Home » Bhaubij : जाणून घ्या भाऊबीजेचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती

Bhaubij : जाणून घ्या भाऊबीजेचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhaubij
Share

लक्ष्मी पूजन मोठ्या दणक्यात आपण सर्वांनीच साजरे केले. आज सगळीकडे बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा सण साजरा होत आहे. पाडव्याला विष्णूंच्या वामन अवताराची आणि राजा बळीची पूजा करण्याची प्रथा आहे. शिवाय आज पत्नी पतीला औक्षण करत त्याच्या उदंड निरोगी आयुष्याची कामना करते. उद्या दिवाळीतला शेवटचा मात्र महत्त्वाचा असा भाऊबीजेचा सण साजरा होणार आहे. पाच दिवसाच्या दिवाळीची आता सांगता होत आहे. दिवाळीचा शेवट हा बहीण भावाचे नाते अधोरेखित करणाऱ्या ‘भाऊबीज’ या सणाने होतो. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. (Bhaubij Diwali)

भारतात सर्वत्र भाऊबीजेचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला विविध नावांनी देखील ओळखले जाते. जसे की, हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. तर हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये याला भाऊबीज म्हणून ओळखले जाते. भारताबाहेर नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार नावाने साजरा केला जातो. भाऊबीज साजरा करण्याच्या देखील विविध पद्धती आहेत. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात. (Marathi)

या वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१६ वाजता होईल आणि २३ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४६ पर्यंत चालेल, त्यामुळे; भाऊबीजच्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे. त्यामुळे तुमच्या भावाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी १ वाजून १३ मिनिटं ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल. (Todays Marathi Headline)

Bhaubij

शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या यमुनेच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी ऊ-बहिणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करतील असे वरदान दिले. मृत्यूनंतर त्याला यमलोकात जावे लागणार नाही. या दिवशी यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. (Top Trending News)

याबद्दल अशी देखील मान्यता आहे की, नरकासुराचा वध करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. यावेळी त्यांची बहीण सुभद्रा हिने त्यांचं फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असे केल्यास अपमृत्यु येत नाही, अशी मान्यता आहे. (Top Marathi Headline)

कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. जेवणात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी. (Latest Marathi Headline)

========

Padwa : जाणून घ्या औक्षण करणे म्हणजे काय? आणि औक्षण करण्याचे महत्त्व

Padwa 2025 : पाडव्याला पतीचे औक्षण करण्यामागे देखील आहे मोठे कारण

========

भाऊबीज कथा
सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे. पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे. एकदा कातिर्क द्वितीया यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदित झाली. तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केले आणि भोजन वाढले. (Top Trending News)

यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल आणि तिलक करेल त्यांना आपला भय नसावा. तथास्तु म्हणत यमराज यमपुरीला गेले. असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तीभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणींचे आदरातिथ्य स्वीकारतात, त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाचे भय नसते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.