Bengal SSC Scam- तृणमुल काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या साथीदार अर्पिता मुखर्जी संदर्भात दररोज नवंनवे खुलासे होताना दिसून येत आहेत. त्यामुळे बंगालचे राजकरण अधिक तापले आहे. अर्पिताच्या घरी ईडीने छापेमारी केली असता आतापर्यंत ५३ कोटींहून अधिक काळापैसा जप्त करण्यात आला आहे. आता सध्या तिच्या आणखी दोन फ्लॅट्सवर छापेमारी करण्यात येत आहे. तर यामधून सुद्धा आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान लोकांना कळत नाहीयं की अखेर पार्थ चॅटर्जी यांना ईडीने कोणत्या प्रकरणात अटक केली आहे. तसेच कोणते ते प्रकरण आहे, ज्यामध्ये त्यांची साथीदार अर्पिता चॅटर्जी यांच्या घरी छापेमारी करण्यात येत आहे. अखेर ईडीने अर्पिताच्या घरी छापेमारी का केली? या व्यतिरिक्त आणखी कोणते नेते ईडीच्या रडावर आहेत त्याबद्दल ही अधिक जाणून घेऊयात.
बंगालमधील एसएससी घोटाळा, ज्यामध्ये अडकले गेलेयत पार्थ-अर्पिता
-पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना ज्या प्रकरणात अडकले आहेत त्याला एसएससी घोटाळा किंवा शिक्षण भरती घोटाळा असे म्हटले जात आहे. असे सांगितले जात आहे की, २०१६ मध्ये पश्चिम बंगालच्या सरकारने एसएससीला सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या आणि मदत मिळालेल्या शाळांसाठी १३,००० ग्रुप-डी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.
-२०१९ मध्ये या नियुक्त्या करणारे पॅनलची सीमा संपली होती. परंतु तरीही पश्चिम बंगालच्या माध्यमिक शिक्षण बोर्डाद्वारे कथित रुपात कमीत कमी २५ लोकांची नियुक्ती करण्यात आली होती.
-नोव्हेंबर २०२१ मध्ये कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत या अवैध नियुक्ती व्यवस्थेसंदर्भात तो घोटाळा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कोलकाता हायकोर्टाने एसएससी आणि पश्चिम बोर्डकडून स्पष्टीकरण मागितले होते आणि पुढे सुनावणी झाली. परंतु या दोन्ही संस्थांनी खुल्या कोर्टात एकमेकांसोबत उलटसुलट तथ्य सादर केले होते.(Bengal SSC Scam)

काय होते दोन्ही संस्थांच्या स्पष्टीकरणात
-एसएससीने आपल्या स्पष्टीकरणात असा दावा केला होता की, त्यांनी आपल्याकडून नियुक्ती करण्यासंदर्भात शिफारशीसाठी कोणतीही चिठ्ठी जाहीर केली नव्हती. तर डब्लूबीएसएसईने असे म्हटले की, एका पेन ड्राइव्हमध्ये डेटा मिळाला होता. त्या अंतर्गत या लोकांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आली होती.
-सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी असा सुद्धा दावा केला की. एसएससी पॅनलचा कार्यकाळ संपल्यानंतर बंगाल बोर्डाने २५ नव्हे तर ५०० हून अधिक लोकांना नियुक्त केले. यामधील बहुतांश जण हे राज्य सरकारकडून वेतन घेत आहेत.
पाच खंडपीठाकडून या प्रकरणी सुनावणी
धक्कादाय बाब अशी की, या प्रकरणी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांच्या खंडपीठाने सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. दरम्यान, डिव्हिजन खंडपीठाने त्यांच्या आदेशावर दोन आठवड्यांची बंदी घातली. त्यानंतर न्यायाधीश गंगोपाध्याय यांनी भारताचे चीफ जस्टिस आणि कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशांचे लक्ष याकडे खेचले. गंगोपाध्याय यांनी सीबीआयला आदेश दिले होते की, त्यांनी डब्ल्यूबीएसएससीचे माजी सल्लागार शांतिप्रसाद सिन्हा आणि अन्य चार लोकांच्या नियुक्ती संदर्भात झालेल्या घोटाळ्यासंबंधित चौकशी करावी. तर सिन्हा यांची चौकशी केला असता तर तेथे या प्रकरणातील अन्य लोक डिव्हिजन खंडपीठात पोहचले.
हे देखील वाचा- लोकांना करोडो रुपयांना गंडवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?

दरम्यान, न्यायाधीश हरीश टंडन आणि रबिंद्रनाथ सामंत यांच्या खंडपीठाने खासगी कारणामुळे याचिकाकर्त्यांच्या अपीलवर सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायाशीध शिवागननम आणि सब्ससाची भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने सुद्धा नकार दिला. अखेर ही याचिका न्यायमूर्ती सोमेन सेन आणि न्यायमूत्री एके मुखर्जी यांच्या खंडपीठाकडे सोपण्यात आली. पण यांनी सुद्धा सुनावणीसाठी नकार दिला. चौथ्या वेळेस ही याचिका न्यायामूर्ती जॉयमाल्या बागची आणि बिवस पटनायक यांच्या खंडपीठासमोर आली आणि त्यांनी सुद्धा सुनावणी केली नाही. दोन्ही न्यायाधीशांनी चीफ जस्टिसकडे हे प्रकरण सोपवण्यात सांगितले. अखेर पाचव्या वेळेस न्यायमूर्ती सुब्रत तालुकदार आणि न्यायमूर्ती कृष्ण राव यांच्या खंडपीठाने सुनावणीसाठी होकार दिला आणि आता त्यावर सुनावणी सुरु झाली आहे.
कशी झाली ईडीची एन्ट्री, निशाण्यावर का आहेत पार्थ आणि अर्पिता?
ईडीने या प्रकरणी मे मध्ये तपास सुरु केला होता. २२ जुलैला एजेंसीने पार्थ चॅटर्जीच्या ठिकाणांसह १४ ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्या दरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जी हिच्या प्रॉपर्टी संदर्भातील काही कागदपत्र मिळाली. जेव्हा पार्थकडे अर्पिता हिच्याबद्दल चौकशी केली असता त्याने त्यावर बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ईडीने तपास आणखी वाढवला आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटवर छापा टाकला. अर्पिता ही पार्थची निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. एजेंसीने अर्पिताच्या घरातून तब्बल २१ कोटी रुपयांची कॅश, ६० लाखांचे परदेशी चलन, २० फोन आणि अन्य कागदपत्र मिळाली आहेत. त्यानंतर ईडीने बुधवारी अर्पिताच्या दुसऱ्या ठिकाणी छापेमारी केली. तेव्हा ईडीला अर्पिताच्या घरातून २७.८९ कोटी रुपयांची कॅश मिळाली आहे.(Bengal SSC Scam)
ईडीच्या निशाण्यावर कोण आहेत?
ईडीने या प्रकरणी आतापर्यंत पार्थ चॅटर्डी, अर्पिता मुखर्जी व्यतिरिक्त तृणमुल काँग्रेसचे आमदार मणिक भट्टाचार्य यांची चौकशी केली आहे. या प्रकरणी राज्याचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांची सुद्धा चौकशी झाली आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या मुलीची शिक्षिकेची नोकरी सुद्धा गेली. आरोप असा आहे की, अंकिता अधिकारी हिला नियम धाब्यावर बसवून नोकरी दिली होती.