नामीबिया येथून ८ चित्ते भारतात आणले जाणार आहेत अशी चर्चा सुरु होती. तर संपूर्ण देश या चित्त्यांची झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांना सोडण्यात आले. आपल्या देशात जंगलाचा राजा सिंह, वाघ आणि बिबट्या आढळतो. मात्र प्रदीर्घकाळानंतर भारतात आता चित्ता पहायला मिळणार आहे. भारतात १९४७ मध्ये अखेर चित्ता दिसला होता. त्यानंतर भारत सरकारने वर्ष १९५२ मध्ये भारतीय चित्ते लुप्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता भारतात वाघ, सिंह, चित्ता आणि बिबट्या सुद्धा दिसून येणार आहे. हे चारही प्राणी अत्यंत तगडे असतात. मात्र त्यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे हेच आज आपण जाणून घेऊयात.(Big Cat Family)
-सिंह
सर्वात प्रथम जंगलाचा राजा बोललल्या जाणाऱ्या सिंहबद्दल पाहूयात. या चारही हिंस्र प्राण्यांमध्ये वाघाची ओळख ही फार सोप्पी आहे. त्याच्या मानेवर असलेली आयाळ आणि चेहऱ्यावरील केस यामुळे तो पटकन ओळखता येतो. मात्र वाघ हे आळशी असतात. त्यांची लांबी ७ फूट असते. तर बिट कॅट फॅमिलीमध्ये वाघ हा एकमात्र असा प्राणी आहे जो एकत्रित मिळून शिकार करतो. तसेच एकत्रित आपली शिकार ही शोधतात.
-वाघ
कॅट फॅमिलीमध्ये वाघाचा आकार हा सर्वाधिक मोठा असतो. त्यांच्या शरिरावर असलेल्या पट्ट्यांमुळे ते अधिक ओळखले जातात. वाघ हे सिंहाच्या तुलनेत लांब आणि अधिक तगडे आणि अधिक वजनाचे असतात. वाघांचे पाय अधिक मजबूत असतात. ते खुप अॅक्टिव्ह ही असतात आणि नेहमीच एकटेपणाने शिकार करणे त्यांना आवडते. वाघ पोहण्यास सक्षम असतात. पूर्व एशिया, चीन आणि भारतात वाघ खुप आढळतात.
-चित्ता
चित्त्याबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तो जगातील सर्वाधिक प्राण्यांपेक्षा अधिक वेगाने धावणारा असतो. वेगाच्या तुलनेत ते अवघ्या काही सेकंदात ७२ मैल प्रति तास वेगाने धावतो. मात्र ते अधिक लांब धावू शकत नाही. वाघ आणि सिंहाच्या तुलनेत चित्ता अधिक जाड नसतो. त्यांचे डोक सुद्धा लहान असते. या व्यतिरिक्त त्यांची कंबर बारीक असते आणि शरिरावर काळे ठिपके असतात. चित्त्याच्या चेहऱ्यावर काळ्या पट्ट्या असाच ज्या त्यांच्या डोळ्यांपासून ते नाकापर्यंत दिसतात. चित्ता खासकरुन सकाळच्या दरम्यान शिकार करतात. त्यावेळी सिंह हे अधिक सक्रिय नसतात. चित्ता बिग कॅट फॅमिलीमधील (Big Cat Family) असा एक सदस्य आहे तो डरकाळी फोडू शकत नाही.
-बिबट्या
भारतातील बहुतांश ठिकाणी बिबट्या आढळतो. ते नागरिकांवर हल्ला करतात याच्या घटना खुपवेळा समोर आल्या आहेत. ते चित्त्यासारखेच दिसतात पण दोन्ही प्राण्यांमध्ये फरक आहे. चित्त्याच्या शरिरावर गोल डाग असतात तर बिबट्याच्या शरिरावर रोसेट-शैली सारखे निशाण असतात. तर बिबट्या हा चित्त्यापेक्षा अधिक मोठा आणि शक्तीशाली असतो. तो हरिण या सारख्या जनावरांना आपले शिकार बनवतो. चित्त्याच्या तुलनेत बिबट्याचे डोकं हे मोठे आणि लांब असते.
हे देखील वाचा- सावधान! तब्बल 72 वर्षांनी तो येतोय….