Home » हे आहेत भारतात झालेले प्रमुख ‘घोटाळे’; अब्जावधी रुपयांच्या या घोटाळ्यांचे पुढे काय झाले?

हे आहेत भारतात झालेले प्रमुख ‘घोटाळे’; अब्जावधी रुपयांच्या या घोटाळ्यांचे पुढे काय झाले?

by Team Gajawaja
0 comment
Biggest Indian Scams
Share

सध्या ईडी हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो.  ईडी म्हणजेच Enforcement Directorate म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय. आर्थिक घोटाळ्यांसदर्भात तपास करणे हे ईडी चे मुख्य कार्य आहे.  या ईडीच्या पडणाऱ्या धाडी आणि त्यात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या राशी बघितल्या की, सर्वसामान्य माणसे अक्षरशः तोंडात बोटं घालतात. मात्र भारतात असे काही आयकॉनिक घोटाळे झाले आहेत, की त्यातील झालेली आर्थिक फसवणूक पाहून केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातल्या लोकांना आश्चर्य वाटलं होतं. त्याबद्दलच थोडंसं (Biggest Indian Scams)-

 2G स्पेक्ट्रम  घोटाळा 

या सर्व घोटाळ्यांचा बादशहा म्हणून उल्लेख होतो तो 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा. सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्याचा उल्लेख, इतर सर्व घोटाळ्यांना लाजवेल अशा शब्दात करुन त्याची व्याप्ती स्पष्ट केली होती.   तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांना 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात कॅगने दोषी ठरवल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. ज्यामुळे राष्ट्रीय तिजोरीचे सुमारे 176,000 कोटीचे नुकसान झाले.  

हा घोटाळा म्हणजे वायरलेस रेडिओ स्पेक्ट्रम आणि दूरसंचार मंत्रालयाने खाजगी ऑपरेटर्सना वाटप करण्यात आलेल्या परवान्यांसंदर्भात होता. यात लिलाव न करता जी कंपनी आधी येईल तिला कंत्राट दिलं गेलं. 

तेलगी घोटाळा 

तेलगी घोटाळ्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठे हादरे दिले.  12 राज्यांमध्ये झालेल्या या घोटाळ्याची पाळंमुळं महाराष्ट्रात होती. अब्दुल करीम तेलगी हे नाव त्यातलं प्रमुख. नकली स्टॅम्प पेपर छापण्याच्या या घोटाळ्याने सर्व देशाला हादरवून सोडलं.  

राजकारणी आणि नोकरशहा यांची मिलीभगत असल्याचा ठपका यात ठेवण्यात आला होता. अनेक सरकारी विभागांच्या पाठिंब्याने झालेला 20,000 कोटींहून अधिक रक्कमेचा हा घोटाळा झाला होता. (Biggest Indian Scams)

सत्यम घोटाळा 

सत्यम घोटाळा हा भारतीय कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखला जातो. तब्बल 14,000 कोटींचा हा घोटाळा आजही अनेकांच्या स्मरणात असेल. कंपनीचे तत्कालीन चेअरमन, रामलिंग राजू याच्यावर अनेक वर्षांच्या हिशोबात फसवणूक केल्याचा आणि सत्यमचा महसूल आणि नफ्याचे आकडे फुगवून सादर केल्याचा आरोप होता. हा फरक भरुन न काढता आल्यामुळे राजूने गुन्हा कबूल करण्याचा निर्णय घेतला. 

भारतातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या आयटी कंपनीने बाजार भांडवलात 100 अब्ज रुपये गमावले. सत्यम घोटाळ्यामुळे शेअर्स बाजचारावर तर संक्रात आली. मुंबई शेअर बाजारात एकाच दिवसात सत्यमच्या शेअरची 78 टक्‍क्‍यांनी घसरण झाली.

