हिवाळा सुरु झाला की, अनेकांचे फिरायला जायचे प्लॅन बनण्यास सुरुवात होते. फिरण्यासाठी हिवाळा हा अतिशय उत्तम ऋतू असल्याने पर्यटक फक्त हा ऋतूच सुरु होण्याची वाट बघत असतात. कायम हिवाळा म्हटले की, अनेक लोकं बीचेस किंवा थंड ठिकाणीच जाण्याचे प्लांनिंग करतात. मात्र काही लोकांना कधीतरी थंडीमध्ये काहीतरी वेगळे अनुभवायचे असते. त्यासाठी ते हटके मात्र सुंदर ठिकाणांच्या शोधात असतात. यासाठी जंगल सफारी अतिशय उत्तम पर्याय आहे. थंड आणि निसर्गाच्या अतिशय जवळ जाऊन आपल्याला या सहलीचा आनंद घेता येतो. त्यामुळे बरेच लोकं हिवाळ्यात जंगल सफारीला जातात. शिवाय पावसाळ्यात बंद असलेल्या या सफारी पावसाळा संपल्यानंतर उघडल्या जातात. हा काळ जंगल सफारीसाठी अतिशय चांगला समजला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय जंगल सफारी कोणत्या आहेत ते सांगणार आहोत. (Winer Trip)
काजीरंगा नॅशनल पार्क
आसाम राज्यात असलेले काझीरंगा हे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याला भेट देण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटन येत असतात. हे ठिकाण वाघ, हत्ती आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थानही आहे. इथे जे पक्षी तुम्हाला इथे दिसतात, ते इतरत्र क्वचितच दिसतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असणारे हे उद्यान ४३० चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापते. जिथे वाघ, हत्ती, जंगली म्हैशी आणि हरीण आणि पक्षी पाहता येतात. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. (Marathi)

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड
हे भारताचे सर्वात जुने नॅशनल पार्क असून 1936 मध्ये स्थापन करण्यात आले होते. येथे तुम्ही रॉयल बंगाल टायगर, हत्ती आणि विविध दुर्मिळ प्राणी पाहू शकता. या ठिकाणी फिरण्यासाठी नोव्हेंबर ते जूनमधील काळ अगदी योग्य आहे. (Todays Marathi Headline)

गिर राष्ट्रीय उद्यान, गुजरात
तुमच्या आवडत्या ठिकाणांच्या यादीत तुम्ही गुजरात राज्यातील गिर राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करू शकता. हे ऐतिहासिक वन्यजीव उद्यान सुमारे १४१२ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. गिर राष्ट्रीय उद्यानाची सहल अत्यंत रमणीय आहे. वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जवळून पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही येथे जंगल सफारीचा आनंद देखील घेऊ शकता. गीर राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे आशियाई सिंह. येथे तुम्हाला आशियाई सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळते. तुम्हाला किंगफिशर, पॅलास डियर, बदके इत्यादींसह ३०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती जवळून पाहता येतील. या सफारीद्वारे तुम्ही जंगलातील अद्भुत जग अनुभवू शकता. (Winter)

रणथंभौर नॅशनल पार्क, राजस्थान
जर तुम्हाला वाइल्डलाइफसोबत ऐतिहासिक वास्तूंचाही आनंद घ्यायचा असेल, तर रणथंभौर नॅशनल पार्क सर्वोत्तम ठरेल. रणथंबोरच्या जंगलात तुम्हाला पुरातन किल्ले आणि सुंदर तलाव पाहायला मिळतील. या जंगलातील सफरीसाठी योग्य वेळ ऑक्टोबर ते जून आहे. वाघ, स्लॉथ अस्वल, मगरी हे जंगलातील आकर्षणाचे केंद्र आहेत. (Marathi News)

कान्हा नॅशनल पार्क, मध्य प्रदेश
तुम्हाला कान्हा नॅशनल पार्क खूप आवडेल. हा नॅशनल पार्क त्याच्या हिरव्यागार झाडझुडपांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलात फिरण्यासाठी हाच काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही ऑक्टोबर महिन्यापासून तर जून महिन्यांपर्यंत कान्हा नॅशनल पार्कच्या सफरीवर जाऊ शकता. विशेष बाब म्हणजे या जंगलांमध्ये तुम्हाला बारशिंगा (स्वँप डियर), रॉयल बंगाल टायगर आणि बिबट्या हे प्राणी पहायला मिळतील. (Top Marathi News)

सुंदरबन नॅशनल पार्क
पश्चिम बंगालमध्ये असलेले सुंदरबन नॅशनल पार्क हे भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेल्या सुंदरबन डेल्टामध्ये स्थित युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. उद्यानाचा भारतीय भाग पश्चिम बंगालमध्ये १३३० चौरस किलोमीटर क्षेत्र इतका व्यापला आहे. हे उद्यान जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून ओळखले जाते. येथे लुप्तप्राय बंगाल वाघ तसेच खाऱ्या पाण्याची मगर, भारतीय डुक्कर, ठिपकेदार हरीण आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. (Latest Marathi Headline)

बांदीपुर नॅशनल पार्क
कर्नाटकमध्ये असलेले बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे दक्षिण भारतातील कर्नाटकमध्ये स्थित एक वन्यजीव अभयारण्य आहे. सुमारे ८७४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हे अभयारण्य पसरले आहे. वाघ, हत्ती, भारतीय बायसन, सांबर हरीण आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे निवासस्थान म्हणून याची ओळख आहे. हे उद्यान निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हने वेढलेले असून मोठ्या निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग आहे. जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळही आहे. येथे येणार्या पर्यटकांना जीप सफारी, नेचर वॉक आणि पक्षीनिरीक्षण सहलीचा आनंद घेता येतो. (Top Trending News)

========
Dating Trend: झिप कोडिंग म्हणजे नेमकं काय? कपल्ससाठी कसा ठरतोय फायदेशीर?
========
ताडोबा अंधारी टायगर रिजर्व
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात स्थित एक वन्यजीव अभयारण्य आहे. हे ६२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले असून भारतातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय वन्यजीव अभयारण्य मानले जाते. या उद्यानात बंगाल वाघ तसेच भारतीय बायसन, सांबर, हरण, भारतीय पँथर, स्लॉथ बेअर आणि विविध प्रजातींचे पक्षी पाहता येतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
