पाकिस्तानच्या इतिहासात डिसेंबर महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजेच १ डिसेंबर हा फार महत्वाचा आहे. कारण या दिवशी १९८८ मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तान मध्ये एक महिला पंतप्रधान झाली. त्यांचे नाव होते बेनजीर भुट्टो (Benazir Bhutto). बेनजीर या कोणत्याही मुस्लिम देशाच्या पहिल्याच महिला होत्या ज्या या पदावर विराजमान झाल्या. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची सर्वात मोठी मुलगी बेनजीर यांचा जन्म २१ जून १९५३ मध्ये कराचीत झाला. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
जगातील प्रसिद्ध युनिव्हर्सिटीत शिकलेल्या बेनजीर भुट्टो यांनी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून अभ्यास पूर्ण केला. तर १९७७ मध्ये पाकिस्तानात परतल्या, १९७८ मध्ये जनरल जिया उल-हक पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले आणि त्यांची सत्ता आल्यानंतर बेनजीर यांचे वडिल जुल्फिकार अली भुट्टो यांना हत्ये प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली गेली. वडील तुरुंगात गेल्यानंतर त्यांची राजकीय विरासत ही बेनजीर यांनी संभाळली.
सैन्याच्या ताकदीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला
राजकरणात प्रवेश केल्यानंतर बेनजीर (Benazir Bhutto) यांनी १० एप्रिल १९८६ मधअये पाकिस्तानातील सैन्य शासनाच्या विरोधात आवाज उठवला आणि एका आंदोलनाची सुरुवात केली. १९८८ मध्ये विमान दुर्घटनेत पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जिया उल-हक यांच्या मृत्यूनंतर १ डिसेंबर १९८८ ला बेनजीर या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
हे देखील वाचा- हिमाचलच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बसने केला घरचा प्रवास, खात्यात होते फक्त ५६३ रुपये
पुन्हा पंतप्रधानाची कमान सांभाळली
बेनजीर या पाकिस्तानातील जनतेची आशा बनल्या. याच कारणास्तव १९८८ नंतर १९९३ मध्ये पु्न्हा पंतप्रधान पदी विराजमान झाल्या. दरम्यान, त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप ही लावले गेले. यामुळे त्यांना देश सोडावा लागला. २००७ मध्ये जेव्हा पाकिस्तानातील सैन्य कमकुवत होऊ लागले होते आणि लोक लोकशाहीची मागणी करत होते तेव्हा बेनजीर परतल्या. निवडणूकीसाठी त्यांनी प्रचार सुरु केला. पण २७ डिसेंबर २००७ मध्ये प्रचारादरम्यान त्यांची हत्या करण्यात आली.
दरम्यान,पाकिस्तानात नेहमीच सत्तेसाठी चढाओढ राहिली आहे. अशातच हत्या ही करण्यात आल्या. अशातच एक-दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर सुद्धा एका रॅलीदरम्यान गोळीबार केला गेला. ही घटना पंजाब मधील वजीराबाद शहरातील अल्लाहवाल चौकाजवळ घडली. यामध्ये सुदैवाने इमरान खान बचावले पण त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपी नवीद मोहम्मद बशीर याला ताब्यात घेतले होते.