Home » Skin Care :सणासुदीच्या दिवसात घरच्याघरी ‘या’ उपायांनी मिळवा इन्स्टंट ग्लो

Skin Care :सणासुदीच्या दिवसात घरच्याघरी ‘या’ उपायांनी मिळवा इन्स्टंट ग्लो

by Jyotsna Kulkarni
0 comment
Skin Care
Share

श्रावण महिना संपत आला आहे. अवघ्या काही दिवसातच श्रावण संपून भाद्रपद महिना लागेल. भाद्रपद महिना म्हणजे गौरी आणि गणपतीची घाई. सध्या सगळीकडे गणपतीची जोरदार तयारी चालू असेल. ऑफिस, कॉलेज करताना घरी आल्यावर गणपतीची तयारी करायची. यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देऊच शकत नाही. आता सणासुदीच्या काळात आपण देखील सुंदर दिसणे आवश्यक आहे. मात्र कामात पार्लरमध्ये जायला वेळच नाही. असे अनेक महिलांच्या बाबतीत आता होत असेल. छान तर दिसायचे मात्र पार्लरमध्ये जायला जमतच नाही. मग अशावेळेस आपण काहीतरी घरीच उपाय करायचा विचार करतो. मात्र बेसन किंवा मुलतानी माती सोडून वेगळे कोणते उपाय आपल्याला पटकन सुचत देखील नाही. हाच विचार करून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी काही सोपे आणि फायदेशीर उपाय. (Skin Care)

कोरफड
कोरफडमुळे आपल्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो. यात अँटी-एजिंग गुणधर्म देखील असतात जे आपल्या त्वचेची लवचिकता गमावत नाहीत आणि सुरकुत्या कमी करतात. यामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात आणि कोरडेपणा जवळ येऊ देत नाहीत. याचे मुरुमविरोधी गुणधर्म मुरुम आणि चिडचिड देखील कमी करतात. (Marathi News)

मसूर डाळ 
मसूरडाळीच्या दोन ते तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नारळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहरा सुंदर दिसण्यास मदत होते. (Todays Marathi Headline)

नारळ तेल
दक्षिण भारतातील लोक नारळाच्या तेलाचा खूप वापर करतात, हे केवळ चांगल्या प्रकारे ओलावा प्रदान करत नाही तर आपली त्वचा थंड ठेवते, सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून आपल्या त्वचेचे रक्षण करते आणि वृद्धत्वाचा त्वचेवर होणारा परिणाम देखील एक उत्तम अँटी-एजिंग म्हणून प्रतिबंधित करते.

Skin Care

 

हळद आणि बेसन
बेसन, हळद आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा. या फेस पॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात. (Marathi trending Headline)

टोमॅटो आणि काकडी
चेहऱ्याला चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त ठरते. यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काहीवेळ ठेवावे. यामुळे चेहरा गोरा, चमकदार होण्यास मदत होते. (Top Trending News)

बटाट्याचा किस
बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी. हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे डागही निघून जाण्यास मदत होते. बटाट्यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्याही कमी होतात. (Top Marathi News)

पपईचा गर
पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते. (Latest Marathi News)

==========

Health : एक महिना गहू बंद केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ फरक

Healh : जिभेच्या रंगांवरून समजतो शरीरातील आजार

==========

मध
चमचाभर मधात लिंबू रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल. याशिवाय दररोज सकाळी अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर सुकू द्यावे. त्यानंतर अंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा. यामुळेही चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. (Top Stories)

इतर काळजी
भरपूर पाणी आपली त्वचा चमकदार बनविण्यास मदत करते, आपल्या शरीरातील घाण काढून टाकते आणि शरीराच्या नवीन पेशी तयार करते. रात्री उशिरा पर्यंत जागणे आणि 8 तास पूर्ण झोप न घेणे आपल्या त्वचेसाठी चांगले नाही. यामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. तुम्हाला थकवा जाणवतो आणि तुमची त्वचा निस्तेज दिसेल, त्यामुळे पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करा. कारण व्यायाम म्हणजे केवळ वजन कमी करणे नव्हे, तर शरीराला आकारात आणणे आणि चेहऱ्यावर चमक आणणे. व्यायामामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि मनही प्रसन्न राहते.  (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.