Home » शोले सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ

शोले सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ

बॉलिवूडमधील महानायक म्हणून ओखळ असणाऱ्या अमिताभ बच्चन यांची नेहमीच बी-टाउनमध्ये चर्चा होत असते. पण तुम्हाला माहितेय का, अमिताभ बच्चन यांचे बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गाजलेले सिनेमे कोणते आहेत?

by Team Gajawaja
0 comment
Big B Top Movies
Share

Big B Top Movies : बॉलिवूडमधील महानायक म्हणून ओखळ असणाऱ्या अमिताभ बच्चन यांची नेहमीच बी-टाउनमध्ये चर्चा होत असते. पण तुम्हाला माहितेय का, अमिताभ बच्चन यांचे बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गाजलेले सिनेमे कोणते आहेत?

जंजीर (1973)
वर्ष 1973 मध्ये प्रदर्शित झालेला जंजीर सिनेमा अॅक्शन आणि क्राइम बेस्ड होता. या सिनेमाची कथा सलीम जावेद यांनी लिहिली असून प्रकाश मेहता यांनी दिग्दर्शन केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त जया बच्चन, प्राण, अजीत खान आणि बिंदू सारख्या बड्या कलाकारांनी काम केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा वर्ष 1973 मधील चौथी सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता.

नमक हराम (1973)
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा नमक हराममध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, रेखा, असरानी रजा मुराद, एके हंगल, सिमी गरेवाल आणि ओमपुरी सारखे दिग्गज कलाकार झळकले होते. या सिनेमातील गाणी देखील सुपरहिट ठरल्या होत्या. संगीत आरडी बर्मन आणि गीत आनंद बक्शी यांचे होते.

अभिमान (1973)
वर्ष 1973 मध्ये आलेला सिनेमा अभिमानचे हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शन केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, बिंदू आणि असरानी यांनी मुख्य भुमिका साकारली होती. वर्ष 1973 मधील 18 वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. (Big B Top Movies)

रोटी कपडा और मकान (1973)
रोटी कपडा और मकान सिनेमात अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे मनोज कुमार यांनी दिग्दर्शन केले होते. असे म्हटले जाते की, या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओखळ मिळाली होती. वर्ष 1973 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.

दीवार (1975)
शोले सिनेमाच्या पाच महिन्याआधी प्रदर्शित झालेला सिनेमा ‘दीवार’ वर्ष 1975 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा होता. याशिवाय शोले सिनेमा 1975 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. या सिनेमाची कथा सलीम जावेद यांनी लिहिण्यासह यश चोपडा यांनी दिग्दर्शन केले होते.


आणखी वाचा :
अनुष्का- विराट कोहलीच्या मुलाच्या नावाचा अर्थ माहितेय का?
हॉलिवूडमधील हे 5 सिनेमे कधीच एकट्यात पाहू नका, अन्यथा…
नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्यावर लावला मोठा आरोप, म्हणाल्या….

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.