Home » “पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल

“पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vishakha Subhedar
Share

बिग बॉसमध्ये घरातील सर्व सहभागी सदस्यांना काही ना काही टास्क दिले जाते. या टास्कमध्ये होणारी भांडणं, वाद यांमुळे हा शो गाजत असतो. बिग बॉस मराठीचे सध्या सुरु असलेले पर्व तुफान गाजत आहे. हे पाचवे पर्व इतर मागच्या चार पर्वांपेक्षा अनेक अर्थाने वेगळे ठरत आहे. या पर्वाला खास करत आहे रितेश देशमुखचे तडाखेबाज सूत्रसंचालन. या पर्वामध्ये सहभागी स्पर्धक देखील खूपच मोठे कलाकार आहेत.

वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबतच अनेक स्टार लोकं घरात आहेत. अशातच बिग बॉसने घरातील काही सदस्यांना एक शिक्षा दिली. ही शिक्षा खूपच वेगळी आणि हटके होते. यात बिग बॉसने सदस्यांना एक दिवस फक्त उकडलेले अन्न खायला सांगितले. हे कार्य सांगताना बिग बॉसने सांगितले की,
“आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठीदेखील चूल पेटणे शक्य होत नाही. या परिस्थितीची एक झलक तुम्हाला मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेले अन्न खा”.

‘बिग बॉस’चे हे बोलणे ऐकून घरातील सर्वच सदस्य भावुक झालेले दिसले. मात्र हे बोलणे ऐकून पंढरीनाथ कांबळे यांना रडूच कोसळले. बिग बॉसचे हे बोलणे ऐकून पॅडी यांना अश्रू अनावर झाले याबद्दल त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री असलेल्या विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली आहे. “आपला पॅडी का रडला?” असे कॅप्शन देत विशाखा यांनी पंढरीनाथ यांचा एक किस्सा सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)


विशाखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “आपला पॅडी का रडला???
खरं सांगू का..ह्यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिलाय.. अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी… पंढरीनाथ.
एक किस्सा आठवला..असंच आम्ही प्रयोगाला जात होतों, रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळले की तुमचा ठिकाणी.. असं म्हणाली.

त्यावर पॅडी म्हणाला कीं अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे… हसलो..त्यावर तीने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला.. आणि आणि आम्ही थोडं पुढे गेलो.. त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत?? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं.. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या तिचा नवरा त्यांची मासेमारी ची बोट त्यावरचे कामगार सगळं .. तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं..

तिच आपल दर काही वाक्यानंतर चालू होतं” बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले…” कधीच नाही बसले ग गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरून गाड्या जायच्या,बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत..! मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडी ने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्ही मध्ये शुभविवाह दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी.. हे सांगितल्यावर तिने ओळखलं.. साडीत वेगळ्या दिसता तुम्ही… भूमी आकाश रागिणी वांली सिरीयल.. मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तस निरखून पाहिल नाही…असं म्हणाली..आभार वैगरे मागुन ती निघून गेली..

तिचा आनंद पाहून पॅडी ला आनंद होत होता,आपल्या आईला सोडल असं feel होत होतं.. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघ ही अबोल .. त्यांन त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला… अ सा आहे.. पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारा.. त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे.. थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली कीं कायमची.. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तस बोलतो. आणि गरज पडली तरच.. सुरज पहिल्या दिवसापासून बेड वर पॅडी च्या बाजूला झोपला.. त्यावेळी तर त्यांची ओळख ही नव्हती.. हा… आलय? ते पासून त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता..”

दरम्यान पंढरीनाथ यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. पंढरीनाथ अर्थात पॅडी हे मराठी मनोरंजनविश्वातील मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे. सध्या ते बिग बॉसच्या घरात आहे. विशाखा सुभेदार नेहमीच त्यांच्या चांगला मित्र आणि सहकलाकार असलेल्या पंढरीनाथाबद्दल नेहमीच पोस्ट करत त्यांना पाठिंबा देत आहेत. याआधी देखील विशाखा यांनी अनेक पोस्ट शेअर करत पंढरीनाथ यांना पाठिंबा दिला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.