Benefits of surya namaskar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी सूर्यनमस्कार करणे फार फायदेशीर मानले जाते. हा योगा केल्याने शुगर लेव्हल कमी होते आणि त्यात सोबत वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियेत सुधारणा होते. सूर्यनमस्कार करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातेच. पण मधुमेहाच्या रुग्णांनी कशा पद्धतीने करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सूर्यनमस्कार केल्यान पनचक्रिया सुधारली जाते. यशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यासह तणाव णि टेन्शनही कमी होते. सूर्यनमस्कारमुळे शरीर लवचीक होते आणि शरीर टोण्ड होते. पण सूर्यनमस्कार करताना काय काळजी घ्यावी हे पाहू.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सूर्यनामस्कर केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय आरोग्यासंबंधित होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकता.

Surya Namaskar Benefit
श्वसनाचा त्रास दूर होतो
सूर्यनमस्कार केल्याने श्वसनासंदर्भातील त्रास कमी होण्यास मदत होते. याशिवाय श्वसन नलिकेत होणारे इन्फेक्शनही दूर होण्यासह फुफ्फुसांची क्षमता आणि ऑक्सिजनचा फ्लो शरीरात वाढला जातो.
ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते
सूर्यनमस्कार केल्याने शरीरामध्ये ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते. याशिवाय संपूर्ण आरोग्य आणि केस हेल्दी राहण्यास मदत होते. सूर्यनमस्कार आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी पॉवरफुल्ल टेक्निक आहे. हे शरीर, श्वास आणि चेतना यांच्यात खोल संबंध निर्माण करते.
=======================================================================================================
हेही वाचा :
उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींचे सेवन करणे टाळा
तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित
=======================================================================================================
शरीर डिटॉक्स होण्यास मदत
सूर्यनमस्कार करताना, श्वास घेण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यामुळे तुमच्या फुफ्फुसांपर्यंत हवा योग्यरित्या पोहोचते.यामुळे रक्ताला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळते. याशिवाय शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.(Benefits of surya namaskar)
वजन झपाट्याने कमी होते
सूर्यनमस्कार केल्याने पोट आणि स्नायूंमध्ये ताण येतो. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे पचक्रिया देखील सुधारली जाते.