Home » Best Time to Workout: कोणत्या वेळेस वर्कआउट करणे आहे फायदेशीर? सकाळी की संध्याकाळी?

Best Time to Workout: कोणत्या वेळेस वर्कआउट करणे आहे फायदेशीर? सकाळी की संध्याकाळी?

0 comment
Best Time to Workout
Share

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण स्वतःला मानसिक आणि शारीरिक फिट राहण्यासाठी जिम किंवा योगा चा आधार घेत असतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा झाला आहे. यासाठी काही लोकांना जिममध्ये जाऊन वर्कआऊट करायला आवडतं, तर काही घरीच राहतात. पण लोकांना व्यायामाबद्दल बरेच प्रश्न असतात, जसे की किती वाजता व्यायाम करावा? आठवड्यातून किती वेळ आणि किती वेळा हे करावे. कारण फिटनेस ठेवण्यासाठी त्याबद्दल महत्वाची माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे. आपण कोणत्या वेळी व्यायाम करावा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल? हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. कारण आपल्या जिमच्या वेळेचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांवर होत असतो आणि कारण जिमचा वेळ आपल्या जीवनशैलीशी किंवा म्हणा, दिनचर्येशी संबंधित आहे.आज आपण याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.(Best Time to Workout
 
Best Time to Workout

Best Time to Workout

 
– व्यायाम कधी करावा?
खरतर तुम्ही कधीही व्यायाम करू शकता. वेळ मिळेल तेव्हा त्यानुसार व्यायामाचे वेळापत्रक बनवा. तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल. यासतही तुम्ही व्यायाम कढ़ी करता यापेक्षा तो नियमित करता का? हे जास्त महत्वाच आहे.
 
– दुपारी किंवा संध्याकाळी केला जाणारा व्यायाम 
काही लोकांना दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम करणे आवडते. दुपारी २ ते ७ या वेळेत शरीराचे तापमान जास्त असते. यावेळी जे लोक वर्कआऊट करतात त्यांच्या शरीरात जास्त एनर्जी असते आणि ते खूप अॅक्टिव्ह वर्कआउट करण्यास सक्षम असतात. त्यामुळे सकाळच्या व्यायामाइतकेच या वेळेला केलेला व्यायामही फायदेशीर ठरतो .त्यामुळे तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम करायची सवय असेल तर बिनधास्त करा.
 
Best Time to Workout

Best Time to Workout

 
– सकाळी व्यायाम करायचे फायदे 
संध्याकाळी व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे, याचा अर्थ असा नाही की सकाळी व्यायाम करणे चांगले नाही. सकाळी जिमिंगचे स्वतःचे फायदे आहेत, विशेषत: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी सकाळची वेळ चांगली कारण सकाळी ते जिममध्ये गेले तर त्यांच्या शरीरातील हालचालींची पातळी वाढते. चयापचय दर वाढतो आणि त्या वेळी आपले शरीर जास्त कार्ब लोड करत नसल्यामुळे पेशींच्या आत साठलेली चरबी बर्न करणे थोडे सोपे होते.  
 
– आठवड्यातून किती दिवस व्यायाम करावा?
जर तुम्ही अनेक वर्षांपासून व्यायाम करत असाल तर तुम्ही आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही नुकताच व्यायाम सुरू केला असेल तर आठवड्यातून 3 दिवस व्यायाम करावा. कारण नवीन लोकांना थोडा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मात्र आपण दररोज रनिंग किंवा जॉगिंग केले तर ते केव्हाही चांगले.त्यामुळे तुम्ही सुरुवातीला आठवड्यातून ३ दिवस व्यायाम आणि २ दिवस कार्डिओ केले तरीही चालणार आहे. 
 
============================
हे देखील वाचा: Benefits of Jeera Water: वजन कमी करण्याबरोबरच अनेक समस्या सोडवते जिऱ्याचे पाणी !
============================
 
एक लक्षात घ्या आज काल आपण जी लाइफस्टाइल जगत आहोत ती बघता आपण दिवसाच्या कोणत्या वेळेस जिम ला जातो यापेक्षा आपण नियमित जिम ला जाट आहोत हे जास्त महत्वाच आहे. आपल्याकडे सकाळी किंवा संध्याकाळी कधी वेळ आहे यावर देखील जिम अवलंबून असते. ज्यांना फायदा होत आहे त्यांच्यासाठी संध्याकाळ जास्त योग्य असेल तर याचा अर्थ असा नाही की जर आपण सकाळी जिम केली तर आपल्याला फायदा होणार नाही. वेळ बदलल्याने फक्त ५% फरक पडतो. मग तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही व्यायाम करू शकता. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका, मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर करा.
 
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. यातील कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.