Home » सणासुदीच्या दिवसात केमिकल फ्री उपायांनी उजळवा तुमचे सौंदर्य

सणासुदीच्या दिवसात केमिकल फ्री उपायांनी उजळवा तुमचे सौंदर्य

जाहिरातींच्या मार्केटमध्ये सध्या विविध प्रोडक्ट्स बद्दल मोठ्या प्रमाणात ब्रँन्डिंग केले जाते. परंतु समजूतदार महिलांना माहिती असते की, आपल्या आजीच्या घरगुती टिप्सनेच आपण आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो. त्याचसोबत हा पर्याय अगदी सुरक्षित आणि केमिकल फ्री आहे.

by Team Gajawaja
0 comment
Skin Care Tips
Share

जाहिरातींच्या मार्केटमध्ये सध्या विविध प्रोडक्ट्स बद्दल मोठ्या प्रमाणात ब्रँन्डिंग केले जाते. परंतु समजूतदार महिलांना माहिती असते की, आपल्या आजीच्या घरगुती टिप्सनेच आपण आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो. त्याचसोबत हा पर्याय अगदी सुरक्षित आणि केमिकल फ्री आहे. अशातच दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महिला आपण सुंदर दिसावे म्हणून विविध ब्युटी ट्रिटमेंट करतात. परंतु तुम्हाला घरच्या घरी चेहऱ्याला ग्लो आणायचा असेल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढील काही टिप्सचा वापर करून तुम्ही घरगुती उपायांनी तुमचे सौंदर्य उजाळू शकता. (Beauty Tips)

पीठाचा फेसपॅक
गव्हाच्या पीठात थोडेसे दूध, दही आणि लिंबाचे काही थेंब टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर ती हलक्या हाताने चेहऱ्याला लावा. आता पेस्ट सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी
लिंबूचा रस, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी 10 ग्रॅम घ्या. या वस्तू व्यवस्थितीत मिक्स करून काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. दररोज रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हे लोशन चेहऱ्याला हलक्या हाताने लावत मसाज करा आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा. 15-20 दिवस याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला ग्लो येईल.

This coffee face pack can cure half of your beauty problems | The Times of  India

लिंबाचा रस
लिंबाच्या रसात रोमछिद्रांमधील घाण काढण्याचे गुण असतात. त्यामुळे लिंबाचा रस घेऊन तो हाता-पायांना लावल्यास तर त्यावर जमा झालेली घाण दूर होण्यास मदत होईल. तुमची स्किन उजळेल.

टोमॅटोच्या बिया
टोमॅटोमध्ये काही ब्युटी प्रॉपर्टीज असतात. टोमॅटोच्या बिया आणि त्याचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होऊन स्किन चमकते.

कच्चा बटाटा
कच्चा बटाटा घेऊन तो किसून घ्या. आता किसलेला बटाटा गाळीत घेऊन त्याचा रस काढा. बट्याटाचा हा रस चेहऱ्याला लावल्याने डाग दूर होतात. चेहरा ग्लो होण्यास मदत होते.

मुल्तानी मातीचा फेसपॅक
नॉर्मल स्किनसाठी मुल्तानी मातीचा फेसपॅक तुम्ही तयार करू शकता. यासाठी चंदन पावडर, लिंबाचा रस आणि ताजे दूध त्यात मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने तुमचा चेहरा ग्लो होईल. (Beauty Tips)

मध
मध हे स्किनसाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. काही नसेल तर केवळ मधाचा वापर करुन तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता.


हेही वाचा- त्वचेला नुकसान पोहचवू शकतात तुमच्या ‘या’ चुका


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.