कॉमन वेल्थ स्पर्धां घोटाळा 

भारताने 2010 मध्ये कॉमन वेल्थ स्पर्धांचे शानदार आयोजन केले. मात्र या स्पर्धांमधील भारताच्या आयोजनापेक्षा चर्चा झाली ती त्यातील घोटाळ्याबाबत.  कारण कॉमन वेल्थच्या नावावर  अंदाजे 35,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 2010 मध्ये भारताकडे कॉमन वेल्थ गेम्सचं यजमानपद होतं. मात्र दुदैवानं स्पर्धांपेक्षा त्यातील कामांत केलेला घोटाळा आणि जास्त दराने दिलेल्या निविदा अधिक गाजल्या. (Biggest Indian Scams)

या घोटाळ्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या पक्षांना पैसे देणे, कराराच्या अंमलबजावणीत होणारा विलंब, वाढीव किंमत लावून दिलेली बीले, कंत्राटीद्वारे उपकरणे खरेदीमध्ये घोटाळा निधीचा गैरवापर अशा गोष्टी आहेत.  या घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून राष्ट्रकुल खेळ आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर सीबीआयने एप्रिल 2011 मध्ये आरोप लावले आणि त्यांना तरुंगवास झाला.  

=====

हे देखील वाचा – रणवीरच्या ‘न्यूड’ फोटोशूटमागचं कारण काय? नेटिझन्स म्हणतायत ‘ओ रणवीर… 

=====

शेअर बाजार घोटाळा 

बिग बुल म्हणून प्रसिद्ध झालेल्या, हर्षद मेहताने बँकिंग व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत 1992 मध्ये मुंबई स्टॉक एक्स्चेंजमध्ये अनेक विभागांमध्ये प्रीमियमवर शेअर्सचे व्यवहार करून वाढ घडवून आणली. कमी किंमतीच्या शेअर्समध्ये कृत्रिम वाढ घडवून आणल्याने शेअर्स बाजारात फुगवटा निर्माण झाला. हर्षद मेहताने एप्रिल 1991 ते मे 1992 या कालावधीत बँकांकडून सुमारे 5,000 कोटी रुपये (50 अब्ज रुपये) स्टॉक ब्रोकर्सकडे वळवले. यात हर्षद मेहताचा करोडोंचा फायदा झाला. 

हा घोटाळा उघडकीस आल्यावर त्याच्यावर 70 हून अधिक फौजदारी गुन्हे दाखल झाले. हर्षद मेहताला अटक झाली आणि तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. या घोटाळ्यानं शेअर्स बाजार अनेक वर्ष मागे गेला.   हर्षदच्या आयुष्यावर स्कॅम 1992 ही वेबसिरीज आणि बिग बुल हा चित्रपटही आला आहे.  

बोफोर्स घोटाळा

भारतीय राजकारणात गाजलेला आणखी एक घोटाळा म्हणजे बोफोर्स घोटाळा. 1980 च्या दशकात, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि हिंदुजा नावाच्या एनआरआय कुटुंबासह क्वात्रोची हा इटालियन दलाल आणि अजिताभ बच्चन यांच्यावर भारताच्या फील्ड हॉवित्झर तोफांचा पुरवठा करण्यासाठी बोली जिंकल्याबद्दल बोफोर्स एबीकडून दलाली मिळाल्याचा आरोप होता.  

स्वीडिश स्टेट रेडिओने बोफोर्स या स्वीडनमधील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादक कंपनीने केलेल्या गुप्त ऑपरेशनबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसारित केला. ज्यामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जवळच्या काँग्रेसच्या सदस्यांना $16 दशलक्ष कथितरित्या दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. (Biggest Indian Scams)

चारा घोटाळा 

बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांचे नाव जोडले गेले ते चारा घोटाळ्याशी.  राकेश अस्थाना या सीबीआयच्या अधिकाऱ्याने हा 900 कोटींची घोटाळा उघडकीस आणला. त्यात लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य 500 जणांचा समावेश होता. या घोटाळ्यामध्ये पशुधनाचे खाद्य, त्यांना वैद्यकीय सेवा व उपकरणे यांची कंत्राटे तयार करण्यात आली होती.  ती वाढीव रक्कम लावून तयार करण्यात आली होती.  

अर्थात भारतात झालेले घोटाळे आणि त्यातील रक्कम बघता सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतात. एका अहवालानुसार 1992 पासून, झालेल्या घोटाळ्यांची रक्कम 80 लाख कोटी किंवा $1.80 ट्रिलियनपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.  ही रक्कम विकास कामांवर खर्च झाली असती तर आता आपला देश कुठे असता हे सांगणे नकोच.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.