Home » सुंदर त्वचेसाठी वापरा कोरफडीचा गर

सुंदर त्वचेसाठी वापरा कोरफडीचा गर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Aloe Vera Benefits
Share

प्रत्येक व्यक्तीलाच सुंदर, नितळ त्वचा हवीहवीशी वाटत असते. वय कितीही असले तरी आपण सुंदर दिसावे, आपला चेहरा चित्रपटातील अभिनेत्रींसारखा ग्लो करावा अशी इच्छा असते. यासाठी महागडे सौंदर्य उत्पादने, उपचार घेणे सगळ्यांनाच शक्य नसते. त्यामुळे छोटे, साधे आणि मुख्य म्हणजे कमी खर्चिक उपाय करून आपण सुंदर दिसावे असा प्रयत्न सगळे करताना दिसतात.

त्यासाठी वेगवेगळे घरगुती फेसपॅक, उटणे आदी वापरताना आपल्याला अनेक जणं दिसतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे एक प्रोडक्ट सांगणार आहोत जे वापरून तुम्ही अगदी सहज तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळवू शकतात. चेहऱ्यावर फक्त एक गोष्ट लावा जी लावून तुमच्या सगळ्या समस्या जातील आणि तुमचा चेहरा उजळेल. ती गोष्ट म्हणजे कोरफडीचा गर. हाच कोरफडीचा गर तुम्ही रात्री चेहऱ्याला लावला तर तुम्हाला अतिशय चांगले परिणाम पाहायला मिळतील.

होय तज्ज्ञांच्या माहितीनुसार त्वचेसाठी कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. कोरफड त्वचेच्या सर्वच विकारांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. या कोरफडीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी आरोग्यदायी मानले जातात. त्वचेच्या संबंधित सर्वच उत्पादनांमध्ये कोरफड सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते. शिवाय कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. यात ९६ टक्के पाणी असते, सोबतच ए,बी, सी आणि ई व्हिटॅमिनसह प्रचंड प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. अशी ही कोरफड रोज वापरल्यास त्वचा निरोगी राहते.

कोरफड या औषधी वनस्पतीमध्ये ७५ प्रकारचे घटक असतात. ज्यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो. कोरफडसह गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे होतात. जर का तुम्ही कोरफडीच्या ताज्या पानांचा गर काढून चेहऱ्यावर लावू शकता किंवा बाजारातून कोरफडीचे जेल मिळते ते घेऊन देखील चेहऱ्यावर लावू शकता. कोरफडीचा गर आपण कोणत्या गोष्टींसह चेहऱ्यांवर लावू शकता हे पाहुयात.

  • काकडी आणि कोरफड या दोन्ही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते. कोरफड जेल किंवा गर आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने हे वाटण गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेल देखील यात मिक्स करू शकता.

Aloe Vera Benefits

  • कोरफड जेल किंवा गरमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते.
  • कोरफडाच्या रसात, गरात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो. कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • एलोवेरा जेल चेहऱ्याची सूज कमी करते आणि अकाली वृद्धत्वाच्या खुणाही कमी करते. वाढत्या वयानुसार त्वचा निस्तेज होते आणि सुरकुत्या पडू लागतात. यावर एलोवेरा उत्तम उपाय आहे.
  • कोरफड त्वचेच्या मृत पेशी, प्रदूषक, त्वचा पांढरे करण्यासाठी आणि अतिरिक्त तेल काढून टाकून त्वचा स्वच्छ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याच्या वापराने मुरुम, डाग, ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. कोरफड त्वचेच्या छिद्रांनाही घट्ट करते.
  • उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहऱ्यावर थोडं कोरफड जेल लावा. हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते. यासोबतच त्वचेवरील पुरळांपासूनही तुम्हाला संरक्षण मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्यात तुमची त्वचा थंड राहते, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर पू रॅश होणार नाही.
  • तुमच्या घरामध्ये कोरफडचे रोपटे असेल तर त्यातील ताजा गर किंवा जेल घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हेअर पॅक म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.

======

हे देखील वाचा : ‘ही’ योगासने करा आणि केस गळती थांबवा

======

  • आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलने मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. प्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात.
  • अनेकवेळा लोकं रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावतात. मात्र त्याचा अधिक चांगला परिणाम होण्यासाठी त्यात तुम्ही कोरफड मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. तळहातावर कोरफडीचे जेल घेऊन त्यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिसळावेत. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. तसेच चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.