Home » Tilgul Ladoo : संक्रांतीचे वैशिष्ट्य असलेल्या तिळाच्या लाडूचे आरोग्याला देखील होतात अनेक लाभ

Tilgul Ladoo : संक्रांतीचे वैशिष्ट्य असलेल्या तिळाच्या लाडूचे आरोग्याला देखील होतात अनेक लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tilgul Ladoo
Share

आता प्रत्येकाच्याच घरात तिळाचे लाडू तयार करण्याची लगबग चालू असेल. संक्रात तोंडावर आल्याने तिळाच्या लाडूची मागणी कमालीची वाढली आहे. संक्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिळाचे लाडू. तीळ आणि गुल या दोन पदार्थांपासून हे चविष्ट आणि पौष्टिक लाडू बनवले जातात. अनेक लोकं तर खास हे लाडू खाण्यासाठी संक्रांतीची वर्षभर वाट बघतात. महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी सर्वाधिक महत्त्व आहे ते तिळगूळ लाडूला. हे लाडू चवीला जेवढे चांगले लागतात तेवढेच ते आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच लाभदायक ठरतात. (Sankranti)

हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता टिकून राहावी यासाठी तीळ आणि गुळाचा उपयोग करण्यात येतो. शरीराला अधिक एनर्जी मिळवून देण्यासह तिळाच्या लाडूचे अनेक फायदे आहेत. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तीळ खावे. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया. (Til Gul Ladoo)

* एका अभ्यासानुसार तिळामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, बी विटामिन्स, मिनरल्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि शरीराला आवश्यक घटक असतात. त्याशिवाय तिळगुळात अनसॅच्युरेटेड फॅट्सदेखील असतात. तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. (Marathi)

* दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

* तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ ऊर्जा देणारे आहेत. तिळामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि गुळामध्ये असलेले लोह शरीराला दिवसभर ऊर्जा देते. शिवाय हे लाडू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करतात. ज्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव होतो. तिळाचे लाडू हिवाळ्यात शरीराला ऊबदार आणि उत्साही ठेवण्यासाठी खूप गुणकारी मानले जातात. (Todays Marathi Headline)

Tilgul Ladoo

* तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात. हे सर्व घटक डोळे, यकृत आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर आहेत. तीळ हे हेल्दी सुपरफूड आहे. तिळगुळामध्ये वापरण्यात येणाऱ्या गुळामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, गुळामुळे त्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. हे लो कॅलरी फूड असल्याने वजन कमी करणारे लोकही त्याचे सेवन करू शकतात. (Top Stories)

* तिळगुळाचे लाडू हे फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. फायबर हे हृदयरोगासंबंधित समस्या आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. फायबर शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर शौचाला कडक होणे वा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.

* तिळामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Marathi News)

* तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. तिळाचे लाडू खाल्ल्याने विशेषतः स्त्रिया आणि वृद्ध लोक ऑस्टियोपोरोसिस अर्थात हाडांचा कमकुवतपणा सारख्या समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठीही हे खूप फायदेशीर आहे.

* तिळामध्ये फायबर रिच अधिक असल्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टिमसह इतर समस्या दूर करण्यास लाभदायक ठरते. डायरिया अथवा अपचनासारख्या समस्या असल्यास तिळाच्या लाडूचे सेवन करावे. भाजलेले तीळ आणि गूळ, खोबरे यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. (Top Marathi News)

* ​तिळगूळामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व आहे. यात मुख्यत्वे जिंकचे प्रमाण अधिक असते. त्वचा आणि केसांसाठी जिंक गरजेचे असून याच्या सेवनाने केस आणि त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. तिळाच्या लाडूमध्ये अधिक प्रमाणात विटामिन ई असून म्हातारपणाच्या खुणा कमी करण्याचेही काम करते, जेणेकरून त्वचा अधिक उजळ आणि तरूण दिसते.

* प्रोटीन आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहे. तिळगुळाच्या लाडूमध्ये प्लांट प्रोटीनचा चांगला स्रोत शरीराला मिळतो. थंडीच्या दिवसात प्रोटीन हवे असल्यास नियमाने तीळगूळ खावा आणि शरीरातील प्रोटीन वाढविण्यास मदत करावी. (Latest Marathi Headline)

========

Sankranti : मकर संक्रांतीला बनवा ‘या’ पद्धतीने सहज सोपे तिळाचे लाडू

Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व

========

लक्षात ठेवा
– तीळाच्या नियमित सेवनाने वजन झपाट्याने वाढते. तिळाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. तिळाच्या अतिसेवनामुळे पोटाची चरबीही झपाट्याने वाढते. जर तुम्ही बराच काळ वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तिळाचे सेवन टाळा. (Top Trending News)
– जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तीळ खाणे टाळा. कारण तिळामुळे त्वचेवर ऍलर्जीची समस्या वाढू शकते. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने रॅशेस, लालसरपणा आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तीळ खाण्याआधी त्याची थोडी चव जरूर घ्या.
– गर्भवती महिलांनी तीळाचे सेवन टाळावे. कारण तिळाचे जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. तीळ खाल्ल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक विकासावरही होतो. गर्भवती महिलांनी तीळ खाणे टाळावे. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.