मराठी बिग बॉसचा चौथा आठवडा चांगलाच गाजत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच एक टास्क पार पडला आणि आता आठवड्याचा शेवट जवळ आला असूनही त्याच टास्कमध्ये झालेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्टरचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्याचा पंचनामा टास्कमध्ये जान्हवीने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान करत त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीवर भाष्य केले आहे.
जान्हवीचे हे वागणे घरातील कोणालाही आवडले नाही. कोणत्याही कलाकाराच्या करियरवर भाष्य करण्याचा अधिकार जान्हवीला दिलाच कोणी असा सवाल सगळ्यांनीच उपस्थित केला. अशातच या अपमानाचे पडसाद घराबाहेर देखील ताकदीने पडले. मराठी प्रेक्षकांनी तर हा मुद्दा उचलला सोबतच कलाकार देखील पदी कांबळे यांच्यासाठी उभे राहिले आणि पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा देऊ लागले. हे सर्व चालू असताना कालच्या भागात मात्र जान्हवीने चक्क पंढरीनाथ कांबळे यांची माफी मागितली आहे.
‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान सुरुवातीला निक्की पॅडीला ‘जोकर’ म्हणाली. त्यानंतर जान्हवीने पुन्हा एकदा पातळी सोडून पंढरीनाथ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. यामुळे तिच्या विरोधात नाराज पसरली आहे. मात्र आता तिला तिने केलेल्या चुकीची उपरती झाली असल्याचे तिने सांगितले आणि पंढरीनाथ यांची माफी मागितली.
View this post on Instagram
बुधवारच्या भागामध्ये पॅडी दादांचा अपमान केल्यामुळे जान्हवी एकटीच सोफ्यावर बसलेली दिसते. ती रडताना पाहून धनंजय दादा तिच्याकडे जातो आणि काय झाले? विचारतो. यावर जान्हवी म्हणाली, ‘मी गेम खेळताना अति बोलते दादा’ धनंजय तिची समजूत काढत तिला सांगतो, ‘ठीक आहे. आता कालचा दिवस गेला. आता नवीन दिवस उगवला आहे. हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस हे चूक नाही पण तुझे शब्द चुकतात आणि करिअरवरून बोलणे चुकीचे आहे.’
धनंजय याबद्दल पॅडी दादांना सांगतो. तेव्हा स्वतः पॅडी दादा जान्हवीकडे जातात आणि म्हणतात, ‘मला माहित होते की, तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावसे वाटेल.’ त्यांचे हे बोलणे ऐकून जान्हवी रडत-रडत त्यांना सॉरी म्हणत आणि हात जोडून माफी मागत म्हणते, ‘माझे खरंच चुकले.’
======
हे देखील वाचा : पॅडी दाच्या लेकीची जान्हवीसाठी मार्मिक पोस्ट
======
पुढे पॅडी दादा मनाचा मोठेपणा दाखवत जान्हवीला म्हणतात, ‘मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅन्ड घेता यावा की, मी या माणसासोबत काम करणार नाही. पण मी हे करू शकतो. मी विचारेन कोण आहे? जान्हवी किल्लेकर ना? बॉस मी नाही काम करणार! असं मी ठरवलं होतं. पण मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. त्यामुळे झालं गेलं राहुदेत. आता तू रडू नकोस. खेळात आपण जीव तोडून भांडूया, हा खेळ खेळूया फक्त एकमेकांचं करिअर..एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया आणि एकमेकांचा आदर ठेऊन भांडूया.’
दरम्यान, झाल्या प्रकरणी जान्हवी किल्लेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत त्यांची माफी मागितली आहे. मात्र आता तिच्या या माफीवरून देखील तिला नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी पुन्हा खडेबोल सुनावले आहे. तिची माफी नाटक आहे असे म्हटले आहे तर काहींनी रितेश देशमुखच्या विचार करून घाबरून माफी मागितल्याचे म्हटले आहे. मात्र आता या सर्वावर रितेश काय प्रतिक्रिया देतात आणि तिला काय शिक्षा देता हे पाहणे महत्वाचे असेल.