Home » ७६ वर्षांच्या शिक्षकाने आपल्या बायकोची हत्या केली !

७६ वर्षांच्या शिक्षकाने आपल्या बायकोची हत्या केली !

by Team Gajawaja
0 comment
Birbal Prasad
Share

समजा तुमचं लग्न झालं आहे  आयुष्य सुखात होत, पोरं झाली.आणि त्या पोरांनाही पोरं झाली. तुम्ही आपल्या पत्नीसोबत ५० वर्ष चांगला संसार केला. यानंतर अचानक वयाच्या ७६व्या वर्षी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या एका अफेअर बद्दल तिनेच सांगितलं यावर तुमची Reaction काय असेल ? म्हातारपणात तर तुम्हाला त्याचा काही फरकसुद्धा पडणार नाही. पण बिहारमध्ये एका ७६ वर्षांच्या शिक्षकाने आपल्या पत्नीची अत्यंत भयानक पद्धतीने हत्या केली, कारण तिने ५७ वर्षानंतर आपल्या एका अफेअरबद्दल त्याला सांगितलं. (Birbal Prasad)

बिहार म्हणजे गुन्हेगारीचं माहेरघर पण बिहारमध्ये केवळ गुंडेच गुन्हे करतात असं नाही, तर उत्तम शिकलेले आणि स्वत शिक्षकसुद्धा गुन्हे करतात, हे आता समोर आलं आहे. बिहारच्या अरवल जिल्ह्यातील जमूहरी गावातील बिरबल प्रसाद हे ७६ वर्षांचे रिटायर्ड शिक्षक ! आपली पत्नी सुमती हिच्यासोबत ५० वर्ष त्यांनी सुखाचा संसार केला पोरं-सुना-नातवंड सगळे एखाच घरामध्ये गुण्यागोविंदाने नांदत होते. सगळं छान सुरळीत चाललं होतं. म्हातारपणातलं  Typical आयुष्य बिरबल प्रसाद जगत होते. म्हणजे खायचं-प्यायचं आणि एका जागी बसून राहायचं, कधीतरी नातवंडांमध्ये रमून राहायचं.

पण बिरबल प्रसाद यांच्या मनात एक वादळ होतं, ज्याबद्दल त्यांनी फारसं कोणाशी काही बोललं नव्हतं, ते म्हणजे ४५ वर्षांपासून आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल असलेली शंका, तुम्हाला इथेच प्रश्न पडला असेल की, ५७ वर्ष सोबत राहणारी बायको कशाला कोणाशी अनैतिक संबंध ठेवेल. पण त्यांची हि शंका एक दिवस खरी निघाली. सुमतीसोबत लग्नानंतर त्यांची शिक्षकाची नोकरी सुरू झाली, त्यानंतर अनेक ठिकाणी ते ट्यूशनसुद्धा घ्यायचे. याचदरम्यान मुलांना शिकवण्यासाठी ते आपल्या बायकोला सोडून दुसरीकडे शिफ्ट झाले होते. आणि त्यांची बायको सुमती ही यादरम्यान बिरबल यांच्या काकांकडेच राहिली होती. (Birbal Prasad)

काही दिवस सगळं सुरळीत होतं, मात्र नंतर बिरबलला सुमतीबद्दल काही न काही गोष्टी ऐकू यायला लागल्या. याचदरम्यान त्याला हेसुद्धा कळलं की, त्याच्या काकाचे आणि बायकोचे अनैतिक संबंध आहेत. मात्र बिरबलने यावर कधीच विश्वास ठेवला नाही. माझी पत्नी पवित्र आहे आणि ती असे कृत्य करणार नाही, असं त्याला वाटायचं. पण तरीही हीच शंका बिरबलच्या मनात घर करून होती. अनेकदा पत्नीसोबत यावरून वाद झाले होते. मात्र पत्नीने या गोष्टीवरून नकार दिला होता. ८ वर्षांपूर्वी त्याच काकांचं निधन झालं पण आता ५७ वर्षानंतर सुमतीने या गोष्टीची कबुली दिली की माझे तुमच्या काकांसोबत अनैतिक संबंध होते.

बिरबलचा इतक्या वर्षांचा राग आणि भडास बाहेर निघाली आणि आता त्याच्या मनात सुमतीची हत्या करायची याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे बिरबलने संधी साधली आणि सुमतीसोबत भांडण सुरू केलं. यावेळी त्याचा सगळा राग बाहेर पडला आणि धारधार चाकू घेऊन त्याने तिची हत्या केली. ज्यादिवशी हे घडलं, त्याचदिवशी म्हणजेच २२ जुलैला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. बिरबलला सुमतीचे ५७ तुकडे करायचे होते कारण त्यांच्या लग्नाला ५७ वर्ष झाली होती, मात्र त्याने १२ तुकडे केले, इतक्यात त्याच्या घरच्यांनी हे कृत्य करताना पाहिलं. (Birbal Prasad)

=================

हे देखील वाचा : उरणमधील यशश्री हत्याकांड !

================

दुपारच्या वेळी नातू शाळेतून घरी आला आणि घरात रक्त बघून तो ओरडायला लागला. बिरबल पकडला गेला आणि याचवेळी त्याने तो चाकू घेऊन सून-नातवंड आणि गावकऱ्यांनासुद्धा धमकी द्यायला सुरुवात केली. मात्र नंतर पोलिसांद्वारे बिरबल पकडला गेला आणि त्याने सगळ्या गोष्टी कबूल केल्या. यावेळी त्याने पोलिसांना सांगितलं की, मला मुळातच सुमतीसोबत लग्न करायचं नव्हतं. पण माझे काका दीप साओ यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं. सुमती माझ्या काकांची जास्त सेवा करायची, हे तिनेच कबूल केलं, त्यामुळे मी तिची हत्या केली. आता वयाच्या ७६व्या वर्षी त्यांना अटक करण्यात आली आहे.

बदला घेण्यासाठी माणूस कोणत्याही वयात कोणत्याही थराला जाऊ शकतो, याच हे जिवंत उदाहरण ! सध्या देशभरात हत्या करून तुकडे करण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यातच बिहारच्या या घटनेमुळे तर अनेकांना थरकाप उडाला आहे. ५० वर्षानंतरही चक्क आपल्या बायकोच्या बाबतीत बदल्याची भावना ठेवणाऱ्यांना बघून आजच्या पिढीवर याचा काय परिणाम घडू शकतो, याचाच आता विचार करावा लागेल. (Birbal Prasad)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.