Home » दुसर्‍या शहरात झालंय ट्रान्सफर? तर कोणत्याही अडचणीशीवाय रेल्वेने ‘अशी’ मागवा तुमची बाईक

दुसर्‍या शहरात झालंय ट्रान्सफर? तर कोणत्याही अडचणीशीवाय रेल्वेने ‘अशी’ मागवा तुमची बाईक

0 comment
Bike by train
Share

आपण सर्वजण अनेकदा किंवा कधी ना कधी तरी रेल्वेने लहान किंवा मोठ्या अंतराचा प्रवास करतो. रेल्वेने प्रवास करणे खूप रोमांचक असते. कधी आपण आपल्या प्रियजनांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जातो, तर कधी मित्रांसोबत फिरायला जातो. यावेळी आपल्याकडे काही ना काही सामान असते. कधी ते कमी, हलके असते, तर कधी ते मोठे आणि जड असते. (Bikes sent process for train in Marathi)

रेल्वेने कोणताही माल कुरिअर करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सामान आणि दुसरे म्हणजे पार्सल. रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकता ते सामान. पण प्रवासादरम्यान सामान नेण्यासाठी काही मर्यादा आहेत. तर, पार्सलचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी वस्तू पाठवत आहात, परंतु त्यासोबत प्रवास करू शकत नाही.

जर तुम्हाला बाईक (दुचाकी) पार्सल करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. स्टेशनवर एक पार्सल काउंटर असते, जिथे तुम्हाला याच्याशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. बाईक पाठवण्यापूर्वी काही कागदपत्रे तयार करावी लागतात. आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत आणि छायाप्रत दोन्ही सोबत ठेवा. यानंतर बाईक पार्सल करण्यापूर्वी, त्याची पेट्रोल टाकी तपासली जाईल. (Bikes sent process for train in Marathi)

ज्या दिवशी तुम्हाला बाईक पाठवायची आहे, त्या दिवसाच्या किमान एक दिवस आधी तुम्हाला बुकिंग करावी लागेल. बाईकचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याची कागदपत्रे जवळ असावीत. तुमचे ओळखपत्र, जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. तुमच्यासोबत ठेवावे. बाईक चांगली पॅक केलेली असावी, विशेषतः गाडीची हेडलाइट. बाईकमध्ये पेट्रोल नसावे. जर गाडीत पेट्रोल असेल, तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. (Bikes sent process for train in Marathi)

हे देखील वाचा: कठीण काळात खंबीर उभे राहण्यासाठी चाणाक्यांची ‘ही’ सुत्रे ठेवा लक्षात

रेल्वेने माल पाठवताना वजन आणि अंतरानुसार भाडे आकारले जाते. रेल्वे हे दुचाकी वाहतुकीचे सर्वात स्वस्त आणि जलद साधन आहे. पार्सलच्या तुलनेत सामानाचे शुल्क जास्त असते. ५०० किमी अंतरापर्यंत बाईक पाठवण्याचे सरासरी भाडे १२०० रुपये आहे, मात्र ते थोडेफार बदलू शकते. याशिवाय बाईकच्या पॅकिंगसाठी सुमारे ३००-५०० रुपये खर्च होऊ शकतात. (Bikes sent process for train in Marathi)

रेल्वेने बाईक पाठवायची असेल, तर ती तुमच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. पण तुमच्याकडे बाईकची सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की, आरसी आणि विमा असणे आवश्यक आहे. यासोबतच बाईक चांगली पॅक केलेली असावी, जेणेकरून तिचा कोणताही भाग खराब होणार नाही. तसेच, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार्सलसाठी बुकिंग केले जाते. मात्र सामानाचे बुकिंग केव्हाही करता येते. (Bikes sent process for train in Marathi)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.