Home » Golden Visa : यूएई भारतीयांना देणार स्पेशल ‘गोल्डन व्हिसा’

Golden Visa : यूएई भारतीयांना देणार स्पेशल ‘गोल्डन व्हिसा’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Golden Visa
Share

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्टसोबत आवश्यक असतो तो व्हिसा. व्हिसाशिवाय कोणीही कोणत्याही देशात प्रवेश करू शकत नाही. व्हिसा म्हणजे काय तर? त्या देशाने तुम्हाला काही काळासाठी त्या देशात फिरण्याची, राहायची दिलेली परवानगी. परदेशात जाण्यासाठी व्हिसा महत्वाच्या कागदपत्रांमध्ये येतो. व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ देखील असते. अनेक देशांनी भारतीयांसाठी व्हिसा फ्री देखील ठेवला आहे. अशातच आता सर्वच लोकंचा अतिशय आवडता देश असलेल्या यूएईने भारतीयांसाठी एक खास ऑफर आणली आहे. (UAE Golden Visa)

संयुक्त अरब अमिरातीने भारतीयांसाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे ‘गोल्डन व्हिसा’. या योजनेअंतर्गत आता भारतीय नागरिक फक्त नॉमिनेशनच्या आधारावर गोल्डन व्हिसा मिळवू शकतात. हा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी भारतीयांना २३.३ लाख रुपये (१ लाख दिरहम) एवढी फी भरावी लागेल. या गोल्डन व्हिसामुळे भारतीय नागरिकांना यूएईमध्ये आजीवन निवास मिळणार आहे. ही फी भरल्यानंतर, तुम्हाला युएई मध्ये कोणतीही प्रॉपर्टी किंवा व्यवसाय न करताही कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळेल. (Marathi News)

सध्या जर भारतीयांना दुबईचा गोल्डन व्हिसा पाहिजे असल्यास अनेक अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागत आहे. यात मुख्य अट म्हणजे, सध्या ‘गोल्डन व्हिसा’ हवा असल्यास मालमत्ता किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते. भारतीयांना दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी किमान अरब अमिरातीचे २ डॉलर दशलक्ष अर्थात तब्बल ₹४.६६ कोटी किंमतीची मालमत्ता खरेदी करणे किंवा देशात मोठी व्यावसायिक गुंतवणूक करणे आवश्यक होते. मात्र आता नव्या नियमावलीनुसार भारतीयांना आता एक लाख अरब अमिराती डॉलर भरून (२३.३० लाख) शुल्क भरून आजीवन गोल्डन व्हिसा मिळू शकतो. येत्या तीन महिन्यांत ५ हजारांहून अधिक भारतीय नागरिक या नामनिर्देशन-आधारित गोल्डन व्हिसासाठी अर्ज करणार आहेत. (Todays Marathi HEadline)

Golden Visa

नवीन नियमानुसार आता भारतीयांना गोल्डन व्हिसासाठी कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचे बंधन नाही, मोठी व्यावसायिक गुंतवणूक करणे देखील आवश्यक नाही. हा नियम जरी सोपा आणि आकर्षक वाटत असला तरी तो तितका सोपा अजिबातच नाहीये. कारण फक्त पैसे देऊन कोणालाही हा व्हिसा मिळणार नाही. यूएई सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा व्हिसा मिळवण्यासाठी इतरही अनेक विविध निकषातून तुमची पात्रता तपासली जाणार आहे. तुम्ही पैसे दिले असले तरी, तुमची पार्श्वभूमी, गुन्हेगारी रेकॉर्ड, तुम्ही करत असलेला व्यवसाय आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. (Marathi Top Headline)

यूएई गोल्डन व्हिसा म्हणजे हा एक खास प्रकारचा रहिवासी परवाना आहे. तो मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थानिक व्यक्तीच्या मदतीशिवाय राहू शकतात, काम करू शकतात किंवा शिक्षण घेऊ शकतात. या योजनेचा उद्देश असा आहे की, ज्या लोकांचं कला, व्यापार, विज्ञान आणि फायनान्समध्ये योगदान आहे, त्यांना युएई मध्ये आकर्षित करायचे आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल. (Top Trending News)

सुरुवातीला ही योजना केवळ भारत आणि बांगलादेश या दोन देशांसाठीच खुली करण्यात आली आहे. भारतात, रायद ग्रुप कन्सल्टन्सीला गोल्डन व्हिसासाठी नामांकन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रायद ग्रुपचे प्रमुख रायद कमाल अयूब या गोल्डन व्हिसाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगताना म्हणाले, “भारतीयांसाठी युएईचा गोल्डन व्हिसा मिळवण्याची ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. जेव्हा कोणी गोल्डन व्हिसासाठी अर्ज करेल, तेव्हा आम्ही त्याची पूर्ण माहिती तपासू. त्यामध्ये तो व्यक्ती गैरव्यवहार किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील तर नाही ना हे पाहिले जाईल. त्याचबरोबर त्याचे सोशल मीडिया अकाउंट्ससुद्धा तपासले जातील.” (Marathi Latest News)

=============

हे ही वाचा: 

Chanakya : चाणक्य नीतीनुसार ‘हे’ गुण असलेली स्त्री ठरते उत्तम जोडीदार

Parenting Tips : मुलांमधील खोटं बोलण्याची सवय थांबवण्यासाठी खास टिप्स

=============

रायद कमाल पुढे म्हणाले की, “अर्जदाराच्या पार्श्वभूमीची तपासणी केल्यानंतर, तो यूएईच्या मार्केटला आणि व्यवसायाला कशी मदत करू शकेल, हे देखील तपासले जाईल. ती व्यक्ती कला, व्यापार, विज्ञान, स्टार्ट-अप किंवा इतर कोणत्या क्षेत्रात यूएईसाठी उपयुक्त ठरू शकेल का? याचा देखील यावेळी विचार केला जाईल.” या सर्व गोष्टीनंतर अंतिम निर्णय हा यूएई सरकारच घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की, नॉमिनेशनच्या अंतर्गत यूएई गोल्डन व्हिसा मिळवू इच्छिणारे अर्जदार दुबईला न जाता आपल्या देशातूनच यासाठी मंजुरी मिळवू शकतात. (Top Stories)

गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर याचे अनेक फायदे अर्जदाराला होणार आहेत. अर्जदार त्याचे कुटुंबीय दुबईत आणू शकतात. या व्हिसावर तुम्ही नोकर, चालक ठेवू शकता. येथे कोणताही व्यवसाय किंवा व्यावसायिक काम करू शकता. मालमत्ताधारित व्हिसा मालमत्ता विकल्यास किंवा विभागल्यास रद्द होतो, पण नामनिर्देशन-आधारित व्हिसा कायमस्वरूपी राहतो. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.