Home » ‘भाऊच्या धक्क्यावर’ विशाखा सुभेदाराने व्यक्त केला रोष

‘भाऊच्या धक्क्यावर’ विशाखा सुभेदाराने व्यक्त केला रोष

by Jyotsna Kulkarni
0 comment
Big Boss Marathi 5
Share

बिग बॉस मराठी सुरु होऊन एक महिना झाला आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या शो ने प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे सुद्धा लक्ष वेधले आहे. सुरु झाल्यापासून सतत वाद आणि मोठी भांडणं यांमुळे हा शो गाजत आहे. या घरात निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या दोघी सतत घरातील इतर सदस्यांशी वाद घालताना दिसतात. त्यांना प्रेक्षकांनी भांडकुदळ सदस्य ही पदवी देखील बहाल केली आहे.

एवढेच नाही यांच्याबद्दल कलाकारांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. घरातील सदस्यांमध्ये देखील काही मोजके सदस्य सोडले तर सर्वच सदस्य निक्कीला बोलताना दिसतात. निक्कीने घरात जाताच तिचा ग्रुप बनवला होता. मात्र आता तर तिच्या ग्रुपमधील सदस्य देखील तिच्या विरोधात जाताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर देखील रितेशने अनेकदा निक्कीला कडक शब्दात समज दिली मात्र आता याच भाऊंच्या धक्क्यावर प्रेक्षक निक्कीमुळे नाराज होताना दिसत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदाराने देखील नुकताच झालेला भाऊचा धक्का आणि निक्कीचा अनसीन अनदेखामधील एक व्हिडीओ शेअर करत तिच्या नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

विशाखाने तिच्यापोस्टमध्ये लिहिले,

“काल निक्की सोडून सगळेच चुकले… जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले.. अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य चुकलंच! त्यांच्यावर आधारित असा (अरबाज + निक्की) तुमचा Game नकोच असायला.. अरबाज आणि निक्की त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा..!

आता धक्का… B team लाच.. आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा

निक्कीने डबा फोडला… तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा Game होता. मग, अभिजितला त्याक्षणी team b ने सपोर्ट न करणं हा त्यांचा game असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल… Individual game आणि team स्पिरिटचा game आहे. घेतला एकत्र डिसिजन… मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही का? आणि ऑप्शन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचा? फक्त b team ला का धारेवर धरलं जातं??

आता जरा निक्की बद्दल…
या बाई… निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री.
आणि हा ( मी जो post करतेय तो )video पाहिला मी आणि असं वाटलं की ही घरून ठरवूनच आलीय, एक handsome सदस्य बिग बॉसने घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की ) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचा ही फायदा घेणार… आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार!

अरे हे काय आहे??? किती स्वार्थी असावं..? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजित निमूटपणे कसं ऐकून घेतो… ही निक्कीची सो called स्ट्रेटेजी..?? या आधी हे एकमेकांमध्ये गुंतणं आम्ही पाहिलंय..(पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या season मध्येच ऐकला, पाहिला.
अरबाज वैभव भिडले नाहीत.. तशा निक्की आणि जान्हवी पण भिडल्या नाहीत.. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं.. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाजला…!”

======

हे देखील वाचा :  पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा

======

दरम्यान विशाखा बिग बॉसमध्ये पंढरीनाथ कांबळे या तिच्या मित्राला पाठिंबा देताना दिसत आहे. पॅडी दादा टीम बी मध्ये असल्याने ती आपोआपच टीम बी ला सपोर्ट करत आहे. विशाखा अनेकदा बिग बॉसबद्दल तिचे परखड मत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आजही तिच्या पोस्टला नेटकऱ्यांनी संमती दर्शवली आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.