Home » हातात चांदीचे कड घालणे मानले जाते शुभ, जाणून घ्या फायदे

हातात चांदीचे कड घालणे मानले जाते शुभ, जाणून घ्या फायदे

by Team Gajawaja
0 comment
Benefits of silver
Share

सध्या बहुतांश जणांच्या हातात कड घातलेले दिसते. काही लोकांच्या हातात तांब्याचे, अष्टधातु किंवा चांदीचे कड असतं. पण त्यापैकी काही लोक ती एक फॅशन म्हणून घालतात असतील. मात्र काही लोक अशी सुद्धा आहेत जे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार ते घालतात. (Benefits of silver)

ज्योतिष शास्रात चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असल्याचे मानले जाते. त्यानुसार, पुरुष मंडळींनी डाव्या हातात चांदीचे कड घालावे. यामुळे कुंडलीतील काही दोष दूर होतात. या व्यतिरिक्त जर सातत्याने अपयश मिळत असेल तर तुम्ही चांदीचे कड घातले पाहिजे. यामुळे ही तुम्हाला फायदा होईल. अशातच जाणून घेऊयात चांदीचे कड घातल्याने नक्की काय फायदे होतात.

ज्योतिष शास्रात चांदीचे महत्व
ज्योतिष शास्रानुसार चांदीचा संबंध जसे आपण पाहिले चंद्र आणि शुक्राशी असतो. त्यामुळे तुमच्या कुंडलीत चंद्र हा शुभ असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहते. त्याचसोबत शुक्र अनुकूल असले तर तुम्हाला संपन्नता प्राप्त होते. अशातच चांदीचे कड घातल्याने तुमच्या कुंडली या दोन्ही ग्रहांची स्थिती मजबूत होऊ शकते. यामुळे उत्तम आरोग्यासह सुख-समृ्द्धी ही प्राप्त होतेच. पण घरात धन-धान्याची भरभराट ही होत राहते. ज्योतिष शास्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र कमजोर आहेत त्यांनी चांदीचे कड जरुर घातले पाहिजे.

चांदी घालण्याचे फायदे
चांदी घातल्याने मन शांत आणि एकग्र राहते. चांदी शीतलता प्रदान करणारा धातु मानला जातो. अशातच ते घातल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता. या व्यतिरिक्त चांदी घातल्याने मनाची चंचलता कमी होते. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात स्थिरता येण्यास ही मदत होते. चांदीचे कडं घातल्याने सर्दी-खोकल्यासारखे आजर ही दूर राहतात. त्वचे संबधित समस्या ही उद्भवत नाहीत. (Benefits of silver)

वास्तुशास्रात चांदीचे काय आहे महत्व?
वास्तुशास्रानुसार, चांदीला सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवणारा धातु मानले जाते. त्यानुसार, चांदीचे कड घातल्याने तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची नकारात्मकता दूर होते. तसेच मनात येणारे नकारात्मक विचार ही दूर होतात. वास्तु शास्रानुसार, शुक्रवारच्या दिवशी चांदीचे कड घालणे शुभ मानले जाते. परंतु ते घालण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला जरुर घ्या.

हे देखील वाचा- आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करतायत तर ‘हे’ वास्तुचे उपाय करुन पहा

कोणत्या दिवशी चांदी घालावी
चांदी सोमवार किंवा शुक्रवारच्या दिवशी घालावी. सोमवार हा चंद्राचा तर शुक्रवार हा शु्क्र ग्रहाचा मानला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.