आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात तर आज भक्तांचा सागरच ओसंडून वाहत आहे. गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाच्या चरणी आज आमपासून खासपर्यंत सर्वच नतमस्तक झाले आहेत.
आज देवशयनी एकादशीचे निमित्त साधत सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा, वारीच्या अनुभवांचा फोटोंचा जणू पूर्णच आला आहे. आजच्या दिवशी पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे खूपच भाग्याचे आणि शुभ मानले जाते. मात्र हे सगळ्यांसाठीच शक्य असते असे नाही. प्रत्येक जणं आपापल्या परीने जिथे आहे तिथूनच पांडुरंगाची मनोभावे पूजा करतो. आपण जिथे आहे तीच आपली पंढरी समजून सगळेच या विठ्ठलाच्या चरणाशी लीन होतात.
विठ्ठलचे भक्त फक्त आपण सामान्य माणसं आहोत असे अजिबातच नाही कलाकार देखील या विठ्ठलाला खूपच मानतात. आजच्या दिवशी अनेक कलाकारांनी त्यांची विठुरायाबद्दल असलेली श्रद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. अशातच मराठी आणि हिंदी टीव्ही माध्यमातील अभिनेता असलेल्या अक्षय केळकरने देखील सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ आणि फोटो शेअर करत त्याच्या पंढरीची ओळख सगळ्यांना करून दिली आहे.
बिग बॉस मराठी जिंकून प्रकाशझोतात आलेला अक्षय चांगलाच लोकप्रिय आहे. मागील वर्षी त्याने म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. ही सोडत तो जिंकला आणि त्याला त्याचे हक्काचे घर मिळाले. याबद्दल त्यानेच सगळ्यांना सांगितले होते. मात्र आज अक्षयने आषाढीचे मुहूर्त साधत त्याचे या घराची अतिशय सुंदर झलक सगळ्यांना दाखवली आहे.
आज एकादशीच्या दिवशी त्याने त्याच्या या सुंदर सजवलेल्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या नव्या घरात अक्षयने वारकऱ्यांच्या प्रतिकृती घडवल्या आहेत. याची झलक आज आषाढी एकादशी निमित्ताने अभिनेत्याने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “जेव्हा या देवळ्या बनवल्या तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हतं इथे मी नेमकं काय ठेवणार आहे… खूप गोष्टींचा विचार केला होता पण, इथे दैवी गोष्टच यायची होती. माझ्या घरासाठी आलेलं हे एक सुंदर गिफ्ट! तेही माझ्या नव्या शेजाऱ्यांकडून… कलाकार माणूस भेटला.
धन्यावाद @abhijit.music08 सर तुमचे खूप खूप आभार!
या इतक्या सुंदर वारकऱ्यांच्या Idols साठी. माझी पंढरी सजली आणि तुमच्यामुळे इतकी सुंदर सजली. विशेष म्हणजे हे सुंदर वारकरी अभिजीत सरांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे, this set is one and only! So, हे आता फक्त माझ्याकडेच आहेत. Trust me, ही श्रीमंतीच वेगळी आहे!
माझ्या नव्या घरासाठी मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट…
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नव्या घराचे शेजारी अतिशय हुशार आणि खूप दमदार कलाकार आहेत. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार!”
=======
हे देखील वाचा : OTT प्लॅटफॉर्मवरील दीपिका पादुकोणचे 4 ब्लॉकबस्टर सिनेमे
======
अक्षयने स्वतः त्याच्या या देवळ्यांच्यावर “माझी पंढरी” हे लिहिले आहे. या वारकऱ्यांमुळे त्याच्या घराला एक वेगळाच साज चढला आहे. अक्षयने देखील आजच दुग्ध शर्करा योग्य साधत हे सजावट त्याच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि फॅन्सने कमेंट्स करत त्याच्या या सजावटीचे आणि हस्ताक्षराचे कौतुक केले आहे.