‘चहा मिळाला नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो.’ असे वाक्य आपण अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकत असतो. उठल्यावर सर्वात आधी हातात चहाचा कप घेणारे भरपूर लोकं आपल्याला भेटतात. चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मसाला चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, हनी टी, हर्बल टी आदी अनेक प्रकारचे चहा आपल्याकडे प्यायले जातात. चहा कोणताही असो, त्यावर असलेले सगळ्यांचे प्रेम सारखेच आहे. अनेक वेळा आपण ऐकले आहे की, चहा पिऊ नये, चहा प्यायल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे चुकीचे आणि गंभीर परिणाम होतात. असे असले तरी चहाचे अनेक फायदे देखील आहेत. आज जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया चहाचे फायदे. (Tea)
गंभीर आजारांपासून बचाव
दररोज २ ते ३ कप चहा प्यायल्याने अकाली मृत्यू, हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेह या ४ धोकादायक आजारांपासून काही प्रमाणात बचाव करता येतो. शास्त्रज्ञांना निरीक्षण संशोधनात हे लक्षात आले आहे.
पचनक्रिया मजबूत होते
आल्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. साधा चहा प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, तर आल्याचा चहा प्यायल्याने अॅसिडिटीसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. (Marathi Top News)
वजन कमी होण्यास मदत
आल्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आल्यामध्ये असलेले पोषक घटक चयापचय वाढवण्याचे काम करतात. हा चहा कॅलरी बर्न करण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतो.
अँटिऑक्सिडंटने समृद्ध
चहामध्ये वेलची, दालचिनी, आले आणि लवंगा यासारख्या घटकांचा वापर केला जातो. हे सर्व घटक अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. यामुळे हृदयरोग, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात. (Marathi Latest News)
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
आल्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संसर्गाचा धोकाही कमी असतो.
=======
हे देखील वाचा : Tea : भारतीयांसाठी अमृततुल्य असलेल्या चहाची गोष्ट
=======
डोकेदुखीमध्ये फायदा
काळ्या चहामध्ये कॅफिन असते यामुळे डोकेदुखीचा प्रभाव कमी होतो. एका अभ्यासानुसार, एक कप चहामध्ये ५० मिलीग्राम कॅफिन असते. यामुळे आपली एकाग्रता शक्ती मजबूत होते. शिवाय डोकेदुखी देखील कमी होते.(Top Trending News)
हृदयासाठी फायदेशीर
ब्लॅक टी किंवा ग्रीन टी संतुलित प्रमाणात सेवन केल्यास हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. चहा धमण्यांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया दुर करतो आणि त्याचे कार्य चांगले करण्यासाठी मदत करतो. यामुळे रक्त प्रवाह योग्य प्रकारे होतो. यामध्ये फ्लेवनाइड नावाचे अँटी-ऑक्सिडेंट असते जे हृदयाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासुन दुर ठेवण्यास मदत करते. (Social News)