Home » Carrot : हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या गाजराचे आहेत अगणित आरोग्यवर्धक लाभ

Carrot : हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या गाजराचे आहेत अगणित आरोग्यवर्धक लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Carrot
Share

जसजशी हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते, तसे बाजारात हळूहळू लाल चुटुक गाजराचे आगमन होण्याची सुरुवात होते. आता गाजर आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सॅलड, हलवा, लोणचे, कोशिंबीर, सॅन्डविच अशा सर्वच प्रकारांमध्ये आपली मुख्य भूमिका निभावणारे गाजर म्हणजे प्रत्येक जेवणाचा प्राण आहे. गोडसर असलेले गाजर हे हिवाळ्याचे मुख्य आकर्षण असते. अनेकांसाठी तर हिवाळा म्हणजेच गाजर. गाजराचा सिझन सुरु झाला की, घरांमध्ये याचे विविध पदार्थ केले जातात. हेच चविष्ट गाजर आपल्या जिभेला जेवढे समाधान देते त्याहून अधिक आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. गाजराचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक मोठे लाभ आहेत. गाजरामधील अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. (Carrot)

नियमितपणे गाजर खाल्ल्याने अनेक चांगले फायदे दिसून येतात. गाजरांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे गाजर खाणे. गाजराचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक फायदे आहेत की, ते लोकांना समजण्यासाठी खास जागतिक गाजर दिवस देखील साजरा केला जातो. दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय गाजर दिवस म्हणून साजरा केला जातो. काय आहेत गाजराचे फायदे? जाणून घ्या. (Health News)

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये आढळणारं व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. गाजर हे व्हिटॅमिन ए चे उत्कृष्ट स्रोत आहे. व्हिटॅमिन ए डोळयातील पडदा मजबूत करण्यास मदत करते. यामुळे कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता सुधारते. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. जे डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करतात. (Marathi News)

Carrot

गाजरातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देतात. त्यामुळे हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते आणि त्वचा मऊ राहते. तसेच त्वचेचे आणि केसांचे आरोग्यही चांगले राहते. गाजरात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो. गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे इतर अनेक पदार्थांच्या तुलनेत रक्तातील साखरेमध्ये अगदी कमी प्रमाणात वाढ होते. म्हणून मधुमेह असलेल्या लोकांसाठी गाजर चांगले मानले जाते. (Latest Marathi Headline)

गाजराचा ज्यूस करता येतो, ज्यामुळे तुम्हाला गाजर त्याच्या सर्व आवश्यक पोषक तत्वांसह एकाग्र स्वरूपात मिळते. जर तुम्ही दररोज फक्त एक ग्लास गाजराचा ज्यूस प्यायला तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवायला मदत करेल आणि तुमच्या शरीराला रोग, विषाणू, बॅक्टेरिया आणि ॲसिडीटी यांच्याशी लढण्यासाठी मदत करेल. गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरते. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात. दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर आहे. लहान मुलांना दात येताना गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही. एवढेच नाही तर गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचे आणि स्नायूचे आरोग्य देखील सुधारते. (Top Trending Headline)

गाजराचा रस तुमच्या यकृताला कोणत्याही हानिकारक विषारी पदार्थांपासून स्वच्छ करण्यास मदत करू शकतो. गाजरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच यकृतातील पित्त आणि चरबीचे प्रमाण कमी करते. याव्यतिरिक्त, गाजरातील विरघळणारे फायबर यकृत आणि कोलन स्वच्छ करण्यास मदत करते आणि कचरा काढून टाकण्यास मदत करते. गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. (Top Trending News)

======

Hair Care : थंडीत केसांच्या वाढीसाठी लावा Castor Oil, मिळतील हे प्रभावी फायदे

======

कच्च्या गाजराचा ज्युस वजन कमी करण्यातही मदत करतो. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट जास्त काळ भरलेलं असतं. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. त्यात कॅलरी देखील खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय वजन कमी करू शकता. गाजराचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय हृदय निरोगी राहते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.