत. त्यांनी कंप्युटरला एक घरगुती वस्तूप्रमाणे बनवले आहे. ज्यामुळे इंटरनेटचे जाळे आता जगभरात वेगाने पसरले गेले आहे. त्यांचे सॉफ्टवेअयर्स हे व्यवसायात आज ही अधिकाधिक वापर केले जातात आणि त्यांच्या शिवाय एखादे काम करणे हे अशक्यच मानले जाते.

काही तंत्रज्ञानात झाला सुधार
गेट्स यांनी १९७५ मध्ये आपला मित्र पाल एलन यांच्यासह मिळून मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी बनवली होती. चार वर्षात त्यांनी २५ लाख डॉलरची कंपनी बनवली. सॉफ्टवेयर डेवलपमेंटच्या आवडीसह त्यांच्या व्यावसायिक डोक्याने यशाचे मार्ग नेहमीच गाठले. त्यांच्या सॉफ्टवेयरने आज स्मार्ट टीव्हीच्या निर्मितीचा मार्ग दाखवला आहे. एक्सबॉक्ल लाइवच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईन गेमिंग सुरु केले आणि त्यानंतर प्लेस्टेशनची सुरुवात झाली.
अॅप्पल कंपनीला वाचवले
माइक्रोसॉफ्टने स्मार्टफोन आणि टेबलॅटसाठी विंडो मोबाईल आणि पॉकेट पर्सनल कंप्युटरला लॉन्च केले. तर २००१ मध्ये त्यांनी घोषणा केली की, त्यांनी पहिल्या टॅबलेटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे आणि भविष्यात कंप्युटरमध्ये सर्वाधिक प्रचलीत रुप हेच असेल. कमी लोकांना माहिती आहे की, १९७७ मध्ये जेव्हा अॅप्पल कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होती तेव्हा गेट्स (Bill Gates) यांनी १५ डॉलरची मदत करुन त्यांना डुबण्यापासून वाचवले होते.
हे देखील वाचा- आणि भारतात आलेले ओबामा तब्बल ११ मिनिटं गाडीतच बसून राहिले
घराघरात पोहचवला कंप्युटर
जगभरात घराघरात कंप्युटरचे युग आणण्याचे श्रेय हे बिल गेट्स यांना जाते. त्यावेळी कंप्युटर केवळ वैज्ञानिक उपकरण म्हणून ओळखले जायचे. हा विचार अतिशय थुकरट आणि असंभव असेल असे वाटायचे. पण कंपनीच्या ग्राफिक युजर इंटरफेसने लोकांमध्ये कंप्युटरला लोकांमध्ये अप्रत्याक्षित रुपात लोकप्रिय बनवले आणि कंप्युटर पर्सनल कंप्युटरमध्ये रुपांतर झाला.