Home » वर्षा उसगांवकर ठरल्या घराच्या नवीन कॅप्टन

वर्षा उसगांवकर ठरल्या घराच्या नवीन कॅप्टन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Varsha Usgaonkar
Share

बिग बॉस मराठीमध्ये सतत काही ना काही घडताना दिसत आहे. या घरात सतत आणि झपाट्याने घडणाऱ्या घटना पाहून प्रेक्षकांना देखील खूपच मज्जा येत आहे. घरात अगदी पहिल्याच दिवशी दोन ग्रुप पडले आणि हे दोन ग्रुप खूपच गाजले. मात्र नंतर अशा गोष्टी घडल्या की हे ग्रुप तुटले आणि एकमेकांच्या सोबत असलेले सदस्य एकमेकांच्या विरोधात गेले तर विरोधात असलेले सदस्य एकत्र आले. हे पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र शेवटी खेळ आहे त्यामुळे अशा गोष्टी घडणार हे मानून सर्व हा शो नियमीत बघत आहे.

बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठे पद म्हणजे कॅप्टनशिप. या घराची पहिली कॅप्टन होण्याचा मन अंकिता वालावलकरला मिळाला होता. त्यानंतर अरबाज पटेल कॅप्टन झाला मात्र त्याने घरासाठी बीबी करन्सी मिळवण्यासाठी त्याने त्याची कॅप्टन्सी निक्कीला दिली. निक्कीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये मोठा गोंधळ झाला. दरम्यान शुक्रवारी पार पडलेल्या टास्कमध्ये वर्षा उसगांवकर यांनी कॅप्टन्सी मिळवली आहे.

आता एक आठवडा वर्षा उसगांवकर या घराच्या नवीन कॅप्टन असतील. कॅप्टन झाल्यामुळे त्यांना एक फायदा मिळाला आहे, आणि तो म्हणजे येणाऱ्या नवीन आठवड्यात वर्षाजी ह्या येणाऱ्या आठवड्यात त्या घरातून बाहेर जाण्यासाठी होणाऱ्या नॉमिनेशनपासून सुरक्षित राहतील. वर्षा या आधीच्या आठवड्यात देखील कॅप्टन होऊ शकल्या असत्या मात्र त्यांनी त्या आठवड्यांमध्ये कॅप्टन होण्याच्या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण यावेळी त्यांनी खेळात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि त्या जिंकून कॅप्टन झाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

दरम्यान निक्कीचा कॅप्टनपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर घरात नवा कॅप्टन निवडण्यासाठी एक नवीन टास्क संपन्न झाला. या टास्कचे नाव होते ‘मुंज्या’ टास्क. यात कॅप्टनपदासाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांना मुंज्यासमोर जाऊन आपण कसे चांगले कॅप्टन होऊ शकतो आणि इतर सदस्यांपेक्षा आपण कसे उत्तम आहोत यावर बोलायचे. या टास्कमध्ये अखेरच्या फेरीपर्यंत वर्षा, सूरज, अंकिता, वैभव आणि जान्हवी असे पाच जण बाकी होते.

याआधी अंकिताने वर्षा मॅम कॅप्टन व्हायला हव्यात या इच्छेसाठी या गेममधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, वैभव आणि जान्हवी दोघेही कॅप्टनपदासाठी इच्छुक होते. मात्र वर्षा उसगांवकरांनी जान्हवी आणि वैभवसमोर त्यांचे मुद्दे अत्यंत मुद्देसूद आणि प्रभावीपणे मांडले. शिवाय वर्षाजी यांनी वैभव, जान्हवीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. तसेच ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये त्या कशा चांगल्या खेळल्या हे सर्वांसमोर स्पष्टपणे मांडले. तरी देखील जान्हवी आणि वैभव माघार घेत नव्हते. यामुळे बिग बॉसने मग हस्तक्षेप केला. त्यांनी एक घोषणा केली.

======

हे देखील वाचा :  पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा

======

‘बिग बॉस’ने कॅप्टनपदासाठी कोणाची निवड करायची हे ठरवण्याचा विशेष अधिकार ‘पाताळ लोक’ टास्क हरलेल्या ‘ए’ टीमला दिला. या टीममध्ये निक्की, अरबाज, पॅडी, घन:श्याम आणि अभिजीत या पाच सदस्यांना बहुमताने जान्हवी, वैभव आणि वर्षा या तीन सदस्यांपैकी एकाची कॅप्टनसाठी निवड करायची होती. या पाच जणांनी कोणतीही वेळ न दवडता मोठ्या आनंदाने कॅप्टनपदासाठी वर्षा उसगांवकरांना पाठिंबा दिला आणि त्यांचे नाव घेतले.

वर्षा यांनी कॅप्टन पद स्वीकारल्यावर “हमारा नेता कैसा हो, वर्षा ताई जैसा हो…” अशा घोषणा घरातील सर्व सदस्यांनी दिल्या. वर्षा टास्क संपल्यावर बाहेर येताच त्यांनी सर्वांचे आभार मानले.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.