सध्या सर्वत्र फक्त एकाच शोची चर्चा आहे आणि तो शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या बिग बॉस मराठीच्या रोजच्या भागामध्ये असे काही तरी घडते ज्यामुळे पुढच्या भागापर्यंत त्या आधीच्याच भागाची जोरदार चर्चा होते. या बिग बॉसची लोकांमध्ये एवढी क्रेझ आहे की, सामान्य लोकं काय कलाकार देखील बिग बॉस न चुकता बघता आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आपले मत देखील मांडताना दिसतात.
सध्या बिग बॉसमध्ये आणि लोकांमध्ये एकच चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. ती चर्चा म्हणजे आर्याने निक्कीला लागवलेल्या चापटीची. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये वॉशरुम एरियामध्ये झटापट झाली. आर्याने, निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणून बाथरुमचा दरवाजा लावून घेतला होता. मात्र दार उघडल्यानंतर आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीला कानशिलात मारली. त्यानंतर मात्र निक्कीने एकच गोंधळ घातला. हे घडल्यानंतर टास्क त्वरीत थांबवण्यात आला. निक्कीने संपूर्ण घरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पुढे निक्कीने बिग बॉसकडे याबद्दल तक्रार केली. निक्कीची तक्रार ऐकून घेऊन ‘बिग बॉस’ने देखील त्यावर त्वरित ऍक्शन घेतली. त्यानंतर बिग बॉसने या टास्कदरम्यान घडलेल्या सर्व घटना नीट पडताळून बघण्यासाठी घरातील सर्व कॅमेऱ्यांच्या क्लिप्स पुन्हा चेक केल्या. पुढे ‘बिग बॉस’ने सांगितले, “आर्या आणि निक्कीमध्ये झालेली धक्काबुक्की आणि या टास्कदरम्यान नक्की काय घडले. याच्या सगळ्या क्लिप्स आम्ही नीट पडताळून पाहिल्या आहेत. दोघींमध्ये धक्काबुक्की होऊन आर्याने निक्कीला कानाखाली मारली आहे. हे आम्हाला दिसले. हे कृत्य निंदनीय आहे. त्यामुळे याची शिक्षा म्हणून आर्याला जेलमध्ये जावे लागेल. शिवाय या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल.”
View this post on Instagram
भाऊचा धक्का होईपर्यंत आर्याला बिग बॉसने जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिला आहे. त्यामुळे सध्या घरात असलेला कॅप्टन सुरजने बिग बॉसचा आदेश पाळत आर्याला जेलमध्ये टाकले आहे. जेलमध्ये गेल्यानंतर आर्याला रडू कोसळले आणि तिने अंकिताजवळ तिचे मन मोकळे केले. आर्या अंकिताला म्हणाली, “मला घरी जायचे आहे” त्यामुळे आता शनिवारच्या बिग बॉसच्या भागावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार आणि आर्याला काय शिक्षा देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान आर्याने निक्कीला मारल्यानंतर सोशल मीडियावर तर कमेंट्स अक्षरशः पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळींनी देखील प्रकारावर त्यांचे मत मांडले आहे. अनेकांनी आर्याला पाठिंबा देत निक्कीला ऐकवले आहे. तर काहींनी निक्कीला पाठिंबा देत हात उचलणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. आता रितेश देशमुखच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.