Home » Tea Bag टी बॅग वापरून मिळवा चमकदार त्वचा आणि उत्तम सौंदर्य

Tea Bag टी बॅग वापरून मिळवा चमकदार त्वचा आणि उत्तम सौंदर्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tea Bag
Share

आजकाल प्रत्येक जणं मग तो स्त्री असो किंवा पुरुष आपल्या चेहऱ्याची कमी जास्त प्रमाणात काळजी घेत असतात. पार्लरमध्ये जाऊन काही साधे उपचार, फेशियल करणे तर खूपच सामान्य झाले आहे. मात्र यासोबतच काही लोकं अनेक घरगुती उपचार देखील करतात. ज्यामुळे त्यांचा चेहरा अधिक छान आणि चमदार होतो. (Tea Bag)

आपण जर आपल्या किचनमध्ये पाहिले तर अनेक अशा गोष्टी असतात ज्याचा वापर करून आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो. बेसन, तांदुळाचे पीठ, लिंबू, दही आदी अनेक पदार्थ वापरून चेहरा छान दिसू लागतो. यातच पण जर पाहिले तर आपल्या कितचनमधील अजून एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला चांगले दिसण्यात नक्कीच मदत करू शकते. ती गोष्ट म्हणजे टी बॅग. (Beauty Tips)

चहा (Tea) बनवण्यासाठी वापरण्यात येणारी टी बॅग (Tea Bag) आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात देखील लाभदायक आहे. टी बॅग वापरुन झाल्यानंतर आपण ती फेकून देतो. मात्र असे करू नका. या टी बॅगचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जर तुम्ही ऐकले तर आतापासून तर ही बॅग त्वचेवर वापरल्यानंतरच फेकाल. चला तर जाणून घेऊया टी बॅगचे फायदे आणि त्याचा उपयोग नेमका कसा करायचा ते. (Marathi News)

टी बॅगमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आपली त्वचा आणि केस सुधारण्यास मदत करतात. (Benefits Of Tea Bag)

Tea Bag

– सुजलेले डोळे दूर करण्यासाठी टी बॅग चांगला पर्याय आहे. वापरलेल्या टी बॅग फ्रीजमध्ये ठेवाव्या. त्यानंतर १० -१५ मिनिटे त्या डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज कमी होते आणि थकलेल्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. (Latest Marathi News)

– निस्तेज त्वचेला ताजेतवाने करण्यासाठी टी बॅग देखील खूप फायदेशीर आहेत. टी बॅगमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. (Top Stories)

– अनेकदा काही लोकांना सनबर्नचा त्रास होतो. ग्रीन टी बंग फ्रिजमध्ये ठेवाव्या आणि सनबर्न झालेल्या भागावर लावाव्या. यामुळे त्वचा थंड होते आणि चिडचिड कमी होते. (Todays Marathi News)

– आजच्या काळात अनेकांना केस खूप कोरडे आणि निर्जीव होणे याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी टी बॅगचा वापर केला जाऊ शकतो. वापरलेल्या टी बॅगचा वापर केस धुण्यासाठी करावा. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात.

– चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग यापासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टी बॅगचा वापर करू शकतो. वापरलेली ग्रीन टी बॅग मुरुमांवर लावावी कारण यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांच्या मदतीने डाग कमी करण्यास मदत करते.

– वाढत्या वयासोबतच त्वचेवर पोअर्स दिसायला लागतात. काही काळाने त्वचेवर बारीक बारीक खड्डे दिसू लागतात. कमी वयात तुम्हाला असा ओपन पोअर्सचा त्रास असेल तर त्वचेवर पिंपल्सचा त्रास देखील होऊ शकतो. मात्र ग्रीन टीची टी बॅग वापरून हे पोअर्स कमी करता येतात.

– जर त्वचेमध्ये ऑक्सिडंट घटक वाढले की, त्वचा अधिक रुक्ष दिसू लागते. त्वचेच्या तक्रारी वाढू लागतात. टी बॅगमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्याचे काम करतात.

=============

हे देखील वाचा : सावधान येत आहे, हाडं गोठवणारी थंडी !

=============

– वापरलेले ग्रीन टी बॅग स्क्रब हे एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे जे चेहऱ्याला घट्ट करते आणि नैसर्गिकरित्या चेहऱ्याची चमक वाढवते. त्यामुळे हे चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जाते. स्क्रब करण्यासाठी, वापरलेल्या चहाच्या पिशवीत थोडी दाणेदार साखर आणि पाणी मिसळा आणि नंतर त्याचा चेहरा स्क्रब करा.

– टी बॅग्स आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. या वापरलेल्या चहाची पाने घेऊन त्याची तुम्ही बारीक पेस्ट करू शकता. त्यानंतर, ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर फेस मास्क प्रमाणे लावू शकता. यामुळे, तुमची त्वचा चांगल्या प्रकारे टोन होते आणि त्वचा ग्लो करते.

(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.