इज्राइलच्या सत्तेत पुन्हा एकदा बदल होणार आहे. इज्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणूकीत जवळजवळ९० टक्क्ये मतपत्रांच्या मोजणीसह अनुभवी राजनेते बेंजामिन नेत्याहू (Benjamin Netanyahu) पुन्हा एकदा पंतप्रधान होऊ शकतात. इस्राइलच्या संसदेत १२० सीट्स आहेत. नेतन्याहू यांची लिकुड पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यामध्ये ६५ जागा जिंकू शकतो असा अंदाज आहे. सध्या मतांची मोजणी सुरु असून हे आकडे अंतिम नाहीत. अखेर दीड वर्षानतर त्यांची वापसी का होत आहे आणि मध्य पूर्व स्थिती बदलू शकते याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
इज्राइलमध्ये मतदानानंतर आलेल्या सर्वेक्षणात नेतन्याहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे साडे तीन वर्षाच्या राजकीय हालचालीनंतर सत्तेत पुन्हा येण्यासाठी पुरेशा सीट्स जिंकण्याचे संकेत मिळाले होते. असे मानले जात आहे की, अंतिम निर्णय लवकरच येऊ शकतात.
यरुशमल पोस्ट वृत्तपत्राने केंद्रीय निवडणूक समितीच्या आकडेवारीच्या हवाल्याने असे म्हटले की, लिकुड पार्टीचे नेते नेतन्याहू (७३) जवळजवळ ९० टक्के मतपत्रांच्या मोजणीनंतर निश्चितच इज्राइलचे पुढील पंतप्रधान असतील. नेतन्याहू यांच्या गठबंधनात ६५ एमके यांचा समावेश असणार आहे, तर लॅपिड ब्लॉकमध्ये ५० आणि हदाश-ताल मध्ये पाच सहभागी होतील.

नेतन्याहू सत्तेत आल्याने काय होईल?
स्थानिक मीडियाने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ८८.६ टक्के मतांच्या मोजणीनंतर लिकुडजवळ ३२, येश अतीद जवळ २४, रिलीजियस जियोनिज्म पार्टीजवळ १४, राष्ट्रीय एकता जवळ १२, शासकडे ११, युनाइटेड टोरा यहूदी धर्माजवळ ८, यिराइसल बेयटेनुकडे पाच, राम जवळ पाच, हदाश-तालजवळ पाच आणि श्रमजवळ पाच जागा होत्या.
जवळजवळ दीड वर्षानंतर दक्षिणपंती नेते नेतन्याहू (Benjamin Netanyahu) पुन्हा सत्तेत परतल्यास त्याचे काही महत्व आहे. ते सत्तेत आल्यास फिलिस्तीनसह पुन्हा तणाव वाढण्याचा अंदाज लावला जात आहे. ऐवढेच नव्हे तर गेल्या २-३ वर्षात अरब देशांसह इज्राइलस संबंधात काही बदल झाले आहेत. त्यावर ही काही परिणाम होऊ शकतो. नेतन्याहू हे सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन अधिक खुश होणार नाहीत. कारण नेतन्याहू यांच्यासोबतचे त्यांचे संबंध फार चांगले नाहीत. असे म्हटले जाते की, नेतन्याहू जेव्हा सत्तेल आले होते तेव्हा अमेरिकेवर दबाव टाकत होते की, ईराणच्या विरोधात कठोर कारवाई करावी. मात्र जो बिडेन यांनी आपली कठोर भुमिका कायम ठेवली.
हे देखील वाचा- ब्राजीलचे राष्ट्रपती झाल्यानंतर लूला डी सिल्वा यांचा का केला जातोय विरोध?
सर्वेत नेतन्याहू यांच्या विजयाचे दावे
यापूर्वी तीन प्रमुख इज्राइली टीव्ही स्टेशनच्या मतदानानंतर सर्वेक्षणात असे म्हटले गेले की, नेतन्याहू आण त्यांचे मित्रपक्ष १२० सदस्यीय संसदेत ६५ जागा जिंकू शकतात. इज्राइलमध्ये दोन दिवसाआधी मतदान झाले होते. चार वर्षाच्या कमी वेळेत ही पाचवी वेळ असून जेव्हा देशाला पांगवणारी राजकीय गतिरोधाला मोडण्यासाठी सार्वत्रिक निवडणूक करण्यात आली. इज्राइलमध्य २५ व्या संसदेत निवडणूकीसठी जवळ ६७.८ लाख नागरिक मदतानासाठी योग्य होते.
इज्राइलमध्ये ३ वर्षापूर्वी २०१९ मध्ये ७३ वर्षीय बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर लाच घेणे, फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप लावल्यानंतर राजकीय गतिरोध चालू आहे. पीएम नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय नेतन्याहू इज्राइलचे सर्वाधिक काळातील पंतप्रधान राहिले होते. त्यांनी सातत्याने १२ वर्षापर्यंत शासन केले आणि एकूण मिळून १५ वर्षापर्यंत देशात शासन केले. दरम्यान, त्यांना गेल्या वर्षात सत्तेतून बाहेर पडावे लागले होते.
