Home » Bigg Boss : आज होणार बिग बॉस 19 चा ग्रँड प्रिमियर

Bigg Boss : आज होणार बिग बॉस 19 चा ग्रँड प्रिमियर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Big Boss
Share

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय विवादित शो म्हणून बिग बॉस या रियॅलिटी शो ची ओळख आहे. दरवर्षी या शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. प्रत्येक सिझन विविध कारणांमुळे कमालीचा गाजतो. या शो वर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. मात्र तरीही हा शो कमालीचा गाजतो. हा शो बघणारा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. दरवर्षी या शोची वाट प्रेक्षक बघतात. यंदा देखील बिग बॉस १९ हा शो नवीन रूपात, नवीन ढंगात, नव्या थीमश प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. आज २४ ऑगस्टपासून या शोचा शुभारंभ होत आहे. यंदा या शोचे १९ वे पर्व आहे. (Big Boss 19)

बिग बॉस हा शो मधल्या काही काळापासून कमालीचा चर्चेत आला आहे. यंदा या शोची थीम राजकीय असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या सीझनचे नाव “घरवालो की सरकार” असे आहे. ‘सत्ताधारी पक्ष’ आणि ‘विरोधी पक्ष’ या दोन गटांत स्पर्धक विभागले जाणार आहेत. बिग बॉसच्या घरातील कॉम्पिटिशन, घडामोडी आणि मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये वादविवाद, सरकारी निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सत्तापालट करण्याचं आव्हान पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या टीझरमध्ये, सलमान खान आकर्षक नेहरू जॅकेट परिधान करताना दिसत आहे आणि त्याच्यासोबत ब्लॅक कॅट कमांडो आहेत. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये घरात वाद, बदलणारी समीकरणं आदी सर्वच बघताना प्रेक्षकांना कमालीची मजा येणार यात शंका नाही. (Top marathi News)

यावर्षी, ‘बिग बॉस १९’ चे स्वरूप बदलण्यात आले आहे. दरवर्षी बिग बॉस जिओ हॉटस्टार आणि टीव्हीवर एकाच वेळी प्रीमियर होत असतो, परंतु यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वरचष्मा पाहायला आहे. यामुळेच प्रत्येक भाग जिओ हॉटस्टारवर दीड तास आधी प्रसारित केला जाईल. हा शो रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. तर त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांला हा एपिसोड कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जाईल. म्हणजेच टीव्हीच्या आधी तुम्ही जिओ हॉटस्टारवर हा शो पाहू शकता आणि मजा घेऊ शकता. बिग बॉसचा प्रीमियर होताच तो पाहू इच्छिणारे सर्व चाहते जिओ हॉटस्टारचा पर्याय निवडू शकतात. (Todays Marathi Headline)

Big Boss

बिग बॉस 19 च्या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात आकर्षणाची बाब म्हणजे यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये निर्माते आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार, WWE स्टार अंडरटेकर याला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून येण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. WWE चा स्टार अंडरटेकर याच्या सोबत बिग बॉसच्या निर्मात्यांनी संवाद साधल्याचे समोर आले. जर सर्व योग्य राहिले तर तो नोव्हेंबरमध्ये ७ ते १० दिवसांसाठी स्पर्धेत सहभागी होईल. याचा अर्थ तो स्पर्धक म्हणून नाही तर पाहुणा म्हणून देखील बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकतो. (Latest Marathi News)

अंडरटेकरसोबतच माईक टायसनही बिग बॉसमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांनी टायसनसोबत देखील चर्चा सुरु केली आहे. माईक टायसन ऑक्टोबरमध्ये एका आठवड्यासाठी किंवा १० दिवसांसाठी शोमध्ये दिसणार आहेत. (Top Trending News)

यावर्षीच्या पर्वात अभिनेते-अभिनेत्री यांच्यासोबतच इन्फ्लूएन्सर, गायक, कॉमेडियन आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री दिसणार आहेत. वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये माइक टायसन आणि अंडरटेकर अशी आंतराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय सेलिब्रिटी सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉस १९ मध्ये सामील होणाऱ्या कलाकारांची संभाव्य यादी समोर आली आहे, त्यानुसार या घरात मराठमोळा कॉमेडियन प्रणीत मोरे, अभिनेत्री कुनिका सदानंद, भोजपुरी अभिनेत्री निलम गिरी, सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमातून विशेष ओळख मिळवणारा गायक-संगीतकार अमाल मलिक देखील बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (Top Stories)

तर पॉलिश अभिनेत्री आणि मॉडेल नतालिया यानोशेक, मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी बसीर अली, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धांची विजेती नेहाल चुडासमान ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘बबली बाऊन्सर’ फेम अभिनेता अभिषेक बजाज, सेलिब्रिटी मास्टरशेफ हा रिअॅलिटी शो विनर अभिनेता गौरव खन्ना, अभिनेत्री अशनूर गौर, डिजिटल क्रियेटर आणि इन्फ्लूएन्सर अवेझ दरबार, लोकप्रिय युट्यूबवर आणि कंटेट क्रिएटर नगमा, शहनाझ गिलचा भाऊ आणि अभिनेता शहबाज बदेश, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तान्या मित्तल, नोएडामधील युट्यूबर मृदुल तिवारी आदी स्पर्धक दिसू शकतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.