Home » भारतात सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा साप !

भारतात सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा साप !

by Team Gajawaja
0 comment
Vasuki Indicus
Share

आपल्या भारतात जगातल्या सर्वात मोठया सापाचे अवशेष गुजरातमध्ये सापडले आहेत. कोणाचाही विश्वास बसणार नाही, एवढे महाकाय जीव आपल्या भारतीय उपखंडात ५० दशलक्ष वर्षांआधी अस्तित्वात होते. भारतीय पुराणांमध्ये अशा विशाल सजीवांचे आणि सापांचे पुरावे आपल्याला मिळतात.

लहानपणी Anaconda चित्रपटाची आपल्या मनात एक वेगळीच भीती होती. तो भला मोठा साप कित्येक दिवस आपल्या नजरेसमोरून जातच नव्हता. पण राहून राहून एकच वाटायचं की, इतका मोठा साप हा फक्त चित्रपटांमध्येच असू शकतो. पण अशा अनाकोंडापेक्षाही महाकाय साप आपल्या भारतात सापडला, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. गुजरातमध्ये एका अशा सापाचे अवशेष सापडले आहेत, जो तब्बल 15 मीटरपेक्षाही लांब आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या भारताचं आणि महाकाय सापांच एक वेगळचं नातं आहे. पौराणिक कथांमध्ये आपण अनेक सापांची नावं ऐकलीच आहेत. भगवान श्रीकृष्ण यांचं कालियामर्दन, भगवान विष्णु ज्यावर निद्रावस्थेत आहेत तो शेषनाग, समुद्र मंथनासाठी देवतांना आणि राक्षसांना, ज्या सापाने मदत केली तो भगवान शंकराच्या गळ्याभोवती असलेला वासुकी ! आणि आता अशाच वासुकीसारख्या भल्या मोठ्या सापाचे अवशेष गुजरात मध्ये सापडलेत ज्याच्यामुळे अख्खं जग हादरलय.  (Vasuki Indicus)

आतापर्यंत जगातला सर्वात मोठा साप मानला जायचा तो म्हणजे टायटनोबुआ ! ज्याची लांबी 14 मीटर होती. या सापाचे अवशेष दक्षिण अमेरीकेत आढळले होते. यानंतर 2005 साली गुजरातच्या कच्छमध्ये आयआयटी रूरकीच्या शास्त्रज्ञांना उत्खननात २७ हाडांचे अवशेष सापडले. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की, हे अवशेष एखाद्या महाकाय मगरीचे असतील. पण इतक्या वर्षांनंतर अखेर हा निष्कर्ष लागला की, हे अवशेष मगरीचे नसून तो एक साप आहे. (Vasuki Indicus)

साप इतका मोठा असू शकतो, यावर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसत नव्हता, मात्र अभ्यास आणि संशोधनानंतर काहीच दिवसांपूर्वी हे अवशेष एका महाबलाढ्य सापाचे आहेत, यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलं. हा पृथ्वीच्या इतिहासातील आजपर्यंत ज्ञात असलेला सर्वात मोठा साप असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. वासुकी या भगवान शंकराच्या गळ्याभोवती असलेल्या नागावरूनच याचं वासुकी इंडिकस असं ठेवण्यात आलं आहे.

आज पासून सुमारे 47 ते 50 दशलक्ष वर्षांंपूर्वी इओसेन कालखंडात जेव्हा हिमालय पर्वतरांगसुद्धा उदयास आली नव्हती, तेव्हा भारतात वासुकी इंडिकस हे साप अस्तित्वात होते. प्रचंड वजनदार आणि 50 फुट लांबी असल्याने वासुकी इंडिकस अजगरासारखाच धीम्या गतीने शिकार करत असावा, असा निष्कर्ष काढला गेला आहे. पुराणकथांमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या सापासारखेच हे मोठे साप आहेत. (Vasuki Indicus)

====================

हे देखील वाचा : भारतातील ही शिवमंदिरे कपल्ससाठी आहेत खास, लग्नानंतर नक्कीच दर्शन घ्या

====================

हा साप एवढा महाकाय असण्यामागे एक कारण असू शकतं की, सापांना वातावरणात उष्णता हवी असते आणि तेव्हा पृथ्वीचं आणि भारत उपखंडाच तापमान वासुकी इंडिकस साठी साजेसं होतं. याशिवाय अन्नसाखळीत ज्यांची शिकार होऊ शकत नाही अशा प्राण्यांच्या श्रेणीत तो असावा, म्हणून वाढत वाढत तो एवढा विकसित झाला असावा. वातावरणाच्या दृष्टीने त्याकाळी भारतीय उपखंडात असे अनेक महाकाय प्राणी अस्तित्वात असतील असाच निष्कर्ष आता लावला जातोय. (Vasuki Indicus)

भारतात आतापर्यंत हव तसं उत्खनन झालेल नाहीये, भारतीय पुराणाचा आधार घेऊन जर आपण उत्खनन केलं तर भारतात अशा महाकाय सजीवांच्या अवशेषांचा खजिना आपल्याला मिळू शकतो. आता एक गोष्टदेखील इथे महत्त्वाची ठरते, ते म्हणजे पुराणात इतक्या मोठ्या सापांचा उल्लेख आहे, म्हणजे एका ठराविक काळापर्यंत हे सांप अस्तित्वात होतेच, याच सापांचं दर्शन आपल्या पूर्वजांना घडलं आणि त्यांनीच या सापांचं वर्णन प्राचीन साहित्यात करून ठेवलं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.