Walking After Dinner : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण रात्री उशिरा जेवण करणे आणि त्यानंतर लगेच मोबाईल वापरून झोपायला जाणे ही सवय केली आहे. पण या सवयीमुळे पचनतंत्रावर मोठा ताण येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवणानंतर 20-30 मिनिटे साधे चालणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार दूर ठेवता येतात आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते. (Walking After Dinner )
पचन सुधारते आणि अॅसिडिटीपासून बचाव जेवणानंतर लगेच झोपल्याने अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोटफुगी, मळमळ, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या वाढते. मात्र, जेवणानंतर हळू-हळू चालल्याने पचनक्रिया वेगाने सुरू होते आणि अन्न सहज पचते. यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी कमी होतात आणि झोप देखील चांगली लागते. (Walking After Dinner )

Walking After Dinner
वजन नियंत्रणात मदत दररोज रात्री 20-30 मिनिटे चालल्याने कॅलरी बर्न होतात. त्यामुळे पोटाभोवती जमा होणारी चरबी कमी होते. नियमित चालण्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि जादा वजन वाढण्याचा धोका कमी होतो. वजन कमी करण्यासाठी हा नैसर्गिक आणि सोपा उपाय मानला जातो.
डायबिटीज रुग्णांसाठी वरदान डायबिटीज असणाऱ्यांनी रात्री जेवणानंतर चालणे ही सवय नक्की अंगीकारावी. चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि शुगर स्पाईक होण्यापासून बचाव होतो. अनेक तज्ज्ञही शुगर कंट्रोलसाठी पोस्ट-डिनर वॉकची शिफारस करतात.
हृदयासाठी फायदेशीर चालण्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि हृदयावरील दाब कमी होतो. ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. नियमित चालणे ही हृदय विकारांपासून बचाव करणारी सर्वात सोपी आणि प्रभावी सवय आहे. (Walking After Dinner )
ताण कमी होतो व झोप सुधारते दिवसभराचा थकवा, मानसिक ताण आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी चालणे उत्तम उपाय आहे. रात्री हवेत थोडी शांतता असते, त्यात चालल्याने मेंदू रिलॅक्स होतो. यामुळे चिंताग्रस्तता कमी होते आणि गाढ झोप लागते.
किती आणि कसे चालावे?
जेवणानंतर 10 मिनिटे थांबून मग चालणे सुरू करावे
20-30 मिनिटांचा हलकाफुलका वॉक सर्वोत्तम
अतिजोरात धावणे किंवा व्यायाम टाळावा
दररोज ही सवय कायम ठेवावी
=====================
हे देखील वाचा :
Tax Free : लाखों कमवा, पण भरावा लागणार नाही कर! जाणून घ्या कुठे मिळते ही खास सुविधा
Post Office : एकदाच गुंतवणूक आणि दर महिन्याला निश्चित इनकम! पोस्ट ऑफिसची कमाल योजना
Health-Effects : दिवसभर व्हिडिओ पाहण्याची सवय? आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी जाणणे आहे खूप महत्त्वाचे!
=======================
थोडेसे बदल आपल्या दैनंदिन सवयींमध्ये केल्यास आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रात्री जेवणानंतर चालणे हा अगदी साधा, पण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे आजपासूनच ही सवय सुरू करा आणि आपल्या आरोग्याला भेट द्या एक निरोगी जीवन!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
