बिग बॉस मराठी सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सर्वात पुढे आहे. सहावा आठवडा सुरु झाला असून, हा शो प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. या शोमधील सदस्यांमध्ये होणारे सततचे वाद, भांडणं सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे या घरात बिग बॉस सदस्यांना अतिशय वेगवेगळे आणि रंजक टास्क देतात, जे बघताना आपल्याला मजा येते.
सध्या चालू आठवड्यामध्ये वर्षा उसगांवकर घराच्या कॅप्टन झाल्या असून त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये या आठवड्यात घराचा कारभार पार पडणार आहे. अशातच नवीन आठवडा म्हटल्यावर नवीन टास्क घरात संपन्न होणार हे सगळ्यांनाच माहित असते. अशातच आता बिग बॉसने देखील या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी नवीन भन्नाट टास्क दिला आहे. या टास्कचे नाव आहे ‘BB फार्म’ टास्क. हा टास्क देखील दोन टीममध्ये होणार आहे.
या टास्कमध्ये बिग बॉसने दोन टीम तयार केल्या आहेत. यापैकी एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य असून त्यांचा संचालक अभिजीत आहे. तर दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी आणि वैभव हे सदस्य असून, वर्षा या टीमच्या संचालक आहे. या दोन्ही टीमला घरात असलेल्या एका नळावर दूध जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
View this post on Instagram
‘BB फार्म’ टास्कला मंगळवारच्या भागात सुरुवात झाली. नळातून जेव्हा दूध येईल तेव्हा ते दोन्ही टीमने जमा करायचे असे बिग बॉसने सांगितले. जी टीम जास्त दूध जमा करेल ती जिंकेल असा हा टास्क आहे. मात्र घरातील काही सदस्यांनी या टास्कमध्ये नळातून दूध येण्याआधीपासूनच तो नळ धरून ठेवला. यादरम्यान झालेल्या वादामुळे ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीला नुकसान झाले असते.
या BB फार्म टास्कमध्ये बळाचा वापर करू नका असे संचालक वर्षाजी सतत सगळ्यांना सांगत होत्या परंतु, त्यांचे कोणीच ऐकून घेत नव्हते. दोन्ही टीम माघार घ्यायला तयार नाही हे पाहून अखेर बिग बॉसने हस्तक्षेप केला आणि या दोन्ही टीमला ‘बिग बॉस’कडून एक मोठी शिक्षा देण्यात आली. ‘बिग बॉस’ने जाहीर केले की, दोन्ही टीममधील एका सदस्याला प्रतिस्पर्धी टीमने बाद करायचे असे सांगितले.
======
हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा
======
‘बिग बॉस’ने असे जाहीर केल्यानंतर घरातील भांडण करणारे अनेक सदस्य अचानक शांत झाले. अशाच निक्की देखील नरमली. सर्वांशी भांडणारी निक्की अतिशय शांतपणे वैभवला “तुझ्या टीमला समजाव” असे सांगत होती. आता दोन्ही टीममधून नक्की कोणता सदस्य बाद होणार हे आगामी भागात समजेलच. मात्र या टास्क जोरदार भांडणं होणार हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मात्र आता ते कोणाकोणामध्ये होतात आणि त्यातून काय घडते हे पाहावे लागेल.
यासोबतच बिग बॉसच्या या टास्कच्या प्रोमोमध्ये हे देखील दिसले की टास्क दरम्यान निक्की आणि आर्या या दोघींमध्ये वाद देखील होत आहे. निक्की आर्याला “ए म्हशे तुला त्रास होता…म्हशे गप्प बस” असे म्हणते. यानंतर आर्या देखील “तू म्हशी…” असे तिला उत्तर देते. या टास्कमध्ये या दोघींमध्ये जोरदार वाद होणार आहेत. मात्र टास्क कोणती टीम जिंकेल हे पाहणे महत्वाचे असेल.