Home » Strawberry : गोड आंबट स्ट्रॉबेरी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Strawberry : गोड आंबट स्ट्रॉबेरी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Strawberry
Share

हिवाळा सुरु झाला की, बाजारात भरपूर विविध प्रकारच्या भाज्या, फळं मिळण्यास सुरुवात होते. यात अशा अनेक भाज्या किंवा फळं असतात जे फक्त हिवाळ्यातच मिळतात. त्यामुळे हिवाळा सुरु झाल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता असते ती आपल्या आवडत्या भाज्या आणि फळे मिळणार याची. भाज्यांमध्ये म्हणायचे झाले तर मटार आणि गाजर हे हिवाळ्याचे वैशिष्ट्ये असते तर फळांमध्ये आपल्या सर्वांनाच आवडणारी स्ट्रॉबेरी. (Strawberry)

लालबुंद आंबट गोड असणारी स्ट्रॉबेरी हिवाळ्यात बाजारात यायला सुरुवात होते. त्यांना पाहून आपण त्यांच्या प्रेमातच पडतो आणि त्या घेतोच. अनेकांसाठी हिवाळा म्हणजे स्ट्रॉबेरी असेच समीकरण असते. स्ट्रॉबेरीपासून विविध गोड पदार्थ बनवतात येतात आणि ते कमालीचे लोकप्रिय देखील आहे. मात्र अनेकांना स्ट्रॉबेरी अजिबातच आवडत नाही. यामागचे कारण असे खास नसते पण तरीही आवडत नाही. पण स्ट्रॉबेरी खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. (Marathi)

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात, जे अनेक आरोग्य समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. व्हिटॅमिन C ने परिपूर्ण स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे तुम्हाला इन्फेक्शनपासूनही दूर ठेवते. स्ट्रॉबेरीचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता. हिवाळ्यात हे खाणे जास्त फायदेशीर आहे. (Marathi News)

स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते. एवढेच नाही स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात. स्ट्रॉबेरीमधील ‘फोलेट’ हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. (Todays Marathi Headline)

Strawberry

ज्यांना पोटाचे आजार आहे, त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी उत्तम आहे. स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असून पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. नियमित स्ट्रॉबेरी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Top Marathi Headline)

स्ट्रॉबेरीमधील व्हिटॅमिन सी पोट साफ करण्यास मदत करते. हे फळ खाल्ल्याने आतड्यांना आराम मिळतो. गॅस आणि ऍसिडिटीसाठी हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. स्ट्रॉबेरी फायबरचा चांगला स्रोत असल्याचे आढळून येते. याचे सेवन पचनासाठी रामबाण उपाय मानले जाते. स्ट्रॉबेरी बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते. रोजचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही कमकुवत हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर स्ट्रॉबेरी तुमची समस्या दूर करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. (Latest Marathi News)

स्ट्रॉबेरीमध्ये विविध जीवनसत्त्वे, मँगनीज, पोटॅशियम, फायबर्स आणि पॉलिफेनॉलसारखे उत्तम अँटिऑक्सिडंट्स असतात. स्ट्रॉबेरीज या सोडियम फ्री, फॅट फ्री, कोलेस्ट्रॉल फ्री असतात. याशिवाय स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. शिवाय, त्यात असलेले फायबर आणि इतर संयुगे रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करतात. यामुळे खाल्ल्यानंतर लगेच रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखले जाते. मधुमेहींसाठी हे खूप फायदेशीर आहे. (Top Trending News)

=======

Health : …म्हणूनच केळीच्या पानावर जेवण करणे आहे आरोग्यदायी

=======

आपण आवश्यकतेपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास ते आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढवते. कारण त्यात नैसर्गिक साखर असते. म्हणून जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या फळात अधिक प्रमाणात कीटकनाशके असू शकतात. तथापि, हे सर्व काही ते कुठे पिकले आहे, यावर अवलंबून आहे. म्हणूनच योग्य प्रमाणात आणि मर्यादित स्वरुपात त्याचा वापर केला पाहिजे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.