Home » Marathi : प्रसिद्ध अभिनेत्रीचे मराठी इंडस्ट्रीमधल्या ग्रुपिझमवर थेट भाष्य

Marathi : प्रसिद्ध अभिनेत्रीचे मराठी इंडस्ट्रीमधल्या ग्रुपिझमवर थेट भाष्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
bhargavi chirmule
Share

मनोरंजनविश्वाबद्दल कायमच सामान्य लोकांना अप्रूप असते. या इंडस्ट्रीमध्ये कलाकरांना मिळणारे फेम, पैसा, ग्लॅमर आदी अनेक गोष्टी लोकांना आकर्षित करतात. कलाकारांबद्दल देखील लोकांना कायमच हेवा वाटत असतो. त्यांचे ग्लॅमरस जीवन आणि मजा पाहून आपणही याच क्षेत्रात करियर करावे असा अनेकांचा मानस असतो. मात्र बाहेर हे जग कितीही आकर्षक आणि सुंदर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनाच यात असणाऱ्या समस्या, आव्हानं माहित असतात. अनेकदा काही कलाकार या क्षेत्राची दुसरी बाजू मांडताना दिसतात. जशा एका नाण्याला दोन बाजू असतात तशाचा दोन बाजू या क्षेत्राला देखील आहेत. (Marathi News)

नुकतेच मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भार्गवी चिरमुलेने एका मुलाखतीमध्ये ग्रुपिझमबद्दल भाष्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ग्रुपिझम अनेकदा समोर आला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार बिधास्त यावर भाष्य करत इंडस्ट्रीमधील ग्रुपिझम किती चुकीचा, वाईट आणि इतर कलाकारांसाठी घटक आहे याबद्दल सांगतात. मात्र आता हेच ग्रुपिझम मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये देखील असल्याचे समोर आले आहे. टीव्ही, चित्रपट, नाटक अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये काम करत आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने यावर थेट तिचे मत मांडले आहे. (Bhargavi Chirmule)

भार्गवीने याविषयी बोलताना सांगितले की, “ग्रुपिझम आहे, शंभर टक्के आहे. आणि ते त्यांच्या कंफर्ट झोनमध्ये काम करतात. हे चुकीचं आहे बरोबर, यामध्ये मला पडायचं नाही. पण, आपण तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण झालं आहे. जे फिल्म्सच्या बाबतीत घडताना दिसतं. फिल्म्समध्ये तर ग्रुपिझम दिसतो. ते त्यांच्या लोकांना घेऊन सिनेमे करतात पण, ते त्यांच्या कंफर्टझोनमधून बाहेर येत नाहीत. त्यामुळे वेगळ्या कलाकारांना एक्सप्लोर करत नाहीत. ते आपल्याला भेट, बोलतात, अरे, आपण एकत्र काम करु, पण ते आपल्याबरोबर काम करत नाहीत. (Todays Marathi Headline)

bhargavi chirmule

त्यांच्या सगळ्या प्रिमिअर्समध्ये आपण जातो, पार्टीमध्ये जातो. यशामध्ये सहभागी होतो. पण, त्यांच्या सिनेमात आपण नसतो, याचं एक कलाकार म्हणून वाईट वाटतं. कारण आम्हालाही एक कलाकार म्हणून तुमच्याबरोबर काम करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे पण ते आमच्याकडे आणि काही कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. सगळ्यांचे आपापले ग्रुप आहेत. आणि ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये असे कलाकार आहेत, जे वेगवेगळ्या पद्धतीची काम करु शकतात. (Top Marathi News)

त्यांनी त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. आणि आपण कितीही मेहनत घेतली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सध्या या गोष्टींचा सामना करत आहेत. एकतर ते आम्हाला कलाकार मानत नाहीत, असं मला वाटायला लागलंय किंवा आपल्याबरोबर काम करुन त्यांना काही फायदा होणार नाही, असं असावं”. (Latest Marathi NEws)

========

हे देखील वाचा :

Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत

=========

दरम्यान भार्गवीबद्दल सांगायचे झाले तर ती मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम करत आपली ओळख तयार केली आहे. भार्गवीने प्रचंड गाजलेल्या ‘वाहिनीसाहेब’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले. शिवाय तिने ‘फु बाई फु’, एका पेक्षा एक अशा रियॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. भार्गवीने संदूक, वन रम किचन, आयडियाची कल्पना आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. भार्गवी काही नाटकांमध्ये देखील दिसली आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच भार्गवी प्रशिक्षित ‘भरतनाट्यम’ डान्सर देखील आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.