गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना सर्वजण दादा म्हणून संबोधतात. याआधी ते घाटलोडिया येथील आमदार होते आणि २०१७ मध्ये पहिल्यांदा जिंकले होते पण गेल्या १५ महिन्यांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी आपल्या कामांमुळे एक वेगळी ओळख बनवली. याच कारणामुळे त्यांना मोदी यांनी मृदू आणि भक्कम मुख्यमंत्री असे म्हणतात. भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास हा ऐकण्यासारखा आहे. त्यांनी शिक्षण इंजिनिअरिंगमधून घेतले. त्यानंतर बिल्डर आणि अखेर गुजरातचे मुख्यमंत्री.
१५ जुलै १९६२ रोजी जन्मलेले भूपेंद्र पटेल यांच्या वडिलांचे नाव रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीचे नाव हेतल पटेल आहे. तर पाटीदार समाजातील भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल इंजिअरिंगचे शिक्षण घेतले. ते कडवा पाटीदार मध्ये येतात.
संघ ते राजकरणापर्यंतचा प्रवास
भूपेंद्र पटेल सर्वात प्रथम आरएसएसशी जोडले गेले. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर बिल्डरचे काम करणे सुरु केले. १९९५ मध्ये मेमनगर महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा विजय झाला. त्यानंतर १९९९ आणि पुन्हा २००४ मध्ये पुन्हा भूपेंद्र पटेल पालिकेचे सदस्य झाले. याच दरम्यान त्यांना १९९९ आणि २००४ पर्यंत महापालिका प्रमुख बनण्याची संधी मिळाली. त्यानंतर भूपेंद्र पटेल २००८ ते २०१० पर्यंत अहमदाबाद महापालिकेचे उपाध्यक्ष झाले.

२०१५ ते २०१७ पर्यंत अहमदाबाद शहरी विकास बोर्डाचे अध्यक्ष राहिले. २०१७ मध्ये निवडणूकीत माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची जागा घाटलोडिया येथून त्यांनी निवडणूक लढवली आणि १.१७ लाख मतांनी त्यांना विजय मिळाला. यावेळच्या निवडणूकीत त्यांना आणखी मोठा विजय मिळाला होत. त्यांनी ८३ टक्के मत मिळवली.
एक वेगळीच प्रतिमा बनवली
भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel)अगदी मृदू स्वभावाचे व्यक्ती आहेत. हेच कारण आहे की, एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमत शाह यांच्या नजरेत आपली एक वेगळीच प्रतिमा बनवली. आज त्यांच्यावर या दोन्ही नेत्यांचा खुप विश्वास आहे. खरंतर भूपेंद्र पटेल यांना माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जाते. असे ही म्हटले जाते की, भूपेंद्र पटेल हे एक प्रकारचे राजकीय गुरु सुद्धा राहिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच भूपेंद्र पटेल मंत्री नही थेट मुख्यमंत्री झाले. खासकरुन मुख्यमंत्री जेव्हा भूपेंद्र पटेल यांनी पोरबंदरातील अवैध निर्माणावर कारवाई केली तेव्हा त्यांना बुलडोझर दादा सुद्धा म्हटले गेले. पीएम मोदी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर नरेंद्र आणि भूपेंद्र यांचे सरकार, डबल इंजिनचे सरकार असे स्लोगन दिले.
हे देखील वाचा- होमी भाभांचा अपघात झाला नसता तर भारताकडे असती हजारो परमाणू हत्यारे
२२ लाख रुपयांची संपत्ती
२०२२ च्या निवडणूकीच्या शपथ पत्रात भूपेंद्र पटेल यांनी २२ लाख रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला आहे. त्यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही. पत्नी हेतल बेन पटेल यांच्या नावावर १६ लाख ३० हजार रुपये किंमतीची जमीन आहे. भूपेंद्र पटेल यांच्यानंतर २ लाख १५ हजार ४५० रुपयांची रक्कम आहे तर पत्नीजवळ तीन लाख ५२ हजार ३५० रुपयांची रक्कम आहे.
क्रिकेट-बॅडमिंटनची आवड
भूपेंद्र पटेल यांना स्वभाव अगदी सरळ आहे. ते पॅन्ट-शर्ट व्यतिरिक्त काही वेळेस कुर्ता घालतात. राजकरणाव्यतिरिक्त भूपेंद्र पटेल यांना क्रिकेटची सुद्धा फार आवड आहे. ते क्रिकेट अगदी आवडीने पहायचे. रिकाम्या वेळेत त्यांना क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणे आणि पाहणे ही आवडते. गेल्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी काही वेळी आपला प्रोटोकॉल तोडत सामान्य लोकांमध्ये रोडच्या कडेलगत चहा सुद्धा प्यायले आहेत. दादा यांचा हा अंदाज नेहमीच चर्चीत राहिला आहेत.