सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणवारांचा महिना. हा महिना सुरु झाल्यानंतर सणवार एकापाठोपाठ येतातच. श्रावण, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी अशी सर्वच सणांची मोठी रंग असते. आता आपल्या भारतामध्ये विविध सणांना आणि व्रतांची महिला नटणार नाही असे होणे शक्यच नाही. नटण्यासाठी महिला छोट्या छोट्या कारणांची वाटच बघत असतात. आणि आता तर सर्वांचे आवडीचे सणवार म्हटल्यावर नटणे तर आलेच. (silver Jewellery)
आता नटणे म्हणजे केवळ मेकअपच नाही तर विविध दागिने घालून मिरवणे. महिलांना दागिन्यांची फारच हौस असते. सोने चांदी, मोती आदी विविध प्रकारचे दागिने महिला घालतात. आपल्याकडे आपले पूर्वज सांगायचे की, कंबरेच्या वर घातले जाणारे दागिने हे शक्यतो सोन्याचे असावेत आणि कंबरेच्या खाली घातले जाणारे दागिने हे चांदीचे असावे. कानातले, झुमके, हार, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी सर्व दागिने सोन्याचे परिधान केले जातात. पायात घातले जाणारे दागिने हे चांदीचेच असावेत. त्यामध्ये जोडवी, तोरड्या, वाळा, पैंजण. (Marathi News)
यातला पैंजण हा दागिना म्हणजे पारंपरिक दागिना, मात्र याला आजच्या आधुनिक काळात फॅशन ट्रेंड म्हणून देखील पाहिले जाते. महिलांच्या १६ शृंगाराचा एक भाग म्हणून पैंजण आणि जोडवी ओळखली जातात. चांदीचे पैंजण आणि पायातल्या बोटात जोडव्या घालण्याची ही परंपरा, जुनी असली तरी आजही अनेक सुहासिनी महिला पाळतात. तसेच सौभाग्यलंकार म्हणून या दागिन्यांचा मान मोठा आहे. अनेक महिला पैंजण लग्नांधी देखील घालतात. मात्र विवाहानंतर तर महिला नेहमी पायात पैंजण आणि जोडवी घालतात. मात्र तुम्हाला माहित आहे का…की पैंजण आणि जोडवी हे आपले सौंदर्य वाढवणारे दागिने नसून, आपल्या आरोग्याला उत्तम ठेवणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. (Trending Headline)
ऐकून आश्चर्य वाटले ना…? आता तुम्ही म्हणाल पैंजण आणि जोडवी घालण्याचा आणि आरोग्याचा काय संबंध? संबंध आहे आणि खूपच जवळचा. पण पायात पैंजण घालण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. पैंजण तुमच्या पायांचे सौंदर्य तर वाढवतातच पण तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देखील देतात. पैंजणातून निघणारा आवाज सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. चांदीचे गुण शरीर आणि मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम करतात. पायात पैंजण आणि जोडवी घालण्याचे महिलांना कोणकोणते फायदे होतात, जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
रक्ताभिसरण चांगले होते
चांदीचे पैंजण घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि पायाला मुंग्या येण्याच्या समस्या दूर होतात. चांदीचे पैंजण घातल्याने महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, स्त्रीरोगविषयक विकार, वंध्यत्व आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. (Top trending News)
रोगप्रतिकारक शक्ती
चांदीचे पैंजण घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. रोगप्रतिकारक शक्ती किंवा पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, तर अशा महिलांनी आजपासूनच पायात चांदीचे पैंजण घालण्यास सुरुवात करा. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत होईल. (TOp Marathi Headline)
हाडे मजबूत होतात
पायात पैंजण घातल्याने एक्यूप्रेशरचे काही पॉइंट दाबले जातात आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पैंजण घातल्याने हाडे मजबूत राहतात. पायांच्या संपर्कात पैंजण आल्यावर चांदी त्वचेला घासली जाते आणि शरीरात जाते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. (Latest Marathi News)
स्नायू मजबूत होतात
विवाहित महिलांनी पायात जोडवी घालणे फार महत्त्वाचे मानले जाते. जोडवी घातल्याने मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात. जोडवी एका विशिष्ट नसावर दबाव निर्माण करते. ज्यामुळे गर्भाशयात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. यामुळे गर्भधारणा क्षमता सुधारण्यास मदत होते. जोडवी घातल्याने त्याचा दाब बोटांच्या नसेवर पडतो, यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. वैद्यकीय शास्त्रानुसार मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते. (Top Stories)
शरीराचे योग्य तापमान राखले जाते
चांदी हा धातू शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. चांदीचे पैंजण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. चांदीचे पैंजण घातल्याने पायात कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर त्यापासून आराम मिळतो. पाय दुखत असतील किंवा पायाला सूज येत असेल तर पायात चांदीचे पैंजण घाला.
=========
Shravan : आजचा दुसरा श्रावणी सोमवार, आज कोणती शिवामूठ वाहणार?
Andhra Pradesh : दक्षिणेची काशी-श्रीकालहस्ती मंदिर !
सकारात्मक ऊर्जेचे स्थलांतर
पायातील पैंजणामध्ये निघणारा आवाज सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आपल्या शरीरातील ऊर्जा आपल्या पायातून शरीरातून बाहेर पडते. स्त्रिया जेव्हा चांदीचे पैंजण घालतात तेव्हा शरीरातील उर्जा वाया जात नाही. आपले शरीर सकारात्मक उर्जेने भरलेले राहते. (Social News)
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कोणाही माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)