आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. २५ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामधील शोले गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटगृहाच्या मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे.
थिएटरच्या मालकांनी आरआरआर रिलीज होण्याआधी चित्रपटगृहांमधील स्क्रिनसमोर खिळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या फोटोमध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील वेंकटेश्वरलु अन्नपूर्णा थिएटरमध्ये स्क्रिन समोर खिळे ठोकण्यात आलेले दिसत आहेत.
थिएटमधील कर्मचाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही स्क्रिन समोर खिळे ठोकले आहेत, कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक उत्साहित होतील आणि स्क्रिन समोरच्या पोडियमवर चढतील. त्यामुळे स्क्रिनला नुकसान होऊ शकते.’
====
हे देखील वाचा: महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात रणदीप हुड्डा साकारणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची’ भूमिका
====
राज्यातील श्रीकाकुलममध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. इथे सूर्या सिनेमा हॉलच्या लोकांनी पडद्यासमोर लांबलचक तारा लावल्या आहेत, जेणेकरून प्रेक्षक स्क्रीनच्या जास्त जवळ येऊ शकत नाहीत. याबाबत सूर्या थिएटरचे प्रभारी सांगतात की, एकाच चित्रपटात दोन मोठे स्टार्स असल्यामुळे संपूर्ण थिएटर फुल्ल होणार आहे.
Preparation for #RRRMoive .. Enjoy the movie. pic.twitter.com/4sYsOpeKYL
— Annapurna Complex (@AnnapurnaCompl1) March 21, 2022
चित्रपटावर होत आहे टीका
उद्या हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असून, रिलीज होण्यापूर्वीच त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवर #BoycottRRRinKarnataka ट्रेंड करत आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार नसल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.
बहुप्रतीक्षित ‘RRR’ हा चित्रपट कन्नड भाषेतही रिलीज करावा, अशी कर्नाटकातील जनतेची मागणी आहे. यासाठी ट्विटरवर या हॅशटॅग बॉयकॉटचा महापूर आला आहे.
नाराजी व्यक्त करत चाहते आणि प्रेक्षकांनी RRR चित्रपट कन्नडमध्ये रिलीज करण्याची मागणी केली आहे. काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, तर काही लोक चित्रपटाच्या टीम आणि कलाकारांना दोष देऊ नका, असे देखील म्हणत आहेत.
‘RRR’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त आलिया भट्ट, नयनतारा, ऑलिव्हिया आणि अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
====
हे देखील वाचा: अभिषेक बच्चनचा ‘दसवी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
====
आलिया भट्ट आणि अजय देवगणचा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी आपला करिष्मा दाखवू शकतो की नाही हे पाहावे लागेल.