Home » प्रत्येकाने रोज जरूर करावा ‘लेग्स अप द वॉल’ पोजचा सराव, जाणून घ्या फायदे

प्रत्येकाने रोज जरूर करावा ‘लेग्स अप द वॉल’ पोजचा सराव, जाणून घ्या फायदे

by Team Gajawaja
0 comment
legs up the wall
Share

शरीराचे आरोग्य राखण्यासाठी दिनचर्येमध्ये योगासनांचा समावेश करणे, हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. योगासनांमुळे तणाव कमी होण्यास आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत होते. योगासनांचा मन आणि शरीर या दोन्हींवर सकारात्मक परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्व वयोगटातील लोकांनी दररोज योगाभ्यासासाठी वेळ काढला पाहिजे. असे केल्याने, आपण शारीरिक निष्क्रियतेचा धोका कमी करू शकता, जे सध्या अनेक रोगांचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाते. यामुळे, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश केला पाहिजे.(legs up the wall)

योग तज्ञांच्या मते, लेग्स अप द वॉल (legs up the wall) पोज किंवा विपरित करणी योगाचा सराव, हा शरीराच्या सर्व भागांसाठी सर्वात फायदेशीर मानला जाणारा एक योग आहे. पायापासून डोक्यापर्यंतचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी, तसेच रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी विपरित करणी योग अत्यंत प्रभावी मानला जातो. लेग्स अप द वॉल पोजचा दैनंदिन सराव तुमच्यासाठी तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, तसेच अनेक शारीरिक समस्या टाळण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया याचे आरोग्यदायी फायदे…

====

हे देखील वाचा – प्रत्येक गृहिणीसाठी आवश्यक आहे ‘या’ योगासनांचा सराव, फिटनेससाठी आहेत अत्यंत उपयुक्त

====

विपरित करणी योगाचा सराव कसा केला जातो?

शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी, विपरित करणी योगाचा सराव हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. या योगाचा नियमित सराव करण्याची सवय तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. या योगाभ्यासासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि हात आणि पाय जमिनीवर सरळ ठेवा. आता हळूहळू दोन्ही पाय वर करा, म्हणजे पायात ९० अंशाचा कोन तयार होईल. पाठ आणि डोके जमिनीवर राहतील याची खात्री करा. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर पूर्ववत स्थितीत परत या.(legs up the wall)

विपरित करणी योगाचे फायदे काय आहेत?

लेग-अप-द-वॉल पोजचे(legs up the wall) शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. मानेपासून पायापर्यंतचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी योगा नियमितपणे करण्याची सवय विशेष फायदेशीर ठरू शकते.

– शरीराला आराम देण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी फायदेशीर व्यायाम.

– तणावापासून आराम मिळतो.

– गुडघेदुखी कमी करण्यास उपयुक्त.

– मानेतील तणाव आणि वेदना कमी करतो.

– पायांचा थकवा दूर करण्यासाठी, हा एक विशेष फायदेशीर व्यायाम आहे.

– मन शांत ठेवतो.

– पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो.

विपरित करणी योगाची खबरदारी 

लेग-अप-द-वॉल(legs up the wall) पोज करताना पायाने ९० अंशाचा कोन करण्यात अडचण येत असेल, तर त्यासाठी तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. मासिक पाळीत किंवा गुडघ्याला दुखापत झाल्यास हा योगाभ्यास टाळावा. गरोदर स्त्रिया, उच्च रक्तदाब किंवा हर्निया असलेल्या लोकांनी हा योगाभ्यास करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.