Best Winter Treks : थंडीचा मौसम आला की ट्रेकिंगची मजा दुप्पट होते. बर्फाच्छादित पर्वत, गोठलेली तळी, श्वास रोखून धरतील असे निसर्गदृश्य आणि साहसाची थरारक अनुभूती हे सर्व एका विंटर ट्रेकमध्ये अनुभवता येतं. भारतात अनेक अशा जागा आहेत जिथे हिवाळ्यातील ट्रेकिंग अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. आज आपण जाणून घेऊया भारतातील 6 सर्वात लोकप्रिय आणि बकेट-लिस्टमध्ये असायलाच हवेत असे विंटर ट्रेक!

Chadar Trek, Ladakh
चादर ट्रेक, लडाख – गोठलेल्या झंस्कार नदीवर चालण्याचा अनोखा अनुभव लडाखमधील झंस्कार नदी हिवाळ्यात पूर्णपणे गोठते आणि त्यावर तयार होणाऱ्या बर्फाच्या चादरीवरून चालत ट्रेक केला जातो. उणे तापमान, कठीण परिस्थिती आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य यामुळे हा ट्रेक अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. साहसाची खरी परीक्षा द्यायची असेल तर चादर ट्रेक तुमच्यासाठीच!( Best Winter Treks )

Kedarkantha
हिवाळी स्वर्ग – केदारकंठा ट्रेक, उत्तराखंड केदारकंठा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध विंटर ट्रेक. बर्फानं भरलेले मार्ग, पाइनच्या झाडीतील दृश्य आणि 360 अंश हिमालय दर्शन हे या ट्रेकचे मोठे आकर्षण. हा ट्रेक बिगिनर्ससाठीही योग्य असल्याने अनेक तरुणांची ही पहिली पसंती असते. ( Best Winter Treks )

Goacha La Trek, Sikkim
गोएचा ला ट्रेक, सिक्कीम – कांचनजंघेचं जवळून दर्शन सिक्कीमचा गोएचा ला ट्रेक हा हिमालयातील सर्वात मोहक दृश्यांसाठी ओळखला जातो. कांचनजंघा शिखराचं सूर्योदयातलं रुप मनाला भुरळ पाडणारं आहे. बर्फाच्छादित मार्ग आणि उंचसखल भूभाग यामुळे हा मध्यम ते कठीण स्तराचा ट्रेक समजला जातो.

Brahmatal Trek, Uttarakhand
ब्रह्मताल ट्रेक, उत्तराखंड – बर्फाच्छादित तलावाचं सौंदर्य ब्रह्मताल हा शांत, सुंदर आणि अनुभवांनी भरलेला ट्रेक आहे. बर्फात लपलेल्या तलावांच्या आसपासचा परिसर जणू स्वप्नातला वाटतो. कमी गर्दी आणि शांत वातावरण शोधणाऱ्यांसाठी हा परफेक्ट पर्याय! ( Best Winter Treks )

Dayara Bugyal Trek
दयारा बुग्याल ट्रेक – बर्फाच्या गाद्यांवरून चालण्याची मजा**दयारा बुग्याल हा एक विस्तीर्ण माळ प्रदेश आहे जो हिवाळ्यात पांढऱ्या बर्फाने झाकला जातो. साधारणत सोपा ट्रेक असल्याने कुटुंब, मित्रांसोबत हा हिवाळी ट्रेक भन्नाट अनुभव देतो. इथून दिसणारा हिमालय पर्वतरांगांचा नजारा फोटोप्रेमींच्या कॅमेराला अक्षरशः कामाला लावतो.

Kuari Pass Trek
हिमालयाच्या शिखरांकडे पाहत ट्रेकिंग कुआरी पास हा ऐतिहासिक ट्रेक मानला जातो. जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक नंदा देवीचं अप्रतिम दर्शन इथून होतं. नवशिक्यांसाठी योग्य असला तरी, थंडीची तीव्रता आणि उंचीचा प्रभाव लक्षात घेणं महत्वाचं आहे.
=================
हे देखील वाचा :
Tax Free : लाखों कमवा, पण भरावा लागणार नाही कर! जाणून घ्या कुठे मिळते ही खास सुविधा
=================
भारतामधील हिवाळी ट्रेक्स हे साहस, थंडी, निसर्ग आणि समाधान यांचं परिपूर्ण मिश्रण देतात. योग्य तयारी, आवश्यक उपकरणं आणि मार्गदर्शक असला की तुमचा विंटर ट्रेक अविस्मरणीय ठरेल.जर तुम्ही साहसाचे खरे प्रेमी असाल, तर या यादीतील किमान एक ट्रेक या हंगामात नक्की करा! ( Best Winter Treks )
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
