Home » Bigg Boss : बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरनंतर लगेच घरात राडा

Bigg Boss : बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरनंतर लगेच घरात राडा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bigg Boss
Share

अखेर प्रेक्षकांच्या आवडीचा आणि भरपूर माल मसाला असलेला बिग बॉस हा शो सुरु झाला. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय विवादित आणि बोल्ड शो म्हणून या शो ची ओळख आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना बिग बॉसची प्रतीक्षा होती. यंदा बिग बॉसमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार? या सीझनमध्ये काय वेगळे होणार? काय थीम असणार? शो होस्ट करताना पुन्हा सलमान खानच दिसणार का? आदी अनेक प्रश्न प्रेक्षकांना होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत. बहुप्रतीक्षित अशा बिग बॉसच्या १९ व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी सर्वच स्पर्धकांचे स्वागत सलमान खानने त्याच्या हटके स्टाइलमध्ये केले. या शोचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना ‘जिओहॉटस्टार’वर रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. यानंतर ९० मिनिटांनी हे भाग ‘कलर्स वाहिनी’वर प्रक्षेपित केले जातील. हा सीझन एकूण १०५ दिवस सुरू राहणार आहे. यंदा शोमध्ये एकूण १६ सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. (Bigg Boss News)

बिग बॉस १९च्या घरात सर्वात पहिली एण्ट्री करणारी स्पर्धक होती अशनूर कौर. वयाच्या २१व्या वर्षी स्वत:चं घर घेणारी अशनूर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा आहे. तिने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर आता ती मुख्य भूमिकेत देखील झळकते. तिच्यासोबतच ‘गँग्स ऑफ वासेपूर २’ या वेब सीरिजमध्ये ‘डेफिनिट’ हे पात्र साकारणारा अभिनेता झिशान कादरी बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. शिवाय तान्या मित्तल देखील बिग बॉसच्या घरात आली आहे. सलमानने तिला चांदीची पाण्याची बाटली आणि ताट गिफ्ट म्हणून दिले आहे. (Top Trending Headline)

मराठमोळा स्टँडअप कॉमेडीयन प्रणीत मोरे देखील बिग बॉस १९मध्ये दिसणार आहे. ‘अनुपमा’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गौरव खन्ना बिग बॉस १९च्या घरात आला आहे. डान्सर आणि सोशल मीडियावर स्टार कपल नगमा मिराजकर आणि आवेज दरबार हे बिग बॉस १९ मध्ये दिसणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणाऱ्या आणि टीव्हीवर दिसणाऱ्या अभिनेत्री कुनिका सदानंद या देखील बिग बॉसच्या घरामध्ये आल्या आहेत. २०१८ मध्ये मिस दिवा युनिव्हर्स राहिलेली मॉडेल आणि फिटनेस कन्सल्टंट नेहा चुदासमा ‘बिग बॉस १९’ मध्ये सामील झाली आहे. (Todays Marathi Headline)

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक देखील सलमान खानच्या शोचा भाग आहे. ‘हाउसफुल 5’, ‘वॉर २’ या सिनेमामध्ये काम केलेली आंतरराष्ट्रीय कलाकार नटालिया जानोसजेक तर ‘नोटबूक’ आणि ‘लैला मजनू’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री फरहाना भट्ट देखील या शोमध्ये सामील झाली आहे. भोजपुरी सिनेमांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली नीलम गिरीही सलमान खानच्या शोमध्ये सहभागी झाली आहे. मृदुल तिवारी, नेहल चुडासमा, अभिनेते अभिषेक बजाज आणि बशीर अली देखील बिग बॉसच्या घरात आले आहेत. (Entertainment News)

दरम्यान निर्मात्यांनी आधीच मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर, ज्याला चाहत्यांकडून सर्वाधिक मते मिळतील तो या घराचा भाग होईल. मृदुल तिवारीला सर्वाधिक मते मिळाली आणि तो या शोचा भाग झाला आहे. प्रीमियरच्या शेवटी, सलमान खानने १५ व्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि जनतेचा निर्णय दिला. जेव्हा सलमान खानने सांगितले की मृदुल तिवारीचे नाव जाहीर केले तेव्हा स्टेजवरच दोघांमध्ये भांडण झाले, ज्यामुळे शोचे वातावरण थोडे तापले. ‘फॅन्स का फैसला’च्या प्रीमियरमध्ये १५ व्या स्पर्धकाचे स्पर्धक मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांच्यात वाद झाला. (Top Stories)

========

Bigg Boss : आज होणार बिग बॉस 19 चा ग्रँड प्रिमियर

========

शो सुरु होऊन अवघे काही तास झाले आहेत. मात्र आताच घरात वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे, बिग बॉसने एक नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे पहिल्याच दिवशी एकमेकांशी वाद घालताना पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरामध्ये सर्व सदस्याने प्रवेश केल्यानंतर बिग बॉस ने त्यांना एक टास्क दिला. बिग बॉस म्हणाले की घरामध्ये १६ सदस्य आहेत पण बेडरूम मध्ये बेड हे फक्त १५ आहेत. घरातला एक सदस्य हा असा असणार आहे जो बिग बॉसच्या घरात राहण्याचा लायकीचा नाही राहणार कारण त्याचे व्यक्तिमत्व हे सर्वात कमी पातळीचे आहे. यावर प्रोमो मध्ये जो तो एकमेकांवर ओरडताना दिसत आहे. आता बेड नसलेला स्पर्धक नक्की कोण असेल ते पाहणे महत्वाचे असेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.