हिमाचल प्रदेशात हे एक बर्फाच्छादित डोंगराळ राज्य असून आपल्या सुंदर अशा हिरवळ निसर्गाने नटला आहे. येथे प्राचीन वास्तूंचा ठेवा ही आहे. परंतु तुम्हाला कुल्लू मधील एका अनोख्या आणि रहस्यमय मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्याचे धार्मिक महत्व फार आहे. खरंतर हे मंदिर बिजली महादेवाच्या रुपात ओळखले जाते. मंदिर कुल्लू घाटातील सुंदर गाव काशवरी येथे आहे. जे २४६० मीटर उंचीवर स्थित आहे. मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. याला भारतातील सर्वाधिक प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. तर याच मंदिराच्या रहस्यमय कथेबद्दल जाणून घेऊयात. (Bijli mahadev mandir)
मंदिराच्या आतमध्ये असलेल्या शिवलिंगावर प्रत्येक १२ वर्षांनी वीज पडते. ही वीज रहस्यमय पद्धतीने त्यावर पडत असून त्यामागील रहस्य हे कोणालाही माहिती नाही. वीज पडल्याने या शिवलिंगाचे तुकडे होतात खरं. पण असे मानले जाते की, मंदिराचे पुजारी ते तुकडे एकत्रित करुन डाळीचे पीठ, काही अनसॉल्टेड तुपापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणापासून जोडतात. काही महिन्यांनीते शिवलिंग आधी होते तसेच दिसू लागते.
स्थानिक लोकांनुसार पीठासीन देवता क्षेत्रातील स्थानिकांना कोणत्याही वाईट गोष्टींपासून दूर ठेवू पाहत असल्याने ती वीज शिवलिंगावर कोसळते. काही लोकांचे असे मानणे आहे की, वीज एक दिव्य आशीर्वाद असून ज्यामध्ये विशेष शक्ती असतात. हे सुद्धा मानतात की, देवता स्थानिक लोकांचा बचाव करतात.
मंदिराची कथा अशी सांगितली जाते की, एकदा कुल्लू घाटात कुलंत नावाचा एक राक्षस राहत होता. एक दिवस त्याने विशाल सापात आपले रुप धारण केले आणि संपूर्ण गावात सरपडत सरपडत लाहौर-स्पिटीच्या मथन गावात पोहचला. असे करण्यासाठी त्याने व्यास नदीला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात पूर आला. भगवान शंकरांनी राक्षसाला पाहित होते. संतप्त होऊन त्यांनी त्याच्या सोबत युद्ध करण्यास सुरुवात केली. शंकराने राक्षसाचा वध केल्यानंतर आणि सापाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे एका विशाल पर्वत मध्ये रुपांतर झाले. यामुळे त्याचे नाव कुल्लू असे पडले. वीज पडण्यामागील लोकांची अशी मान्यता आहे की, भगवान शकंराच्या आदेशाने भगवान इंद्र प्रत्येक १२ वर्षांनी वीज पाडतात. (Bijli mahadev mandir)
हेही वाचा- कंबोडियातील प्राचीन भारतीय मंदिरांचा इतिहास
जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर ते कुल्लू पासून २० किमी दूर आहे. तेथे पोहचल्यानंतर ३ किमीचा ट्रेक करावा लागेल. हा ट्रेक पर्यटक आवर्जुन करतात. घाट आणि निसर्गाचा आनंदघेण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.