Beauty Tips : महिलांना मेकअप करणे फार आवडते. यासाठी विविध ब्युटी प्रोडक्टसचा वापर केला जातो. काही वेळेस असे होते की, मेकअप प्रोडक्ट्स ऑनलाइन पद्धतीने खरेदी केले जातात. अशा प्रोडक्ट्सचा काही महिलांच्या त्वचेवर उलट परिणाम होतो. त्यापैकीच एक म्हणजे मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर खाज येणे. असे बहुतांशजणांसोबत होतो. तुमच्यासोबतही कधी असे झालेय का?
मेकअप केल्यानंतर खाज येण्याची समस्या सातत्याने जाणवत असल्यास तुमच्या त्वचेला यामुळे नुकसान पोहचू शकते. अशातच जाणून घेऊयात मेकअप केल्यानंतर खाज येण्यामागील कारण काय असू शकते याबद्दल अधिक…..
त्वचेवर ब्युटी प्रोडक्ट्स सूट न करणे
बहुतांश महिला आपल्या स्किन टोननुसार ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करत नाहीत. यामुळे चुकीचे ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी केल्यानंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. अथवा ऑनलाइन ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना त्याबद्दल अधिक माहिती नसल्यासही काहीजण खरेदी करतात. परिणामी त्वचेचे यामुळे नुकसान होते. प्रयत्न करा की, तुम्ही कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना एखाद्या एक्सपर्ट्सची मदत घ्या.
स्किन केअर रुटीन फॉलो न करणे
जर तुम्ही योग्य पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यास ब्युटी प्रोडक्ट्समध्ये असलेले केमिकल तुमच्या त्वचेला नुकसान पोहचू शकतात. यामुळे दररोज स्किन केअर रुटीन फॉलो करावे.
गरजेपेक्षा अधिक मेकअप
काही वेळेस असे होते की, आपण मेकअप केला तरीही मन खुश होत नाही. याच कारणास्तव गरजेपेक्षा मेकअपचे अत्याधिक लेअर्स त्वचेवर लावले जातात. यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही देखील असे करत असाल तर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकते. (Beauty Tips)
अस्वच्छ ब्रश किंवा स्पंजचा वापर
जेव्हा कधीही मेकअप कराल तेव्हा नेहमीच लक्षात ठेवा की, मेकअपचे साहित्य स्वच्छ असावे. मेकअप केल्यानंतर त्यासाठी वापरला जाणारा ब्रश किंवा स्पंज स्वच्छ धुवून ठेवावा. अस्वच्छ ब्रश किंवा स्पंजचा मेकअप करतेवेळी वापर केल्यास त्वचेवर इंन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली जाते. याशिवाय पिंपल्स, त्वचा काळी पडणे अशा समस्याही उद्भवू शकतात.