Home » सावधान! तो पुन्हा येतोय…

सावधान! तो पुन्हा येतोय…

by Team Gajawaja
0 comment
Corona Virus
Share

कोरोना (Corona Virus) धडकी भरवणा-या या रोगावर आपल्या देशानं मात केली. सर्व सुरळीत सुरु झालं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या महामारीनं डोकं वर काढलं आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona Virus) रुग्ण वाढू लागले आहेत.  तब्बल 113 दिवसानंतर भारतात कोविड-19 च्या 524 रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात एवढे रुग्ण आल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे का, अशी चाचपणी आरोग्य संस्थांतर्फे करण्यात येत आहे. (Corona Virus)  

यापूर्वी, भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गाची 440 नवीन प्रकरणे समोर आली होती. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,89,512 झाली आहे. त्याचवेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,294 वर पोहोचली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गामुळे आतापर्यंत 5,30,779 लोकांनी आपला जीव गमावला आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. साधारण तीन वर्षांपूर्वी याच सुमारास देशात कोरोना विषाणूनं हाहाकार उडवला होता.  देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल 2671 नवे कोरोना रुग्ण (Corona Virus) आढळले. मागील चार आठवड्यांपासून देशात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्कता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

सध्या महाराष्ट्रात 86 टक्के, तामिळनाडूमध्ये 67 टक्के आणि तेलंगाणामध्ये 63 टक्के रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील इतरही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीतही वाढण्यात येणा-या रुग्णांमुळे येत्या काळात कोरोना रुग्णांच्या (Corona Virus) संख्येत वाढ होण्याची भीती आहे.  कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या राज्यांमध्ये रुग्णसंथ्या चौपट वाढल्यामुळं येत्या काळात पुन्हा एकदा कठोर नियम लावण्यात येण्याची शक्यता आहे. भारतात ही परिस्थिती असताना चीनचे उगमस्थान मानले गेलेल्या चीनमध्येही पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चीनमध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. चिनच्या शिआन शहरातील अधिका-यांनी इन्फ्लूएंझाच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पुन्हा लॉकडाउन जाहीर केला आहे. चीनच्या वायव्य शहर, झियानने संक्रमण वाढू नये म्हणून कोविड (Corona Virus) सारखे लॉकडाउन लागू केले आहे.  

सध्या वाढत्या तापाच्या रुग्णांनी दवाखान्यंमध्ये गर्दी आहे. त्यातच काही ठिकाणी शाळांच्या परीक्षा झाल्या आहेत. मार्च, एप्रिल, मे हे तीन  महिने प्रामुख्याने पर्यटनाचे महिने म्हणून ओळखले जातात. अशातच पुन्हा एकदा कोरोनाची (Corona Virus) धडकी भरवणारी बातमी आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच ब-याच जणांना खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत आहे. याबरोबरच तापाचीही लक्षणे दिसत आहेत.  हा ताप साधारण तीन दिवसात जात असून खोकला मात्र पंधरा दिवस रुग्णांना त्रस्त करीत आहे. अशावेळी राज्यंनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केंद्रसरकारतर्फे करण्यात आले आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फेही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

=======

हे देखील वाचा : अत्यंत गंभीर आजार ‘डीप्थीरिया’ बद्दल जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार

=======

 कोरोना रुग्णांची (Corona Virus) संख्या वाढली तर आवश्यक ते नियम पुन्हा लागू करण्याचाही विचार असल्याचे समजते. याबाबत मान्यवर तज्ञांनी सांगितले आहे, भारतात जी सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामागे Omicron आणि त्याच्यासारखेच विषाणू आहेत.  यामुळे घाबरण्यासारखे नाही. अनेकांना या विषाणूचा (Corona Virus) संसर्ग झाला आहे.  त्यातून लसीकरण झाल्यामुळे या विषाणूचा धोका नाही.  मात्र तरीही काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.  लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच काहींनी आपले लसींचे डोस घेतले नाहीत, त्यांनी ते डोस पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  दरम्यान  देशभरात कोविड-19 (Corona Virus) पॉझिटिव्ह दरात आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांची वाढती संख्या आणि वाढ होत आहे.  या दोन्ही मध्ये लक्षणं सारखीच आहेत.  मात्र दोघांनाही दूर ठेवायचे असल्यास मास्क आणि हाताची स्वच्छता हाच पहिला आणि आवश्यक प्राथमिक उपाय असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत, 220.64 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत सुमारे 44,846 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यांनं लसीकरणाचा वेग वाढला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.