Home » Benei Menashe : कोण आहेत ? बेनेई मेनाशे ज्यू….ज्यांना इस्रायल परत नेणार !

Benei Menashe : कोण आहेत ? बेनेई मेनाशे ज्यू….ज्यांना इस्रायल परत नेणार !

by Team Gajawaja
0 comment
Share

भारत आणि इस्रायल देशातील मैत्रीचे नवे पर्व आता सुरु होत आहे.  कारण इस्रायल सरकारने भारताच्या मणिपूर आणि मिझोरम या राज्यामध्ये राहणाऱ्या ५,८०० बेनेई मेनाशे ज्यूंना इस्रायलमध्ये नेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत, २४० कोटी रुपयांचे बजेटही इस्रायल सरकारनं मंजूर केले आहे.  त्यामुळे ही स्थलांतर प्रक्रिया वेगानं होणार आहे.  यासाठी एक स्वतंत्र समिती तयार झाली असून २०३० पर्यंत सर्व बेनेई मेनाशे ज्यू उत्तर इस्रायलमध्ये स्थायिक होणार आहेत.  यातून २,५०० बेनेई मेनाशे ज्यू आधीच इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. (Benei Menashe) 

इस्रायल सरकारने भारताच्या ईशान्य भागात राहणाऱ्या यहुदी वंशाच्या बेनेई मेनाशे समुदायासाठी स्थलांतराचा सर्वात मोठा प्रस्ताव मंजूर केला आहे. या उपक्रमांतर्गत, इस्रायल ५,८०० बेनेई मेनाशे ज्यू नागरिकांना इस्रायलमध्ये नेणार आहे. या निर्णयामुळे मणिपूर आणि मिझोरममध्ये दशकांपासून रहाणा-या बेनेई मेनाशे ज्यू नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या स्थलांतरासाठी इस्रायल सरकारनं स्वतंत्र समिती नेमली असली तरी, भारत सरकारनंही या सर्व स्थलांतरासाठी समिती नेमली आहे, त्यातून ही स्थलांतर प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.  या निर्णयामुळे भारत आणि इस्रायलमधील सामाजिक-सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत होणार आहे.  या योजनेनुसार २०३० पर्यंत एकूण ५,८०० बेनेई मेनाशे ज्यू इस्रायलमध्ये जाणार आहेत. २०२६ या वर्षात १,२०० बेनेई मेनाशे ज्यूचे स्थलांतर होणार आहे.  त्यांची स्थलांतर प्रक्रिया आधीच मंजूर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया चालू असतांना बेनेई मेनाशे ज्यू समुदाय मणिपूर आणि मिझोरम येथे कसा आला, याचीही चर्चा सुरु आहे. 

या दोन राज्यातील बेनेई मेनाशे ज्यू हा समुदाय प्राचीन इस्रायलच्या मेनाशे जमातीचे वंशज असल्याचा दावा करतो.  त्यांना सुमारे २,७०० वर्षांपूर्वी अ‍ॅसिरियन लोकांनी देशातून बाहेर काढले होते.  त्यानंतर त्यांनी या दोन राज्यात आसरा घेतला.  त्यांनी आपल्या समुदायाच्या परंपरा येथे कायम ठेवल्या.  एवढ्या वर्षात त्यांनी इस्रायलसोबत आपले संबंध कायम जोडण्याचा प्रयत्न केला.  शिवाय पून्हा इस्रायलमध्ये जाण्याचा या बेनेई मेनाशे ज्यूंच्या प्रत्येक पिढीनं प्रयत्न केला.  शेवटी  २००५ मध्ये, तत्कालीन सेफार्डी प्रमुख रब्बी श्लोमो अमर यांनी या बेनेई मेनाशे ज्यूंना “इस्रायली वंशज” म्हणून मान्यता दिली.  शिवाय हे स्पष्ट केले की, ते ज्यू वारशाचा अविभाज्य भाग आहेत.  हा मोठा टप्पा मानला गेला. या धार्मिक मान्यतेमुळे बेनेई मेनाशे ज्यूंना अधिकृतपणे इस्रायलमध्ये स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला. (Benei Menashe) 

आता हे स्थलांतर होतांना ज्यू एजन्सी संपूर्ण इमिग्रेशन प्रक्रिया हाताळणार आहे. बेनेई मेनाशे ज्यू समुदायाला या प्रक्रियांमधून जावे लागेल. इस्रायलचे मुख्य रब्बीनेट, धार्मिक संस्था, या व्यक्तींसाठी पात्रता मुलाखती घेतील आणि सर्व औपचारिकता रूपांतरण प्राधिकरण आणि लोकसंख्या आणि इमिग्रेशन प्राधिकरणासोबत पूर्ण केल्या जातील. इस्रायलमध्ये त्यांची निवास व्यवस्था करण्यात येईल.  सोबतच इस्रायलची भाषा असलेल्या हिब्रू भाषेचे वर्गही त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येतील. याशिवाय अन्य आवश्यक सुविधाही सरकारकडून पुरवल्या जाणार आहेत.  स्थलांतरित होणा-या या बेनेई मेनाशे ज्यूंना इस्रायल सरकारकडून नोकरीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलमध्ये धार्मिक शिक्षण आणि एकात्मता कार्यक्रम महत्त्वाचे असतात.  याचेही आयोजन करण्यात येणार आहे.  या सर्व प्रक्रियेमध्ये भारत सरकारचीही मदत घेण्यात आली आहे.  

========

China VS Japan : तैवानवरुन चीन जपान युद्धाच्या उंबरठ्यावर !

========

मणिपूर आणि मिझोरम या दोन राज्यांमध्ये बेनेई मेनाशे ज्यू समुदायाची अंदाजे १०,००० कुटुंबे आहेत.  त्यांना स्थानिकही बेनेई मेनाशे ज्यू म्हणून ओळखतात.  भारताच्या ईशान्य भागात हा बेनेई मेनाशे ज्यू समुदाय विखुरलेल्या स्वरुपात आहे.  मणिपूर आणि मिझोरम या राज्यांसह आसाम आणि नागालँडमध्येही बेनेई मेनाशे ज्यू समुदाय रहात आहे.  या समुदायाची इस्रायलमध्ये जाण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरु आहे.  १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून येथील हजारो लोकांनी इस्रायलमध्ये जाण्याची सर्व धार्मिक प्रक्रिया पूर्ण केली.  मात्र त्यानंतर ही प्रक्रिया थंडावली.  आता पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाल्यामुळे या बेनेई मेनाशे ज्यूंना दिलासा मिळाला आहे.  (Benei Menashe) 

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.