सध्याच्या काळात बहुतांश मुली किंवा महिला आपल्या घरापासून दूर असलेल्या शहरात नोकरी करत आहेत. अशातच काहीवेळा सुखाचे क्षण अनुभवायला येतातच. पण एकटेपण ही काहीवेळा वाटत राहते. काही वेळा असे ही होते की, आपण आपल्या घरातील मंडळींसोबत राहून सुद्धा आपल्याला एकटेपण वाटते. त्यावेळी आपल्याला कोणी ही विचारत नाही किंवा आपल्याशी बोलत नाही अशीच भावना आपल्या मनात सलत राहत असते. याचाच अधिक त्रास आपल्याला होतो आणि आपण तणावाखाली जातो. एकटेपण वाटण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकी मुख्य कारण अशी की, आपली प्रिय व्यक्ती सोडून जाणे, दुसऱ्या शहरात रहायला जाणे किंवा नात्यात फूट पडणे. काही स्थितीत एकेटपण हे आपल्या मानसिकतेवर ही घात करते.(Being lonely bad for health)
एकटेपण ही स्थिती ऐवढी भयंकर आहे की, काही वेळेस त्याचा शारीरिक परिणाम होतोच पण आपण टोकाचे ही पाऊल उचलण्याचा विचार करतो. काही अभ्यासातून असे साध्य करण्यात आले आहे की, एकेटपण हे आपल्यासाठी ऐवढे त्रासदायक असते जेवढ्या एखाद्या हानिकारक पदार्थाचे सेवन. एकटेपणातून निघण्यासाठी अशा काही गोष्टी करणे टाळा ज्यामुळे तुम्हाला सारखे एकटे वाटते.
आणखी महत्वाचे म्हणजे आपल्या मनातील भावना या कधीच मनात ठेवून नका. यामुळे आणखी एकटेपण वाटते आणि सारखे दु: खी असल्याचे जाणवते. त्यामुळे एकटेपण दूर करण्यासाठी आपल्या मनातील भावना एखाद्या व्यक्तीशी जरुर शेअर करा. एकटेपण जाणवणे म्हणजे तुमच्यात काही चुका किंवा दोष आहे असे नव्हे. तर याचा खरा अर्थ असा की, तुम्ही अधिक संवेदनशील व्यक्ती आहात. एकटेपणातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा.
हे देखील वाचा- कैक पिढय़ांचं वैचारिक पोषण करणारा प्रख्यात उर्दू कवी मिर्झा गालिब!

तुम्ही स्वत:साठी नाही जगलात तर आयुष्य सार्थकी कसे लागेल? त्यामुळे आपल्या मनाला काय वाटते हे विचारा.. त्याचसोबत दुसऱ्यांची मदत करुन जर तुम्हाला आनंद होत असेल तर ते सुद्धा करा. जेणेकरुन तुमचे एकटेपण हे दूर होण्यास हळूहळू मदत होईल. मदतीच्या भावनेने जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा नेहमीच लक्षात ठेवा यामागे तुमचा कोणताही स्वार्थी हेतू नसला पाहिजे. एकटेपण हे कायमस्वरुपी आपल्यासोबत राहत नाही. त्यामुळे घराबाहेर पडा किंवा घरातील मंडळींशी, मित्रमैत्रीणींशी भेटून गप्पा मारा, फिरायला जा. आपल्याला आवडत असलेले एखादे काम करा जेणेकरुन तुमचे मन त्यात गुंतून राहिल आणि एकटेपणाचा विचार ही वारंवार मनात येणार नाही.(Being lonely bad for health)
एकटेपण दूर करण्याचा अगदी साधा सोप्पा मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन. असे नेहमीच म्हटले जाते की, आपले मित्रमैत्रीणी किंवा घरातील मंडळींपेक्षा पुस्तक आपल्या अधिक जवळची असतात. पुस्तकांच्या माध्यमातून तुम्ही कधी कधी आयुष्याचे बोध घेता तर कधी आयुष्याचे धडे गिरवता. एकटेपण आणि पुस्तक या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तर सर्वकाही मॅजिकल होतेय असे वाटते. कारण पुस्तकातील कथेत आपण ऐवढे रमतो की, आपल्याला वाटणारे एकटेणाचा कालांतराने विसर पडतो.